नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

संधी

गंगा आली मार्गामध्ये         तहान आपली भागवून घे संधी मिळता जीवनामध्ये     उपयोग त्याचा करून घे   ठक ठक करुनी दार ठोठवी      संधी अचानक केव्ह्ना तरी गाफील बघुनि चित्त तुझे        निघून जाईल ती माघारी   चालत राही सुवर्ण संधी           हाका देवूनी वाटेवरी बोलविती जे प्रेमाने  तिज       सन्मान तयांचा सदैव करी   धुंदी मध्ये राहून आम्ही       चाहूल तिची विसरून जातो जीवनातले अपयश बघुनी       नशिबाला परी दोष देतो   यशस्वी ठरती तेच जीवनी      उपयोग करुनी  संधीचा साथ देऊनी प्रयत्न्याची        मार्ग निवडती योग्य दिशेचा   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]

जीवन गुलाबा परि

जीवन असावे गुलाबा सारखे, सहवासे ज्याच्या मिळताती सुखे ।।१।।   सुगंध तयाचा दरवळत राही, मनास आमच्या समाधान होई ।।२।।   नाजूक पाकळ्या कोमल वाटती, सर्वस्व अर्पूनी गुलकंद देती ।।३।।   विसरूं नका ते काटे गुलाबाचे, बसती लपूनी खालती फुलांचे ।।४।।   सुखाचे भोवती सावट दु:खाचे, जीवन वाटते झाड गुलाबाचे ।।५।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

 कवितेचे मूल्यमापन

काव्य रचनेचा छंद लागूनी,  कविता करू लागलो  । भाव तरंगाना आकार देऊनी,  शब्दांत गुंफू लागलो….१, एका मागूनी दुसरी कविता, रचित मी चाललो वही भरता संग्रहाची, आनंदात गुंग झालो…२, अचानकपणे खंत वाटूनी,  निराशा आली मनी निरर्थक वेळ दवडिला,  हेच समजोनी ….३, बोध मिळूनी कुणीतरी सांगे, मूल्यमापन होईल वेडेपणा वा शहाणपणा,  काळ हाच ठरवील…४, करूनी घेतले तुज कडूनी, […]

 ढोंगी साधू महाराज

सोडत नसतो केव्हाही,  निसर्ग आपुल्या मर्यादा, चमत्कार करीत नसतो, नियमित चालतो सदा   १ साधूबाबा महाराज    कित्येक आहेत ह्या जगती नांव घेवूनी प्रभूचे     चमत्कार दाखविती   २ अज्ञानाने भरलो आम्ही विश्वास वाटतो त्यांचा चमत्कार दाखविण्यामध्ये    हात नसतो प्रभूचा    ३ तो महान असूनी     क्षुल्लक त्यासी ह्या गोष्टी प्रेमभावना घेण्या   कशास पडेल कष्टी   ४ नष्ट केला ईश्वर धर्म, ह्या साऱ्या […]

दहाव्या वाढदिवसाच्या सदिच्छा

मोठ्या नातवाचा आज दहावा वाढदिवस. सर्व घर आनंदाने फुलून गेले होते. त्याचे मित्र मंडळी शेजारचे,  काका मामा आत्या मावशी ह्यांच्या कडील मंडळी नातेसंबंधी एकत्र जमली होती. प्रथम आपल्या पद्धतीने दिवा लावला. त्याला ओवाळले गेले. नंतर आधुनिक पद्धतीने केक ठेवला. […]

उमलणारी फुले

चोर पावली येता तुम्हीं,  साव असूनी खऱ्या फुलराण्या स्वर्गामधल्या,  नाजुक नाजुक पऱ्या निद्रिस्त जेंव्हा विश्व सारे,  संचारी भुमंडळीं स्वागता रवि उदयाचे,  उमलताती सकाळीं चाहुल न ये कुणासी,  तुमच्या अगमनाची प्रफुल्लतेनें मन देते,  पोंच सौंदर्याची आकर्शक ते रंग निराळे,  खेची फुलपाखरें मध शोषण्या जमती तेथे,  अनेक भोवरे सुगंध दरवळून वातावरणीं,  प्रसन्न चित्त करी जागे करीती जगास,  चैतन्यमय […]

श्रद्धांजलि

सुळीं दिले येशूला   वेडेपणाच्या भरांत खिळे ठोकले अंगाला   रागाच्या ओघांत समर्पण केले देहाचे   परि न सोडी ध्येय बलिदानाच्या मार्गाचे   हेच महत्व होय सुळावरी तो जातांना   वदला आकाशी बघूनी क्षमा कर प्रभू त्यांना    ते आहेत अज्ञानी कळले नाहीं ज्ञान   अज्ञान सागरांत जाणले तत्वज्ञान    उशीर केला त्यांत उपयोग नाही आतां   वेळ गेली निघूनी जाण मनां येता    पक्षी गेला […]

शिखरावरी बांधली मंदिरे

विचारांच्या उठती लहरी,   वलये त्यांची होत असती  । सुविचारांची वलये सारी,    नभाकडे जात दिसती  ।।   पवित्र निर्मळ विचारांच्या,   तरल अशा लहरी असती  । अशुद्ध साऱ्या विचारांची,   जड लहरी तळात राहती  ।।   फार पूरातन काळी देखील,   उकल दिसते या गोष्टीची  । पवित्रतेच्या सर्व स्थळांनी,   शोधली जागा शिखरावरची  ।।   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०    

वेडा अहंकार !

एक पुरातन मंदिर दिसले माझ्या दृष्टीला शिवलिंग ते सुंदर असुनी नन्दी दारी बैसला   जुनी वास्तू, पडझड दिसली अवती  भवती झाडे जुडपे वाढून तेथे जागा ते अडविती   किडे मुंग्या झुरूळ नि कोळी यांची वस्ती तेथे रान फुले ती उग्र वास तो दरवळीत  होते.   विषण्य  झाले मन बघुनी अस्वच्छ परिसर राहील कसा ह्या वातावरणी मग तो ईश्वर   पूजा नव्हती पाठ नव्हता भजन नव्हते तेथे पवित्र विधींचा अभाव असुनी दुर्लक्ष ते होते   संकल्प केला त्याचक्षणी मी आपल्या मनाशी परिसर तो निर्मळ करुनी पवित्रता येई कशी   घरी जाऊनी साधने आणली स्वच्छ करण्या मंदिर […]

‘भूमिका’ आजोबांची !

रोज संध्याकाळी मी फिरावयास जात असे. कधी कधी नातव बरोबर येत असत. मी कपडे घालून निघालो. लहान पाच वर्षाचा नातू, पळत आला व मला बिलगला.
” आजोबा मला पण यायचं आहे बागेत तुमच्या बरोबर.”  मजसाठी ती हृदयद्रावक घटना होती. […]

1 36 37 38 39 40 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..