नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

सत्व रज तमो गुण

त्रिभाव युक्त जीवन, सत्व रज तमो गुण, स्वभावाची अंगे तीन, सर्वात दिसून येती ।।१।।   कांहीं असे सत्वगुणी, कांहीं असे रजोगुणी, काही मध्ये तमोगुणी दिसे निराळ्या प्रमाणीं ।।२।।   प्रेम, दया, क्षमा, शांति, कांहींचे अंगी वसती, सत्वगुण लक्षणें ती, कांहींत दिसून येती ।।३।।   राग, लोभ, अहंकार, षडरिपू हेच विकार, त्यांतच तो जगणार, तमोगुण वाढवून ।।४।। […]

 हिशोबातील शिल्लक

हिशोबाची वही घेवूनी बसलो,  हिशोब करण्यासाठीं  । जमाखार्च तो करित होतो,  जीवनाच्या सरत्या काठीं  ।। घोड दौड ती चालूं असतां,   सुख दु:खानी भरले क्षण  । प्रसंग कांहीं असेही गेले,  सदैव त्याची राही आठवण  ।। कष्ट करूनी जे कमविले, थोडे धन या देहाकरिता  । उपयोग नव्हता त्याचा कांहीं,  जग सोडूनी देह जाता  ।। कधी काळचा निवांतपणा,  घालविला […]

 भाव जाण तू देवा

कर पडले चरणीं भाव जाण देवा   ।।धृ।।   देह झुकला पुढती लिनतेनें मान वाकती मनाची करूनी एकाग्रता भावनेला वाट देतां अश्रू दाटले नयनी  अंतरीचा दिसे ओलावा    १ कर पडले चरणी   भाव जाण  देवा,   प्रथम येई भावना, जागृत करते मना मनाचा ताबा देहावरी तच तुजला प्रणाम करी घे प्रभू जाणूनी   अत:करणातील ठेवा   २ कर पडले चरणी […]

क्लिष्ट ईश्वरी मार्ग

संसारातील ऐहिक सुखे,  धडपडीने मिळवीत असे प्रयत्नातील आनंद खरा,  भोगण्यांत तो दिसत नसे उबग येई ह्याच सुखाची,  जीवन खर्चीले ज्या करितां त्या सुखांत समाधान नव्हते,  जाणवले तेच मिळतां प्रभू मिलनाचा आनंद तो,  चिरंतर ते समाधान देयी ईश्वरी मार्ग खडतर असूनी,  क्लिष्टता येते मनाचे ठायीं तसेच चाला उबग सोसूनी,  कठीण अशा त्या मार्गावरती यश येईल कष्टाचे परि, […]

आत्म गुरू

गुरूचा महीमा थोर I उघडूनी जीवनाचे द्वार सांगूनी आयुष्याचे सार I मार्ग दाखविती तुम्हां  १ वाटाड्या बनूनी I भटकणे थांबवूनी मार्गासी लावूनी I ध्येय दाखवी तुम्हां  २ न कळला ईश I न उमगले आयुष्य दु:ख देती जीवन पाश I बिना गुरू मुळे  ३ अंधारातील पाऊल वाट I ठेचाळण्याची शक्यता दाट प्रकाशाचा किरण झोत I योग्य रस्ता […]

खरा एकांत

निसर्गाचा अप्रतिम ठेवा,   नदीकाठच्या पर्वत शिखरीं  । बाह्य जगाचे वातावरण,   धुंदी आणिते मनास भारी  ।।   त्याच वनी एकटे असतां,   परि न लाभे एकांत तुम्हांला  । चित्तामध्यें वादळ उठतां,   महत्त्व नव्हते बाह्यांगाला  ।।   खडखडाट सारा होता,    दैनंदिनीच्या नित्य जीवनी  । समाधानी जर तुम्हीं असतां,   शांतता दिसते त्याच मनीं  ।।   एकांततेची खरी कल्पना,   मनावरती अवलंबूनी  […]

दृष्टीची भ्रमंति

बालपणीच्या काळामध्यें, दृष्टी आमची आकाशीं लुकलुकणारे तारे बघतां, गम्मत वाटे मनी कशी       १   चमके केव्हां मिटे कधी कधी, लपंडाव तो त्यांचा वाटे फुलवित होते आशा सारी, वेड तयांचे आम्हास मोठे      २   वाटत होते भव्य नभांगण, क्षितीजाला जाऊनी भिडले भिंगऱ्यांचा तो खेळ खेळतां, सर्व दिशांनी नयनी भरले    ३   मोहक भासे विश्व भोवती, भिरभिरणाऱ्या दृष्टीपटाला […]

युगपुरुषाचे दर्शन

मी काय बघितले, काय ऐकले, ह्यापेक्षा मला काय मीळाले, हेच महत्वाचे! हाच तो अविस्मरणीय ऐतिहासिक क्षण… परमपूज बाबासाहेबांचा…. युग पुरुषाचा क्षणिक सहवास.  जीवनामधील सोनेरी क्षण    […]

बाह्य अडथळे

एकाच दिशेने जातां, प्रभू मिळेल सत्वरी, रेंगाळत बसाल तर, गमवाल तो श्री हरी ।।१।।   तुम्ही चालत असतां, अडथळे येती फार, चालण्यातील तुमचे, लक्ष ते विचलणार ।।२।।   ऐष आरामी चमक, शरिराला सुखावते, प्रेम, लोभ, मोह, माया, मनाला ती आनंदते ।।३।।   शरिराचा दाह करी, राग द्वेष अहंकार मन करण्या क्षीण, षड् रिपू हे विकार ।।४।। […]

जीवनाची उपयोगिता

अल्प वर्षे राहिली, उम्मीदपणाच्या हालचालीची  । मना वाटते आगळे करावे,  उरली वर्षे जीवनाची….१, वृधत्वाचा काळ गांजता,  साथ न देयी शरीर कुणाला  । मना मारूनी बसावे लागे,  एक जागी सर्वाला….२, निसर्गरम्य स्थळ निवडूनी,  मर्यादेत जगावे जीवन  । दुजास कांहीं येईल देता   हेच ठरवावे आजमावून…३, बरेच केले स्वत:साठीं,  समाधान परि नाहीं लाभले  । दुजास मिळतां आनंद येई,  खरे […]

1 37 38 39 40 41 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..