नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

नातीच्या खोड्या

सकाळचा फेरफटका मारून घरी आलो. घरी येताच आठ महिन्याची नात मानसी रांगत रांगत माझ्याकडे आली आणि झेपावली. तिला मी लगेच उचलून घेतले. जवळ केले व तिचे पापे घेतले. किती आनंद आणि समाधान ती मला देत होती. नातवंड म्हणजे दुधावरची साय. ज्यांना त्यांचा सहवास लाभतो ते आजोबा आजी खरोखरच नशीबवान व भाग्यवान. आयुष्याची दोर पक्की करणे, आणि वाढविणे ह्या दोन्हीही गोष्टी निसर्ग त्यांच्या […]

चिमण्यांनो शिकवा

चिव् चिव् करित बोलतां   तुम्ही सारी भाषा दोन स्वरातून विचारांना     देत असता दिशा शब्द आमचे सप्तसुरांतून     येती बाहेरी व्यक्त करिती भाव सारे      असती जे अंतरी दोन अक्षरी किमया सारी    तुमच्या भाषेची त्याच चिव चिवे समजुन घेता     धडधड ह्रद्धयाची भाव मनीचे टिपून घेण्या       शब्द लागती थोडे चेहऱ्यावरल्या हलचालीनी      प्रश्न उकलूनी पडे. समज तुमची आपसांतली       कौतूक करणारी शब्द […]

देह समजा सोय

जेव्हां मी म्हणतो माझे, सोय माझी असते त्यांत, देह जगविण्या कामीं, प्रयत्न हे सारे होतात ।।१।।   देह वाटते साधन, प्रभूकडे त्या जाण्याचे, त्यासी ठेवतां चांगले, होते चिंतन तयाचे ।।२।।   भजन करा प्रभूचे, सुख देवूनी देहाला परि केवल सुखासाठीं, विसरूं नका हो त्याला  ।।३।।   देह चांगला म्हणजे, ऐष आरामीं नसावे, ती एक सोय असूनी, […]

 जीवन घटते सतत

क्षणा क्षणाला घटते जीवन,  जाण त्याची येईल कोठून  । मोठे प्रसंग जेंव्हा टिपतो,  तेच सारे लक्षांत ठेवतो  ।। जीवनाच्या पायऱ्या मोजता,  मना विचारा काय राहता  । ढोबळतेचा विचार येता,  सूक्ष्मपणाला विसरूनी जातो  ।। मृत्यू येई हर घडीला,  जाण नसते त्याची कुणाला  । गेला क्षण  परत न येई,  आयुष्य तेवढेच व्यर्थ होई  ।। समाधान जे मिळे तुम्हाला, […]

एक शोषन

शोषून शोषून जमविता, झुरुन झुरुन मरुन जाता पैशांनी भरलेल्या पिशव्या फाटून जातील हाती राहिल ते पिशव्यांचे वस्त्र तुमची आसवे पुसण्यासाठी डॉ. भगवान नागापूरकर    

रसिक श्रेष्ठ

कवि होणें सुलभ असावे    रसिक होण्यापरि जिवंत ठेविती कवितेला    हीच मंडळी खरी   भावनेचे उठतां वादळ    व्यक्त होई शब्दानीं भाव शब्दांचा हार दिसतो    काव्य ते बनूनी   भाव येणे सहज गुण तो     मानवी मनाचा परि बंदिस्त त्याला करणे    खेळ हा कवीचा   शब्द पिंजरा नि भाव पक्षी    ओळखी को रसिक कवि मनाशीं ‘स्व’ भावांचे   करी जुळवणूक   कविते […]

वलय

सतत फिरत राही, चक्र जीवनाचे विविधता पाही ,  रंग आयुष्याचे  ।।१ सुख दुःखाच्या भावना,  उठवूनी लहरी देह आणि मना, परिणाम करी  ।।२ लोभ अहंकार निराशा, सारे मनाचे विकार आनंद समाधान आशा, करी भावना साकार  ।।३ जीवन विषयाचे, बनत असे वलय रस शोधितां त्याचे, जीवन वहात जाय  ।।४   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०    

विनाश – ईश्वरी व मानवी

संतुलन  करूनी चालवी,  निसर्गाचा खेळ सतत  । जन्ममृत्यूची चाके फिरवी,  एकाच वेगाने अविरत  ।। जन्म घटना ही शांत होता,  मृत्यू परि घेई लक्ष्य खेचूनी  । नष्ट होतो जेव्हां मानव,  विचार लाटा उठती मनी  ।। मरणामध्यें निसर्ग असतां,  हताश होऊनी दु:ख करी  । मानवनिर्मित नाश बघूनी,  घृणायुक्त  येई शिसारी  ।। पूर वादळे धरणी कंप,  पचवितो आम्ही ही […]

निसर्ग व्याप्ती

उंच चढूनी हिमालयी,      झेंडा तो रोविला गीरीराजाचे शिरावरी,      विजय संपादिला   उंचाऊनी  बघे मानव,      अथांग जगताला विज्ञानाच्या जोरावरती,   अंतराळात गेला   युगा युगाचा चंद्रमा,       केला अंकित त्याने त्याच्या देही ठेवी पाऊल,   मोठ्या अभिमानाने   अगणित दिसती गृहगोल,      त्याचा दृष्टीला सीमा न उरली आता मग,      चौकस बुद्धीला   चकित होतो प्रथम दर्शनी,      विज्ञाना बघता दिसून येती अनेक गुढे,    एक एक उकलता   किती घेशी झेप मानवा,       उंच उंच गगनी वाढत जातील क्षितिजे,     तितक्याच पटींनी   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

 प्रभूची खंत

मी आलो रे तुझ्या दारीं, मला म्हणतात श्रीहरी झोपलो होतो सागरी, तंद्री मोडी कुणीतरी, ।।१।।   शांतीने पडू देईना, तुझी ती तपसाधना, लक्ष माझे खेची कुणी, प्रश्न पडला मना  ।।२।।   तूच दिसला पुंडलीका, आई-बापा मांडी देऊनी, माझे लक्ष तुझकडे, परि तेच तूझ्या नयनी  ।।३।।   आई – बापाच्या सेवेत,  गुंगलास तूं सतत, सेवा शक्ति मला […]

1 40 41 42 43 44 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..