लक्ष्मीसूत
आशीर्वाद दे ग आई मजला, विनवितो मी तुझाच पूत्र । बाबा माझे नसती हयात, कोण मजला ह्या जगतात ।। ‘केशव’ माझे वडील असता, ‘केवशसूत’ हा ठरतो मी । तसाच बनता ‘केशवकुमार’, मोठे होण्याची युक्ती नामी ।। जगावयाचे जर मोठ्या नामी, तूच मजला महान आहे । ‘लक्ष्मी’ तुझे नाव असता, ‘लक्ष्मीसूत’ होण्यात पाहे ।। डॉ. भगवान नागापूरकर […]