नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

आनंदमय जाग

हलके हलके निशा जावूनी,  उषेचे ते आगमन होई निद्रेमधल्या गर्भामध्यें,  रवि किरणांची चाहूल येई…१, त्या किरणांचे कर पसरती,  नयना वरल्या पाकळ्यावरी ऊब मिळता मग किरणांची,  नयन पुष्पें फुलती सत्वरी…२, जागविती ते घालवूनी धुंदी,  चैत्यन्यमय जीवन करी हा जादूचा तो स्पर्श असूनी,  न भासे ही किमया दुजापरी…३   डॉ. भगवान नागापूरकर ९००४९७९८५०  

कष्टाचे मोल

कष्ट करुनी घाम गाळीतो,   शेतामध्यें शेतकरी समाधानाची मिळते तेंव्हा,  त्यास एक भाकरी   त्याच भाकरीसाठी धडपडे,  नोकर चाकर कष्टामधूनच जीवन होते,  तसेच साकार   कष्ट पडती साऱ्याना,   करण्या जीवन यशदायी विद्यार्थी वा शिक्षक असो,  अथवा आमची आई   अभ्यासातील एकाग्रता,   यास लागते कष्ट महान त्या कष्टाचे मोल मिळूनी,   यशस्वी होईल जीवन   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

आत्म्याचे बोल

काय आणि कसे बोलतो,  त्यांना माहीत नव्हते सहजपणे सुचणारे,   संभाषण ते असते….१, शिक्षण नव्हते कांहीं,  अभ्यासाचा तो अभाव परि मौलिक शब्दांनी,  दुजावरी पडे प्रभाव…२, जे कांहीं वदती थोडे,  अनुभवी सारे वाटे या आत्म्याच्या बोलामध्ये,  ईश्वरी सत्य उमटे….३   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

दु:खात सर्व शिकतो

दु:खातची शिकतो सारे, उघडोनी मनाची द्वारे दु:खा परी नसे कुणी,  जो सांगे अनुभवानी दु:ख मनावरी बिंबविते, वस्तूस्थितीची जाणीव देते दुसऱ्या परि अस्था देई, जाणीव ठेवूनी कार्य करि अधिकाराने माज चढतो,  खालच्यांना तुच्छ लेखतो जाता अधिकार हातातूनी, माणूसकीला राही जागूनी कष्ट करण्याची वृति येते,  सर्वांना समावून घेते श्रीमंतिमध्ये वाहून जाती, आरामाची नशा चढती गरिबी शिकवते मेहनत,  कष्टाने […]

मिष्किल तारे

चमकत होते अगणित तारे, आकाशी ते लुक लुकणारे लक्ष्य वेधूनी घेतां घेतां,  फसवित होते आम्हांस सारे….१ कधी जाती ते चटकन मिटूनी,  केंव्हां केंव्हां दिसती चमकूनी खेळ तयांचा बघतां बघतां, चित्त सारे गेले हरपूनी….२ एक एक ते जमती नभांगी,  धरणीवरल्या मांडवी अंगीं संख्या त्यांची वाढतां वाढतां,  दिसून येती अनेक रांगी….३ हसतो कुणीतरी मिश्कील तारा,  डोळे मिटतो दुजा […]

मग्न असलेले जग

मलाच वाटे – – जग मजलाच हांसते विचार करिता कळले  —  जगास फुरसत नसते  ।। धृ ।।   वेगांत चालते जग,    क्षुल्लक तुमचा सहभाग ह्या अथांग जनसागरीं,   कुणी न पुसती तुम्हांपरी आपल्यातच जग जगते विचार करिता कळले  —   जगास फुरसत नसते  ।। १।।   प्रत्येकांचे प्रश्न निराळे,    गर्क आहेत सोडविण्या सगळे उगाच होई भास मजला,    मनाचा […]

चाकोरी

नव्हतो आम्ही आमचे कधींही   बनले जीवन दुजामुळे  । कर्तेपणाचा भाव तरीही      येतो कां मनी ? ते न कळे  ।।   कसा आलो या जगतीं    ठाऊक नव्हते कांही मजला  । कसा वाढलो हलके हलके     जाण आहे याची मला  ।।   जेंव्हा झालो मोठा कुणीतरी   वाटू लागले कांही करावे  । काळाने परि दिले दाखवूनी   जीवन प्रवाही वाहात जावे  […]

पंख फुटता !

ते जातील उडूनी पंख फुटता   पाहत राहशील, डोळे भरुनी आजवरी जे प्रेम दिले तू   शक्ती त्याची उरी बाळगुनी   माया, वेडी कशी असे बघ   वाटते तुजला तुझीच पिले ती हसून, खेळून बागड्तील  सदैव तुझ्या पदारा खालती   जेंव्हा पडले पाउल पहिले   आधाराविण तुझ्या अंगणी नांदी होती दूर जाण्याची   तुजपासुनी त्याच क्षणी   परी दूर दृष्टी ही नव्हती तुजला   मायेचा तो पडदा असता टिपून घेशी अश्रू आज ते   परिस्थितीची जाणीव होता   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

अतृप्त भूक

चंद्रा तुझे रूप कसे रे,  गोंडसवाने छान टक लावूनी बघता, हरपूनी जाते भान मधूर शुभ्र नभी चंद्र तो,  जणू चांदीची थाली अगणीत वाट्या विखूरलेल्या,  दिसे भोवताली टपोर चांदणे वाहूनी जाते,  त्या थाली मधूनी स्वाद लूटता धुंद होतो,  घेता ते झेलूनी रिक्त होते एक वाटी ती, भरूनी जाई दुजी प्राशन करिता सीमा नसे मग,  आनंदा माजी अतृप्त […]

स्वच्छंदी जीवन

चिमण्या आल्या दोन कोठूनी,  घरटे बांधून गेल्या त्या खेळूनी नाचूनी उड्या मारूनी,  चिव चिव करित गात होत्या झाडावरती उंच बसूनी,  रात्र घालवीती हलके हलके दाणा टिपणे पाणी पिणे, स्वछंदाचे घेवूनी झोके संसार चक्र ते भोवती पडता,  गेल्या दोघी त्यातच गुंतूनी नव पिल्लाच्या सेवेसाठी,  घरटे केले काड्या आणूनी पिल्लांना त्या पंख फूटता,  उडूनी गेल्या घरटे सोडूनी अल्प […]

1 49 50 51 52 53 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..