नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

प्रभूची धांवपळ

चकीत झालो बघूनी,  प्रभूला दारावरी त्रिशूळ घेऊनी हातीं, आला होता जटाधारी क्षणीक थांबूनी दारावरती, गेला तो निघूनी बहूत वेळ येत राहिला, दार ना ओलांडले त्यांनी कळले नाहीं मजला, ही त्याची रीत विचार करीता मनी, जाणली मी ही गम्मत उपास तापास करुनी, देह शुद्ध केला भजन पूजन करुनी, तप मिळाले मजला गुंतले होते माझे मन, संसारातील मोहांत […]

 झगडणारे जीवन

गर्भामधूनी बाहेर पडतां,  स्वतंत्र जीवन मिळे  । जीवन रस हा शोषित होती,  आजवरी त्याची मुळे  ।। निघून गेला पदर मायेचा,  डोईवरूनी त्याचा  । झेप घेयी तो आज एकला,  पोकळीत नभाच्या  ।। दु:ख क्लेशाचे वार झेलले,  कुणीतरी त्याचेसाठीं  । आज दुवा नसता  सारे पडती पाठी  ।। तेच रक्त परि फिरत होते, शरीरी त्याच्या सारे  । वंशाने जे […]

चि. मानसीस ( दिड वर्षाच्या नातीस )

थांबव मानसी, चक्र वाढीचे कळ्यातूनी तू फुलताना हासत खेळत तुरु तुरु चालणे शिशू म्हणूनी जगताना कौतुकाने ऐकतो तुज शब्द बोबडे बोलताना हरखूनी जातो चाल बघूनी हलके पाऊल पडताना आनंद पसरे सभोवताली इवल्या त्या प्रयत्नानी बदलूनी जाईल क्षणात सारे रुळलेल्या तव हालचालीनी तुझ्यासाठी जे नवीन होते प्रयत्न तुझा शिकून घेणे अपूर्णतेची आमुची गोडी लोप पावेल पूर्णत्वाने डॉ. […]

निसर्ग व्याप्ती

उंच चढूनी हिमालयी,      झेंडा तो रोविला गीरीराजाचे शिरावरी,      विजय संपादिला   ||१|| उंचाऊनी  बघे मानव,      अथांग जगताला विज्ञानाच्या जोरावरती,   अंतराळात गेला   ||२|| युगा युगाचा चंद्रमा,       केला अंकित त्याने त्याच्या देही ठेवी पाऊल,   मोठ्या अभिमानाने   ||३|| अगणित दिसती गृहगोल,      त्याचा दृष्टीला सीमा न उरली आता मग,      चौकस बुद्धीला   ||४|| चकित होतो प्रथम दर्शनी,      विज्ञाना बघता दिसून येती अनेक गुढे,    एक एक उकलता   ||५|| किती घेशी झेप मानवा,       उंच उंच गगनी वाढत जातील क्षितिजे,     तितक्याच पटींनी   ||६|| […]

संधी

गंगा आली मार्गामध्ये         तहान आपली भागवून घे संधी मिळता जीवनामध्ये     उपयोग त्याचा करून घे   ठक ठक करुनी दार ठोठवी      संधी अचानक केव्ह्ना तरी गाफील बघुनि चित्त तुझे        निघून जाईल ती माघारी   चालत राही सुवर्ण संधी           हाका देवूनी वाटेवरी बोलविती जे प्रेमाने  तिज       सन्मान तयांचा सदैव करी   धुंदी मध्ये राहून आम्ही       चाहूल तिची विसरून जातो जीवनातले अपयश बघुनी       नशिबाला परी दोष देतो   यशस्वी ठरती तेच जीवनी      उपयोग करुनी  संधीचा साथ देऊनी प्रयत्न्याची        मार्ग निवडती योग्य दिशेचा   डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० […]

निसर्गाची आनंदासाठी मदत

कसे मानूं उपकार   निसर्गा तूझे मी उघडोनी जीवन द्वार   आलास तूं कामी तुझ्या मोरानें दाखविले नृत्य   राघूच्या वाणीनें शिकविले सत्य कोकीळेचे गान सप्तसुरांच्या लहरी   चित्रकलेचे ज्ञान इंद्रधनुष्या परि मुंग्याची वारुळे दाखवी वास्तूकला   कोळ्याची जाळे शिकवी हस्तकला घारीची भरारी स्वछंद केले मनां   मैनेच्या उदरीं  जाणला प्रेमळपणा विजेची चपळता चंचल बनवी   धबधब्याची प्रचंडता श्रेष्ठत्व जाणवी निसर्गातील विवीधता देई […]

काव्य कलश

मोरपिसारा   काव्य कलश   ही दया कुणाची झाली, सापडे शब्दांचा झरा, उपसतो जरी सतत,  होत नसे निचरा….१, गोड पाणी शब्दांचे,  ओठी अमृत वाटे पेला भरता काठोकाठ,  काव्य हृदयी उमटे….२, पेला पेला जमवूनी,  कलश भरून आला नाहून जाता त्यात,  देह भान विसरला….३, सांडता पाणी वाहे,  परसते चोहीकडे आस्वाद घेई जो जो, विसर जगाचा पडे….४   डॉ. […]

पुण्य संचय करा

ज्या ज्या वेळी येई संकट,   धांव घेत असे प्रभूकडे  । संकट निवारण करण्यासाठीं,  घालीत होता सांकडे  ।। चिंतन पूजन करूनी,  करीत होता प्रभू सेवा  । लाभत होती त्याची दया,  त्याला थोडी केव्हां केव्हां  ।। संकटी येता करी पूजन, उपयोग होईना त्याचा  । कामी येईल पुण्य ,  विचार करीतां भविष्याचा  ।। संचित पुण्य आजवरचे,  कार्य सिद्धीला लागते  […]

स्मृति

जीवनाचा प्रवाह हा    भरला आहे घटनांनीं विसरुनी जातो  काहीं    काहीं राहती आठवणी  ।।१।। बिजे ज्यांची खोलवर    रुतुनी जाई त्या घटना देह आणि मनावर    बिंबवूनी जाई भावना  ।।२।। काळाचा असे  महिमा    आच्छादन टाकी त्यावरती परि काहीं काळासाठी    विसरुनी जातात स्मृति  ।।३।। प्रसंगी त्या अवचित    जागृत होती आठवणी पुनरपि यत्न होतो    जाण्यासाठीं त्या  विसरुनी  ।।४।।   डॉ. […]

मिळविण्यातील आनंद

आस राहते सतत मनी,   मिळत नसते त्याचेसाठी प्रयत्न सारे होत असती,  हाती नाही ते मिळविण्यापोटी….१, प्रयत्नात तो आनंद होता,  धडपड होती, होती शंका मिळविण्याच्या त्या लयीमध्यें,  जिद्द मनाची आणिक हेका….२, यश मिळते जेंव्हां पदरी,  धडपड सारी थंडावते ज्याच्या करिता सारे सोशीले,   त्यातील उर्मी निघून जाते….३, यशांत नाही आनंद तेवढा,   मिळविण्यात जो दिसून येई कांहींतरी ते मिळवायचे,  […]

1 59 60 61 62 63 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..