नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

हट्टी अनु ( बाल गीत )

एक होती अनु फुलासारखी जणू डोळे फिरवी गर्र गर्र पाऊल टाकी भरभर तिला लागली भूक गडू दिला एक बघितला रिकामा गडू तिला आले रडूं आईने दुध भरले कांठोकांठ ओतले तिला हवय जास्त दूध आहे मस्त रडरड रडली आदळ आपट केली सांडूनी गेला गडू पाठींत बसला मात्र धम्मक लाडू — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

निसर्गाचे खेळणे

धडपड असते प्रत्येकाची जगण्यासाठी, तेच जगती जगी या शक्ति ज्यांचे पाठी…१, बुद्धी, अनुभव, विचार, बळ शक्तीची रूपे यश मिळविण्या जीवनातील हीच मोजमापे…२, नीती-अनिती, पाप-पुण्य, सामाजिक बंधने सरळमार्गी जगण्यासाठीं हवीत ही कारणे…३, जन्म मृत्यूच्या रेषेवरती, उभा संकटकाळी पशुसमान वागत दिसतो, मानव त्यावेळी…४, प्रथम गरज भागवी सारे, स्वजीवनाची आदर्श जगणे तत्वे राहती, मग नंतरची….५, मृत्यूच्या त्या दाढे मधूनी, […]

निसर्गावर अवलंबून

कितीही सारी धडपड करशी लाचार ठरतो अखेरी जाण माणसा मर्यादा तव आपल्या जीवनी परी … ।। क्षणाक्षणाला अवलंबूनी जीवन असे तुझे सारे पतंगा परि उडत राहते जसे सुटत असे वारे… ।। निसर्गाच्याच दये वरती जागत राहतो सदैव कृतघ्न असूनी मनाचा तूं विसरून जातो ती ठेव… ।। निसर्गाच्या मदती वाचूनी जगणे शक्य नसे तुजला जीवन कर्में करीत […]

मोहमाया दलदल

दलदल होता चिखल मातीची,  पाय जाती खोलांत प्रयत्न तुमचे व्यर्थ जाऊनी ,  न होई त्यावर मात…१, सावध होवूनी प्रथम पावूली,  टाळावे ते संकट मध्यभागी तुम्ही शिरल्यानंतर,  दिसत नाही वाट….२, मोह मायेची दलदल असती, सदैव भोवताली चुकूनी पडतां पाऊल तुमचे, खेचला जातो खाली…३, जागृतपणाचा अभाव असतां,  गुरफूटूनी जातो मोहमायेच्या आकर्षक गुणाला,  बळी तोच पडतो….४, वेगवान त्या जीवन […]

वेळेचे मूल्य

मूल्य नाही कुणा, तूं दिल्या वेळेचे गमावून टाकी,  जाणूनी फुकाचे….१, लागत नसते,   दाम वेळेसाठीं म्हणून दवडे अकारणा पोटीं….२, वस्तूचे मूल्य ते,  पैशांनीच ठरते समज सर्वांची,  अशीच असते…३, वेडे अहा सारे,   कसे होई मूल्य वेळ जातां मग,  आयुष्य जाईल…४, वेळ दवडतां,   कांहीं न राहते सर्वच जीवन, व्यर्थ तें ठरते….५   — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

मयुरा तूं आहेस गुरु

मयुरा तूं आहेस गुरु,  तुला आम्हीं वंदन करु   ।।धृ।।   नदी कांठच्या वनीं थुई थुई नाचूनी पिसारा फुलवुनी तुझे पाहूनी नृत्य, नाचाचे ताल धरु   ।।१।। मयुरा तूं आहेस गुरु  तुला आम्हीं वंदन करु   मोरपिसे सुंदर रंग बहारदार दिसे चमकदार बघुनी रंगाची विविधता, कुंचल्यांनी सप्तरंगी छटा भरुं   ।।२।। मयुरा तूं आहेस गुरु  तुला आम्हीं वंदन करु […]

मेघ गर्व हारण

अंहकाराचा पेटून वणवा,  थैमान घातिले त्या मेघांनी तांडव नृत्यापरि भासली,  पाऊले त्यांची दाही दिशांनी…१, अक्राळ विक्राळ घन दाट,  नी रंग काळाभोर दिसला सूर्यालाही लाजवित असता,  गर्वपणाचा भाव चमकला…२, पृथ्वीवरती छाया पसरवूनी,  चाहूल देई आगमनाची तोफेसम गडगडाट करूनी,  चमक दाखवी दिव्यत्वाची…३, मानवप्राणी तसेच जीवाणे,  टक लावती नभाकडे रूप भयानक बघून सारे,  कंपीत त्यांची मने धडधडे…४, त्याच वेळी […]

अपूर्ण जीवन

सोडून दे अहंकार तुझा लाचार आहेस आपल्या परि पूर्ण जीवन तुला न मिळे न्यूनता राहते कांहीं तरी…१ धनराशि मोजत असतां वेळ तुजला मिळत नसे शरीर संपदा हाती नसूनी मन सदा विचलित असे…२ शांत झोपला कामगार तो दगडावरी ठेवूनी डोके देह सुदृढ असूनी त्याचा पैशासाठी झुरतां देखे…३ उणीवतेचा कांटा सलूनी बाधा येत असे आनंदी म्हणून खरे समाधान […]

उपयोगीता हेच मूल्य

चष्मा लावूनी करित होतां,  ज्ञानेश्वरीतील पारायण दृष्टीमधले दोष काढले,  चाळशीचा आधार घेवून….१, फूटूनी गेला एके दिवशीं,  चष्मा त्याच्या हातामधूनी पारायणे ती बंद पडली,  दृष्टीस त्याच्या बाध येवूनी…२, चालत असता सरळपणे,  दैनंदिनीचे कार्यक्रम खीळ पाडूनी बंद पाडी,  क्षुल्लक वस्तू क्षुल्लक दाम…३, वस्तूचे ते मूल्य ठरते, तिच्या उपयोगिते वरती तोलण्यास ते धन न लागे,  मूल्य मापन जेंव्हां होती….४ […]

प्राणिमात्रा विषयीं दया

चाललो होतो मित्रासह    सहल करण्या एके दिनीं आनंदाच्या जल्लोषात आम्हीं    गात होतो सुंदर गाणीं   १   वेगामध्यें चालली असतां    आमची गाडी एका दिशेने लक्ष्य आमचे खेचले गेले    अवचित एका घटनेने   २   चपळाईनें चालला होता    काळसर्प तो रस्त्यातूनी क्षणांत त्याचे तुकडे झाले    रस्त्यावरी पडला मरूनी   ३   काय झाले कुणास ठाऊक    सर्व मंडळी हळहळली जीव घेणाऱ्या […]

1 70 71 72 73 74 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..