नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

नशीब

का असा धांवतोस तूं ,   नशिबाच्या मागें मागें यत्न होता भगिरथी,  नशिब येईल संगे…१, प्रयत्न होतां जोमाने,  दिशा दिसताती तेथें यशाचे ध्येय सदैव,  योग्य मार्गानें मिळते…..२, प्रयत्न करूनी बघा,  ईश्वर देखील मिळेल इच्छा शक्ति प्रभावानें,   नशीबही बदलेल…३ — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

संशयाचे भूत

हे भूत संशयाचे छळते कसे मनाला  । करीते सदा परि ते दिशाहीन विचारमाला  ।। एकाग्रतेचा घात होई क्षणार्धात तेथे  । डोलायमान होऊनी स्थिती बदलून जाते  ।। गमवी विश्वास जेव्हां प्रभू अस्तित्व शक्तीचा  । कळला न अर्थ त्याला या सत्य जीवनाचा  ।। येता मनी संशय आपलाच ज्या घडीला  । शोकांतिका जीवनाची ठरे त्याच क्षणाला  ।।   — […]

उदरांतील शेषशायी

मातेच्या उदरांत झोपला, शेषशायी भगवान वेड्यापरी त्यास शोधीतो, सागरी जाऊन शेषशायीचे चित्र बघतां,  साम्य ते दिसेल उदरामधल्या बालकांतही, सारे तेच आढळेल शेषापरी वेटोळे असुनी,  ‘ नाळ ‘ तयाला म्हणती क्षारयुक्त पाण्यामध्यें,  बालक ते निद्रिस्त असती बालकाच्या नाभी मधुनी,  येई कमलाकृती भाग जीवनसत्व त्यावर असुनी,  ब्रह्मापरी दिसे अंग ‘ सो हं ‘ निनादुनी सांगे,  ‘ मीच तोच […]

ऊर्जेचा करा योग्य उपयोग

खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता शक्तीस द्यावी दिशा चांगली, जीवन यशाकरिता   ।।धृ।। बागेतील फुले सुंदर फुलपाखरांचे रंग बहारदार मोहक इंद्र धनुष्याकार निसर्गातील रम्यतेमध्यें शोधा, ईश्वरी गुणवत्ता   ।।१।। खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता भजन पुजन प्रभूचे भक्ति-भाव मनाचे उपवास करी देहशुद्धीचे तपसत्वाच्या शक्तीनें करा, आत्म्याची मुक्तता   ।।२।। खर्च करावी ऊर्जा आपली, योग्य कामांकरिता गरिबासी मदतीचा […]

देह मंदीर

शरीर एक साधन,  साध्य करण्या प्रभूला ठेवूनी ती आठवण,  चांगले ठेवा देहाला…१ व्यायाम व आहार,  असतां नियमित सुदृढ ते शरीर,  असते मग बनत…२ सुदृढ असता देह, करावे मनाला शांत टाळत असतां मोह, न येई तो भावनेत…३ षडरिपू हे विकार,  काढा विवेकांनी निर्मळ ठेवा शरीर,  पवित्रता राखूनी…४ देह आहे मंदीर,  गाभारा तो मन आत्मा तो ईश्वर,  आनंद […]

मर्यादा

मर्यादेचा बांध घालूनी,  मर्यादेतचि जगती सारे  । अनंत असता ईश्वर ,  मर्यादा घाली त्यास बिचारे  ।। जाण जगाची होई इंद्रियांनी,  त्याला असती मर्यादा  । विचार सारे झेपावती,  ज्ञान शक्ती बधूनी सदा  ।। अथांग वाटे विश्वमंडळ,  दाही दिशांचा भव्य पसारा  । ईश्वर आहे थोर त्याहूनी,  मोजमापाच्या उठती नजरा  ।। कशास करीतो तुलना सारी,  भव्य दिव्यता आम्हा दाखवूनी  […]

विष्ठा

विष्ठा बघूनी थुंकलो,  घाण वाटली मजला अमंगल संबोधूनी,  लाखोली देई तिजला….१, संतापूनी मजवर , कान उघडणी केली तुझ्याचमुळें मुर्खा मी,  अमंगळ ती ठरली,   २ आकर्षक रूप माझे,  लाडू करंज्यानें युक्त कपाटातूनी काढूनी,  केले सारे तूंच फस्त   ३ परि मिळतां तुझा तो,  अमंगळ सहवास रूप माझे पालटूनी,  मिळे हा नरकवास   ४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

नियतीचा फटका

(भोपाळ येथे विषारी वायुमुळे एका रात्रीत सहस्त्रावधी लोक मृत्यूमुखी पडले. ४.१२.८४ ची रात्र) एक भयानक रात्र अशी,  सहस्त्रावधींचा घेई बळी नियतीच्या खेळामधली, कुणा न समजे ही खेळी…१, मध्यरात्र  होवून गेली, वातावरण  शांत होते गादीवरती पडून सारे, स्वप्ने आपली रंगवीत होते, तोच अचानक विषारी वायू,  पसरला त्या वातावरणी हालचालींना वाव न देता,  श्वास रोखीले स्वप्न थांबवूनी, कित्येक […]

कवच

आघात होवूनी परिस्थितीचे,  सही सलामत सुटत असे संकटाची चाहूल लागूनी,  परिणाम शून्य तो ठरत असे…१ दु:खाची ती चटकती उन्हे,  संरक्षणाची छत्री येई कोणती तरी अदृष्य शक्ती,  त्यास वाचवोनी निघून जाई….२ दूर सारूनी षडरिपूला,  मनावरती ताबा मिळवी प्रेमभाव तो अंगी करूनी,  तपशक्तीला सतत वाढवी…३ तपोबलाचे बनूनी कवच,  फिरत होते अवती भवती दु:खाचे ते वार झेलूनी,  रक्षण त्याचे […]

काळ घेई बळी

जात असता गाडी मधूनी,  दुर्घटना ती घडली अचानकपणे एक दुचाकी, आम्हा पुढे धडकली प्रयत्न होऊनी योग्य असे, थोडक्यात निभावले वखवखलेल्या काळालाही, निराश व्हावे लागले. घिरट्या घालीत काळ आला,  झडप घातली त्याने वेळ आली नव्हती म्हणूनी,  बचावलो नशिबाने अपमान झाला होता त्याचा,  सुडाने तो पेटला थोड्याशाच अंतरी जावूनी,  दुजाच बळी घेतला. डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०  

1 71 72 73 74 75 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..