नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

काजळी धरल्या वाती

तेवत होती ज्योत दिव्याची, प्रकाश देवूनी सर्व जनां आनंदी करण्या आनंद वाटे, तगमग दिसे तिच्या मना, शांत जळते केंव्हां तरी,  भडकून उठते कधी कधी फडफड करित मंदावते,  इच्छा दाखवी घेण्या समाधी जगदंबेच्या प्रतिमेवरती,  प्रकाश टाकूनी हास्य टिपते हास्य बघूनी त्या देवीचे,  चरण स्पर्शण्या झेपावते अजाणपणाच्या खेळामधली,  स्वप्न तरंगे दिसूनी येती दिव्यामधले तेल संपता,  काजळी धरल्या दिसे […]

काळाची झडप

डोक्यावरी घिरट्या घालीत,  काळ सदा फिरतो वेळ साधतां योग्य अशी ती,  त्वरित झेपावतो…१ भरले आहे जीवन सारे,   संकटांनी परिपूर्ण घटना घडूनी अघटीत,  होऊन जाते चूर्ण…२ फुलांमधला रस शोषतां,  फूल पाखरू नाचते झाडावरती सरडा बसला,  जाण त्यास नसते…३ आनंदाच्या जल्लोशात कुणी, चालले सहलीला अपघात घडतां उंचावरी,  नष्ट करे सर्वाला…४ खेळी मेळीच्या वातावरणी,  हसत गात नाचते ठसका लागून […]

जीवन मरणाची शर्यत

शोभिवंत घर केले,  आधुनिक बनलो मी विविध वस्तू संग्राहिले, शोभा देण्या आले कामी शिरे व्याघ्र, हरणाची, लटकाविली भिंतीवरी झाडे रंगीत पानांची, कुंडीत शोभती बरी काचेचा मोठा टँक घेऊनी, पाण्याने भरला रंगीत मासे आंत सोडूनी, दिव्यानी प्रकाशिला रंगी बेरंगी आकर्षक मासे, चपळाईने पाण्यांत पोहती नयनाला ते मनोहर भासे, चित्त साऱ्यांचे वेधती खेळून भूक लागली,  हा विचार आला […]

जन्म स्वभाव

गोड शब्द बोबडे, लकब त्याची मनास आवडे, शब्दांची भासली जाण,  नव्हते भाषेचे अजुनी ज्ञान, भावनांचा उगम दिसला,  मनी व्यक्त होई हालचालीतूनी रागलोभ अहंकारादी गुण,  दिसून येती जन्मापासून देश-वेष वा जातही कुठली,  सर्व गुणांची बिजे दिसली हळूहळू बदले बाह्यांग जरी, उपजत गुण राही अंतरी प्रसंग घडता अवचित ,  बाह्य जगाला विसरतो उफाळून येती सुप्त भावना, मानवी धर्माच्या […]

पूजा तयारी

रोज सकाळीं प्रात: समयीं,  पूजा करी देवाची  । पूजे मधल्या विधीत,  चूक न होई कधी त्याची  ।। स्नान करोनी नेसूनी सोंवळे,  देव घरांत जाई । भाळी लावूनी गंध टिळा,  मंत्रपाठ गाई  ।। सहयोग देई पत्नी,  पूजा कर्मामध्ये त्याला  । आधींच उठोनी झाडूनी घेई,  स्वच्छ करी देव घराला  ।। करूनी सडा संमार्जन तेथें,  सारवोनी घेई जागा  । देवापुढती […]

प्रेम-स्वभाव

प्रेम-स्वभाव    असे ईश्वरी गुण मनीं ठसला हा    आत्म्यांत राहून प्रेम करावे वाटे    आंतरिक ही ओढ ज्याची मुळे खोल   पडने अवघड आपसांतील प्रेम    आत्म्यातील नाते न दिसता देखील    बांधलेले असते सर्व जीवाविषयीं    सहानुभूती भासे ह्रदयामध्ये ती     सुप्तावस्थेत दिसे आमचे राग लोभ    बाह्य संबंधामुळें षडरिपू विकार    शारीरिक सगळे वाईट गुणधर्म   देहाशीं निगडीत चांगले जे कर्म    आंतरीक इच्छेत राग […]

क्षण मुक्तीचा

तपसाधना करूनी मिळवी, सत्वगुणाची शक्ती अंगी  । त्याच शक्तीच्या जोरावरती, स्थान लाभे त्यांना स्वर्गी  ।। शक्ती ऱ्हास जे करिती त्याचा, सारे सुख आणि भोग भोंवतीं  । परिणामी तो फेकला जाऊनी, पुनरपी येई याच भूवरती  ।। एक दया दाखवी ईश्वर, वातावरणी देऊनी संधी  । जन्म मिळे ते त्याच ठिकाणी, कमविले पुण्य ज्याने आधी  ।। चक्र खेळ हा […]

कलेचे खरे मुल्य

पर्वत शिखरीं जाऊन    खोदून आणली माती कौशल्य पणास लावून   केला मी गणपती   ।।१।। मुर्ती बनली सुरेख    आनंद देई मनां दाम मिळेल ठिक   हीच आली भावना ।।२।। घेऊन गेलो बाजारीं   उल्हासाच्या भरांत कुणी न त्यासी पसंत करी   निराश झालो मनांत ।।३।। बहूत दिवस प्रयत्न केला    कुणी न घेई विकत कंटाळून नेऊन दिला    गणपती मी शाळेत ।।४।। भरले […]

काळाची चाहूल

जो जो येईल पाया खालती, तुडविला जातो त्याचक्षणी कुणी मरावे अथवा जगावे, सारे प्रभूवर अवलंबूनी….१, भक्ष्य शोधण्या किटक चाले, तसाच फिरतो प्राणी देखील जगण्यासाठी फिरत असता, मृत्यूची येते त्याला चाहूल…२, चालत असतो काळ सदैव, दाही दिशांनी घिरट्या घालीत झडप घाली अचानक तो,  जो जो येई त्याच्या टापूत…३, जरी दिसे मारक कुणीतरी,  करवूनी घेतो काळच सारे विश्वाचा […]

शांततेचा शोध

मनाची शांति । मिळेना कुणा कुठें शोधूं ती । प्रश्न सर्वांना ।। जीवन ध्येय । शांततेसाठीं प्रयत्न होय । त्याच्याच पाठी ।। शांतीचे घर । अंतःकरण नसे बाहेर । कधीं चूकून ।। शत्रू शांतीचा । अशांति असे ठिकाणा त्याचा । बाह्यांत वसे ।। विरोधी दोघे । दूर राहती । वाईट बघे । एकमेकाती ।। अशांत वाटे […]

1 72 73 74 75 76 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..