नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

कविता स्फूर्ति

पूर्णपणें मज पटले आतां कविता कुणी करवून घेतो कोण असेल तो माहित नाहीं मजकडून तो लिहून घेतो घ्यानी मनीं कांहींही नसतां विषय एकदम समोर येतो भाव तयांचे जागृत होऊन शब्द फुले ती गुंफून जातो एका शब्दानंतर दुसरे आणि तिसरे, लगेच चौथे शब्दांची ती भरुनी ओंजळ माझ्या पदरीं कुणी टाकतो गुंफण करुनी हार बनता त्याजकडे मी बघत […]

वर्तमानीच करा

नियोजनाच्या लागून मागें,  भविष्याची आखतो चौकट कल्पकतेच्या आहारी जावून, चालण्या विसरे पावूल वाट….१, अनेक वाटा दिसूनी येती,  भविष्यामधळ्या कल्पकतेला वर्तमान त्या काळाकरिता,  जावे लागते एकाच दिशेला…२, उठूनी करा त्याच क्षणीं ते,  वृत्ति असावी अशीच सदा उद्यांवरती कार्य टाकतां,  मनीं उमटती विचार द्विधा…३, वर्तमान हा निश्चीत असता,  यश लाभते अनेकदा केवळ तुमची बघुनी धडपड,  साथ देईल ईश्वर […]

तमोगुण

राज्य तमाचे येथें    बाह्य जगावरती म्हणून दिसे आम्हां   विध्वंसक प्रवृती नाश करण्यासाठीं   शक्तिच हवी येथे हेच रुप शिवाचे   समजण्या अवघड जाते जागा करु देई   नविन घटनाना चक्र कसे चालेल   न मिटवता त्यांना — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५०

बहिरा ऐके कीर्तन

गम्मत वाटली प्रथम मजला       बहिरा ऐके कीर्तन अश्रू वाहू लागले माझे नयनी      भाव त्याचे जाणून नियमित येई प्रभूचे मंदिरी         श्रवण करी कीर्तन केवळ बघुनि वातावरण ते          तल्लीनच होई मन सतत टिपत होते मन त्याचे        इतर मनांचे भाव केवळ जाणण्या भगवंताला           डोळे आतुर सदैव रोम रोमातून शिरत होत्या           प्रभू निनाद लहरी संदेश प्रभूचा पोह्चूनी                  आत्म्यास जागृत करी होऊन गेला प्रभूमय बहिरा            धुंद त्या वातावरणी ऐकत […]

दयेची दिशा

निसर्ग नियमें दया प्रभूची,  सदैव बरसत असते  । दयेचा तो सागर असता,  कमतरता ही पडत नसते  ।। अज्ञानी ठरतो आम्हींच सारे,  झेलून घेण्या तीच दया  । लक्ष्य आमचे विचलित होते,  बघून भोवती फसवी माया  ।। उपडे धरता पात्र अंगणीं,  कसे जमवाल वर्षा जल  । प्रयत्न सारे व्यर्थ जाऊनी,   निघून जाईल वेळ  ।। भरेल भांडे काठोकाठ , […]

स्वप्नातली अपूरी इच्छा

दुपारचे ते भोजन करूनी, आडवा झालो थोडासा झोप लागूनी त्याच क्षणी, थंडावल्या साऱ्या नसा….१, वाम कुक्षीच्या आधीन जाता, जग विसरलो सारे स्वप्न पडूनी सुंदर मनी, वाटे आनंद देणारे…..२, पाटी-पुस्तक हाती घेवूनी, पोषाख घाली शाळेचा घेवूनी गेलो कन्येस माझ्या, नाद जिला शिकण्याचा….३, खूप शिकूनी मोठी होईन, बाबा तुमच्या एवढी खावू पुस्तक खेळणी आणा, बडबडीत तिच्या गोडी….४, आई […]

पावन हो तू आई

पावन हो तू आई पावन हो तू आई तव चरण शरण येई   ।।धृ।। संसाराचा खेळ मांडला खेळविसी तूं मजला थकूनी मी जाई   ।।१।। पावन हो तू आई तव चरण शरण येई रात्रंदिनीं ध्यास लागला जीव माझा तगमगला झोप तर येतच नाही   ।।२।। पावन हो तू आई तव चरण शरण येई आळवितो मी तुजला विसरुनी देहभानाला नयनी […]

माझा मीच गुरू

मीच माझा गुरू,  जे मनी ठरवू विचारांती तेच करू ….।।धृ।। सल्ला घेईन सर्वांचा,  वाटे मज किंमतीचा मनाची कदर करूं…१ मीच माझा गुरु निर्णय असे अनेक,  सारेच असती ठिक निवड एकाची करूं…२ मीच माझा गुरु, इतरांना जे वाटते,  माझ्या सोईचे नसते सोईचा आग्रह धरूं…३ मीच माझा गुरू शेवटीं माझ्या करिता,  गोष्टीची उपयोगिता स्वतःसाठीं योग्य करू…४ मीच माझा […]

उभारी

कोपऱ्यांत तो पडला होता,  शरिर जर्जर होऊन जरी झाला हतबल देह,  सदैव उत्साही त्याचे मन…१, झगडा देवूनी आयुष्याशीं,  जीवनाचे घरकूल बांधले सुख दु:खाच्या विटा चढवूनी,  त्याग श्रमाचे लिंपन केले…२, कर्तृत्वाचे शब्द उमटती,  घरकूलाच्या भिंती मधूनी जगण्यासाठी उभारी देती,  इच्छा शक्तीस जागवूनी…३, गतकाळाच्या आठवणी त्या,  जगण्याचा तो ठेवा बनला सार्थकतेच्या जाणीवेनें,  अंत दशेतील क्लेश विसरला…४ — डॉ. […]

आत्मा हाच ईश्वर

आत्म्याला ओढ असते     ईश्वराच्या मिलनाची जाण सदेव राहते     प्रभुमय स्वरुपाची   ।।१।। अंशात्मक भाग असे    आत्मा हा परमात्म्याचा उत्कंठ ते  आकर्षण     गुणस्वभाव तो त्याचा   ।।२।। आत्म्यास पडले असे    बंधन ते शरीराचे जीवन कार्ये करुनी    प्रयत्न करी मुक्तीचे   ।।३।। मुक्त होई त्या क्षणीं    अनंतात सामवतो परमेश्वरि रुपांत    विलीन होऊन जातो   ।।४।। आत्मा मुक्त होत असे     देहकर्म फळावर […]

1 73 74 75 76 77 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..