आकाशातील कापूस
कपाशीचे ढिग अगणित विखुरले दिसती आकाशीं मानव येथें उघडा असूनी वस्त्र अपुरें दिसे अंगाशी ।।१।। कोठे आहे कापड गिरणी वस्त्र जेथें बनत असें दयावान तूं मालक असतां त्रोटक कापड निघे कसे ।।२।। पाठव तूं तो वस्त्रांचा कोठा लाज राखण्या मानवाची गरिब बिचारा विवस्त्र तो किव करावी वाटे त्याची ।।३।। डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com