नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

निरागस जीवन

प्रफुल्लित ते भाव वदनी,  घेवूनीं उठला सूर्योदयीं गत दिनाच्या आठवणी नव्हत्या,  आज त्याच्या मनांत कांहीं…१ खेळत होता दिवसभर तो, इतर चिमुकल्या मित्रांसंगे खाणें पिणें आणिक खेळणें,  हीच तयाची जीवन अंगे…२ सांज होता काळोख येवूनी,  निश्चिंतता ही निघूनी गेली भीतीच्या मग वातावरणीं,  कूस आईची आधार वाटली..३ निद्रेच्या तो आधीन होतां,  निरोप घेई शांत मनाने येणाऱ्या त्या दिवसा […]

‘ तन्मयतेत’ आनंद – प्रभू

सतत गुंतलो आहो सारे शोध घेण्यास त्या ‘आनंदाला’ युगानूयुगे प्रयत्न होतो मिळवण्यासाठींच प्रभूला…१ बाह्य जगाचे सुख आगळे लागले सारे त्याच्या पाठीं ‘देह सुख’ अंतीम वाटे, खरा ‘आनंद’ देण्यापोटी…२ ‘ज्ञानामध्ये’ भरला  ‘आनंद’ समजूत झाली ही कांहींना लेखक, कवी, साहीत्यिक हे पाठ त्याची कांहीं सोडीना…३, साधू संत हे थोर महात्मे आनंद शोधूती ‘विश्रमांत’ ‘ध्यान’  लावून एक मनानें शांत […]

जगाचा निरोप

काळ येतां वृद्धपणाचा,  विरक्तींची येई भावना । निरोप घेण्या जगताचा,  तयार करीत असे मना  ।।१।। वेड्यापरी आकर्षण होते,  सर्व जगातील वस्तूंवरी । नाशवंत त्या, माहित असूनी,  प्रेम करितो जीवन भरी ।।२।। जीवनांतील ढळत्या वेळीं,  जेव्हां वळूनी बघतो मागें । मृगजळासाठीं धावत होतो,  जाणून घेण्या सुखाची अंगे ।।३।। प्रयत्न केले जरी बहूत,   हातीं न लागे काहीं । […]

वेळ दवडू नका

रंग भरले जीवनीं,  रंगात चालतो खेळ टप्प्या टप्प्याच्या नादानें,  जाई निघूनीया काळ….१, शिखरावरचे ध्येय,  दुरुनी वाटते गोड लांब लांब वाट दिसे,  जाणें तेथे अवघड……२, ठरलेल्या वेळेमध्ये,  जातां योग्य दिशेनें यश पदरीं येईल,  निश्चींच रहा मनानें….३, रमती गमती कुणी,  टप्प्यांत रंगूनी जाती वेळ सारा दवडूनी,  निराशा पदरी येती…४, जीवनातील अंगाचे,  अनूभव घेत जावे मिळणाऱ्या त्या सुखाला,  क्षणीक […]

बदलते भाव

कसा वागतो दोन प्रकारे,  दिसून सर्वा येतो राग दाखवी क्षणात,  आणि प्रेमळ ही वाटतो….१ देहस्तरावरले प्रश्न सारे,  सुख-दु:खानी भरले अंतर्मनातील भाव परि,  आनंदीच वाटले….२ देहाशी त्या येवून संबंध,  राग लोभ दाखवी केवळ त्यातील आनंद शोषण्या,  अंतरात्मा शिकवी…३ जड होता पारडे एकाचे,  भाव येई दिसून भावांचे ते रंग बदलती,  अंतर बाह्यावरून…४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com   […]

बेताल स्वछंदीपणा

काढूनी झाडाच्या सालींचा    आडोसा घेतला ज्या कुणीं स्वांतंत्र्याच्या कल्पनेला      बंधन पडले त्या  क्षणीं   ।।१।। नग्नपणें फिरत होता    श्र्वानासारखा चोहींकडे सुसंस्कृतीची जाण येतां    स्वच्छंदाला बाधा पडे    ।।२।। स्वतंत्र असूनी देखील    पडते  परिघ भोवती जीवन जगण्या करितां    बंधने ती कांहीं लागती    ।।३।। स्वांतत्र्याची  तुमची व्याप्ती     असावी  दूजांना जाणूनी दिव्य करण्याच्या ईर्षेने    संस्कृतीस होइल हानी   ।।४।। ओंगळपणाचे […]

दुःख कसे विसरलो

काय केले दुःख विसरण्याला मुक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला   ।।धृ।। निराशेच्या काळांत दुःख होते मनांत हार झाली जीवनांत शांत राहण्याचा मार्ग, त्यावर शोधला   ।।१।। मुक्ति जमली नामीं, आनंद आणण्याला चूक राई एवढे दुःखाचा पर्वत पडे मनीं पश्चाताप घडे भोग भोगण्या, झालो तयार   ।।२।। मुक्ति जमली नामीं आनंद आणण्याला   एकाग्र चित्तांत जातां ध्यानांत डूबता आनंदात विसरुन […]

माझा चड्डीयार – भाग- २

 हीच डॉ. मारुती शंकरराव अतकरे व डॉ. भगवान केशवराव नागापूरकर  यांच्या मित्रत्व रोपणाची प्रथम पायरी. जी पुढे पुढे जात समांन्तर चालत गेली.  आज वयाची पंचाहत्तरी पुर्ण करीत पुढे जात आहे. वयानी जरी शारिरीक दुर्बलता दाखवण्यास सुरवात केली असली,  तरी आमची मने आजही टवटवीत आहेत. […]

जन्मापूर्वी चाऱ्याची योजना

योजना करी चाऱ्याची, मुख देण्याचे आधी, तुझ्या दयेची किमया, कळली न कुणा कधीं….१, बदल करूनी शरिरी, मातृत्वाचे भरतो रंग, क्षिराचा देई साठा, पुलकित करूनी अंग…२, सदैव तयार राहूनी, दाना देई भूमाता, कुणी न उपाशी राही, काळजी घेई विधाता….३, जन्म देवूनी साऱ्यांना, पोषण तोच करितो अनंत उपकार करूनी, ऋणी आम्हा ठेवतो…४ डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

सूड वलय

उत्साहाने आला होता,  मुंबई बघण्याकरिता रम्य स्थळांना भेट देणे,  ही योजना मनी आखता मान्य नव्हती त्याची योजना,  नियतीच्या चाकोरीला पाकीट पळवूनी त्याचे,  घाला कुणीतरी घातला, धन जाता हाता मधले,  योजना ती बारगळली अवचित त्या घटनेने,  निराशा तेथे पसरली, जात असता सरळ मार्गी,  दुष्टपणाला बळी गेला समाजाला धडा शिकवण्या,  सूडाने तो पेटून गेला, वाम मार्गी जावून त्याने, […]

1 78 79 80 81 82 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..