नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

मान्य मला ती सजा, प्रभु तु देशी

मान्य आहे मजला वाल्या कोळी बनणे खून लागल्याचा डाग लागला परी उद्धरुन जाणें ।।१।। लुटालूट करुनी देह वाढविला राम नाम जपूनी पावन तो झाला  ।।२।। प्रभू कृपा होऊनी महा कवी बनला वाल्मिकी ऋषी बनूनी रामायण ग्रंथ रचिला  ।।३।। वाहून गेला पाप भाग तप प्रवाहाच्या वेगांत धुवूनी गेला डाग जलाशयाच्या ओघांत  ।।४।। वाईट घटना घडते त्यास भोग […]

बाबाची आई

एक होती म्हातारी,  ती  सर्वांना धारेवर धरी उपास तापास नी सोवळ ओवळ त्रस्त केल तीन घर सगळ तिच्यापुढे चालेना कुणाच काही कारण  ती बाबांची होती आई. — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com    

प्राण ज्योत

दिवा होता छोटासा, एक मजकडे इन्धन मिळतां तेलाचे, प्रकाश तो पडे तळांत होती योजना, तेल सांठवण्याची शिरीं असूनी वात ती, क्रिया चाले जळण्याची छिद्र पडतां तळाला, व्यर्थ जाई इंधन मंदावली ज्योत दिव्याची, शक्ती ती जावूनी देह आहे दिव्यासारखा, चैतन्य तेज तयाचे प्रकाश फेकी आनंदाचा, इंधन मिळतां शक्तीचे केंद्रित होते देह उर्जा, नाभीच्या भोवतीं व्यय टाळून प्रवाही […]

एक सुंदरी

बस मधून चाललो होतो मी,  शेजारी होती जागा रिकामी येवून बसली जवळ एक सुंदर, चंचल तरूण बालीका तिला बघून मनाची खुलली कलीका तरीही मी एका क्षणांत माझी जागा बदलली बरका कारण ती हासत मुरकत म्हणाली “  थोडसं, सरकता का तिकडे काका ? ” — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

विधी लिखीत

विधी लिखीत असे अटळ   त्याच प्रमाणे होई निश्चित कोण बदले मग काळाला    प्रभूचा सहभाग असे ज्यांत  ।।१।। राम राज्याभिषेक समयीं   असता सर्वजण आनंदी राज्य सोडूनी वनी जाईल   जाणले नव्हते कुणी कधीं   ।।२।। नष्ट करुनी सर्प कुळाला   तक्षकावरही घात पडे परिक्षिताचे प्रयत्न सारे   फिके पडती नियती पुढे   ।।३।। आकाशवाणीचे शब्द ऐकतां   हादरुनी गेला कंस मनीं काळाने त्या […]

मॉर्डन तरूण

अगदी मॉर्डन कॉलेज कुमारांचे बसले एक टोळके गाडीत समोर हासत होते, खिदळत होते,  गप्पा मारीत होते, ऐकण्यासारखे होते परंतु सांगण्यासारखे नव्हते. स्टेशन येताच सारे उतरले तेव्हा मी एकास विचारले “आपल नाव सांगता ?” उतरता उतरता ऐकू आले “ मी आहे मिस निता ” — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

सदृढ शरिरी चिंतन

योजना तुमची चुकून जाते,  जीवनाच्या टप्प्याची अखेरचा क्षण जवळीं येतां,  आठवण होते त्याची जोम असतां शरिरीं तुमच्या,  करिता देहासाठीं वृद्धत्वाचा काळ तुम्हीं ठेवता,  प्रभू चिंतना पोटीं गलित होऊनी गेली गात्रे,  अशांत करी मनां एकाग्रचित्त होईल कसे तें,  मग प्रभू चरणां दवडू नका यौवन सारे,  ऐहिक सुखामागें त्या काळातील प्रचंड ऊर्जेस,  लावा प्रभूचे मार्गे सदृढ असते शरीर […]

हे कराल का ?

कशासाठी जगतो आपण, विचार तुम्हीं करतां कां ? मृत्यू येई तो जगावयाचे,  हेच धोरण समजतां कां ? खाणे – पिणें वंश वाढविणे, हेच जीवन असते कां ? ऐष आरामी राहूनी तुम्ही, देहासाठी सारे, हे मानता का ? पाठीं लागूनी धनाच्या त्या, बरोबर संपत्ती न्याल कां ? पैसा मुलांसाठी ठेवून ही, शिव्या त्यांच्या चुकवाल कां ? सारे […]

चिठ्ठीवरला मजकूर

टेबलावर ठेवले होते बॉसने काहीतरी लिहून हाताखालच्या लोकांनी निरनिराळे अर्थ काढले त्यातून कुणास काहीच समजेना, म्हणून असिस्टटने केली विचारणा चिठ्ठी वाचून बॉस म्हणाले मला काय म्हणावयाच होत तेव्हा, समजत नाही आता, ती आहे एक नवकविता — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० bknagapurkar@gmail.com

जीवन परिघ

एक परिघ ते आंखले आहे विधात्याने विश्वाभोवतीं जीवन सारे फिरत असते एक दिशेनें त्याचे वरती   १ वाहण्याची ती क्रिया चालली युगानुयुगें ह्या जगतीं कुणी ना सोडी लक्ष्मण रेखा एकांच परिघात सारे फिरती   २ जेंव्हां कुणीतरी थकून जाई दुजा उठोनी मदत करी जीवन मरणाची शर्यत जिंकण्यासाठीं तो लक्ष्य धरी   ३ मध्य बिंदूच्या स्थानीं बसूनी नियंत्रित कुणी करी […]

1 82 83 84 85 86 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..