होळीत जाळा दुष्ट भाव
एकत्र येऊं सारेजण विसरुन जाऊ भेदभाव जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //धृ// ऐष आरामांत राहून देह झाला मलीन शरीर सुखासाठी करती नाना खटपटी आज आहे सण होळीचा नष्ट करा ऐहिक भाव जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव //१// मन असे चंचल भारी सर्व दिशेने घेई भरारी राग लोभ अहंकार मनाचे तर हे विकार […]