नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

कीटकाचे ब्रह्मांड

कीटक ते लहान असूनी रहात होते फळामध्यें विश्व तयाचे उंबर फळ जीवन घालवी आनंदे   १   ब्रह्मांडाची त्याची व्याप्ती उंबराच्या नसे पलिकडे ज्यासी ते अथांग समजले बघूनी त्या एका फळाकडे   २   माहित नव्हते त्या कीटकाला झाडावरची अगणित फळे सृष्टीतील असंख्य झाडे कशी मग ती त्यास कळे   ३   आपण देखील रहात असतो अशाच एका फळावरी […]

कृपा तुजवरती

कृपा होऊनी शारदेची, कवित्व तुजला लाभले शिक्षणाच्या अभावांतही, भावनांचे सामर्थ्य दिसले ।।१।।   कुणासी म्हणावे ज्ञानी, रीत असते निराळी, शिक्षणाचा कस लावती, सर्व सामान्य मंडळी ।।२।।   कोठे शिकला ज्ञानोबा, तुकोबाचे ज्ञान बघा, दार न बघता शाळेचे, अपूर्व ज्ञान दिले जगा ।।३।।   जिव्हेंवरी शारदा, जेव्हा वाहते प्रवाही, शब्दांची गुंफण होवूनी, कवितेचा जन्म होई….४   भाव […]

शब्दाची ठिणगी

ठिणगी पडूनी पेटे ज्वाला,   आकाशाला जावूनी भिडती नष्ट करूनी डोंगर जंगल,    हा: हा: कार तो माजविती…१   शब्दांची ही ठिणगी अशीच,   क्रोधाचा तो वणवा पेटवी मर्मघाती तो शब्द पडतां,   अहंकार तो जागृत होई…२,   सूड वृत्तीचा जन्म होवूनी,    वातावरण ते दुषीत होते संघर्षाचा अग्नी पेटूनी ,   जीवन सारे उजाड करिते…३,   कारण जरी ते असे क्षुल्लक,   […]

भीतीपोटी कर्म करता

भीतीपोटी सारे करतां असेच वाटते….।।धृ।। विवेकानें विचार करा, तुम्हांस हे पटते   त्रिकाळ चाले पूजा अर्चा प्रभूविषयी होई चर्चा बालपणींच पडे संस्कार सारे देण्या समर्थ ईश्वर कृपे वाचूनी त्याच्या, तुम्हां सुख दुरावते….१ भीतीपोटी सारे करता, असेच वाटते,   चूक असे हे ठसें मनाचे कर्म ठरवीं तुम्हींच तुमचे सहभाग नसे यात प्रभूचा सारा खेळ असे तो मनाचा […]

कवीची श्रीमंती

खंत वाटली मनास    कळला नसे  व्यवहार  । शिकला  सवरला परि    न जाणला संसार  ।। पुढेच गेले सगे सोयरे   आणिक सारी मित्रमंडळी  । घरे बांघूनी धन कमविले   श्रीमंत झाली सगळी  ।। वेड्यापरी बसून कोपरी   रचित होता कविता  । कुटुंबीय म्हणती त्याला   कां फुका हा वेळ दवडीता  ।। सग्यांच्या उंच महाली   बैठक जमली सर्व जणांची  । श्रेष्ठ पदीचा […]

श्रीरामाची शिवपूजा

हरि हराचे पुजन करतो  । दृष्य दिसे बहुत आगळे  ।। प्रभूकडूनी प्रभूची सेवा  । सर्वजणां ही किमया न कळे  ।। १   शिवलिंगापुढती ध्यान लावी  । डोळे मिटूनी प्रभू श्रीराम  ।। सुंदर सुबक चित्रामध्ये  । व्यक्त होई ह्रदयातील प्रेम  ।। २   श्रीराम प्रभूच्या पूजेवेळीं  । आत्मरुप उजळून आले  ।। शिवलिंगातील रामस्वरुप  । एक होऊनी मग […]

ईश्वराची बँक

प्रभूंनी बँक काढली    उघडा खाते ठेवा पूंजी आपली    आणा सुख जीवनाते  ।।१।। जेवढे गुंतवाल    मिळेल व्याजा सहित दरा विषयीं     तो आहे अगणित  ।।२।। ही बँकच न्यारी    तुम्हां न दिसेल कोठे धुंडाळूं नका संसारी    होईल दुःख मोठे  ।।३।। पाप पुण्याची ठेव    जमा करिते बँक जसा असेल भाव     तशी देईल सुख दुःख  ।।४।। गरज पडतां धन मिळणे   हे […]

राधेचे मुरली प्रेम

मुरलीच्या सुरांत विसरली राधा सर्वाला कुज  बूज करुनी जन समजती वेडी ते तिजला   त्या सुरात कोणती जादू ती किमया कशी मी वदू सप्त सुरांचा निनाद उठुनी खेचून घेती चित्ताला – – – विसरली राधा सर्वाला   धेनु वत्से बावरली बाल गोपाल आनंदली रोम रोम ते पुलकित होऊनी माना डोलती सुरतालाला – – – विसरली राधा सर्वाला   प्रभूचा होता ध्यास मनी ती बघे हरिला रात्रन दिनी जे शब्द निघाले मुरलीतूनी हाका मारती  ते तिजला  – – […]

निरोगी  देही नामस्मरण

निरोगी असतां तुम्ही, नामस्मरण करा प्रभूचे, ठेवू नका उद्या करीता, महत्व जाणा वेळेचे ।।१।।   शरिराच्या नसता व्याधी, राहू शकता आनंदी, आनंदातच होऊ शकते, चित्त एकाग्र ते ।।२।।   व्याधीने जरजर होता , चित्त होई अस्थीर, स्थिरतेतत दडला ईश्वर, जाणता येतो होऊनी स्थीर ।।३।।   डॉ. भगवान नागापूरकर  

वेळ – ( TIME )

वेळेच्या चक्राचा विचार करता कळते, की वेळ ही तीन भागांत वाटली गेली आहे. भविष्य भूत आणि वर्तमान ह्या संकल्पनात. भविष्य हा येणारा काळ. तो अनिश्चीत असतो. म्हणून असत्यात जमा होतो. भूतकाळ हा गेलेला, आता हाती न लागणारा. म्हणून अनिश्चीत होय. त्यालाही असत्य समजले गेले. वर्तमान काळ फक्त निश्चीत, अस्तित्वाची जाणीव देणारा, म्हणून सत्य समजला जातो. […]

1 7 8 9 10 11 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..