नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

श्रद्धांजलि ।

सुळीं दिले येशूला   वेडेपणाच्या भरांत खिळे ठोकले अंगाला   रागाच्या ओघांत   ।।१।। समर्पण केले देहाचे   परि न सोडी ध्येय बलिदानाच्या मार्गाचे   हेच महत्व होय   ।।२।। सुळावरी तो जातांना   वदला आकाशी बघूनी क्षमा कर प्रभू त्यांना    ते आहेत अज्ञानी   ।।३।। कळले नाहीं ज्ञान   अज्ञान सागरांत जाणले तत्वज्ञान    उशीर केला त्यांत   ।।४।। उपयोग नाही आतां   वेळ गेली निघूनी जाण […]

भाव जाण तू देवा

कर पडले चरणीं भाव जाण तू देवा   ।।धृ।।   देह झुकला तुझ्या पुढती लिनतेनें मान वाकती मनाची करूनी एकाग्रता भावनेला वाट देतां अश्रू दाटले नयनी  अंतरीचा दिसे ओलावा    १ कर पडले चरणी   भाव जाण तू देवा,   प्रथम येई भावना, जागृत करते ती मनां मनाचा ताबा देहावरी तोच तुजला प्रणाम करी घे प्रभू तू जाणूनी   अत:करणातील […]

वेळेची किमया

वेळ येता उकलन होते,   साऱ्या प्रश्नांची जाणून घ्या हो थोडे तुम्ही,  रीत निसर्गाची…१, जेंव्हां तुम्हाला यश ना मिळते, एखाद्या प्रश्नी, वेळ नसे योग्य आली,  हेच घ्यावे जाणूनी…२, प्रयत्न सारे चालूं ठेवतां,  यश ना मिळे कांहीं काळासाठी थांबवा,  प्रयत्न सगळे…३, काळ लोटतां प्रयत्न होती,  पुनरपि सारे, उकलन होवून गुंत्यांची,  आख्खे निघती दोरे…४, कुणी म्हणती ग्रह अनूकुल,  ह्या […]

मला देव दिसला !

परमात्म्याच्या (ईश्वराच्या) अस्तित्वाचा शोध, त्याच्या भव्यतेची, दिव्यतेची जाणीव होण्यासाठी, त्याला समजण्यासाठी, अनुभवण्यासाठी त्याची प्रचिती येण्यासाठीचे प्रयत्न गेली ५० वर्षे चालू होते. सर्व मार्गानी जाऊन त्याबद्दलचे ज्ञान घेण्याचा प्रयत्न होत होता. […]

सत्व रज तमो गुण

त्रीभाव युक्त जीवन,  सत्व रज तमो गुण स्वभावाची अंगे तीन, सर्वात दिसून येती…१, कांहीं असे सत्वगुणी, कांहीं असे रजोगुणी, काही मध्ये तमोगुणी निराळ्या प्रमाणीं दिसे….२, प्रेम, दया, क्षमा, शांति, कांहींचे अंगी वसती सत्वगुण लक्षणें ती,  कांहींत दिसून येई….३, राग, लोभ, अहंकार,   षडरिपू हेच विकार त्यांतच तो जगणार,  तमोगुण वाढवून….४ सत्व तमोगुणी पूर्ण,  मिळणे फार कठीण दोन्ही […]

दोन मनें द्या प्रभू

दोन मनें द्या प्रभू आपल्याला इच्छा आहे प्रभू तुमच्या नामस्मरणाची परंतू ऐकून घ्या कहाणी आमच्या अडचणींची   ।। नाम घ्यावे मुखीं रात्रंदिनीं एकचित्ताने सार्थक होईल तेव्हां आमची तप:साधने   ।। परि संसार पाठी, लावला आहेस तूं गुरफटल्यामुळें त्यांत साध्य न होई हेतू  ।। मला पाहिजे दोन्हीं संसारात राहून ईश्वर एकात गुंततां मन दुसरे न होई साकार  ।। दे […]

जनटीका

घोड्यावरती बसू देईना,  चालू देईना पायी जगाची ही रीत बघा ,  कशी समजत नाही ..१, सज्जनतेची वस्त्रे लेवूनी,  निर्मळ जीवन आले आपण बरे नी काम बरे,  तत्व हे अंगीकारले…२, मोठा झाला शिष्ठ समजोनी,  वाळीत टाकीले मला दुष्कृत्यामध्ये साथ हवी,  त्यातील कांहीं व्यक्तीला…३, जीवन जगणे कठीण होता,  मार्ग तो बदलला आगळी धडपड करून ती,  यश मिळाले मला….४, […]

आत्म गुरू

गुरूचा महीमा थोर | उघडूनी जीवनाचे द्वार || सांगूनी आयुष्याचे सार | मार्ग दाखविती तुम्हां ||१|| वाटाड्या बनूनी | भटकणे थांबवूनी || मार्गासी लावूनी | ध्येय दाखवी तुम्हां ||२|| न कळला ईश | न उमगले आयुष्य || दु:ख देती जीवन पाश | बिना गुरू मुळे ||३|| अंधारातील पाऊल वाट | ठेचाळण्याची शक्यता दाट || प्रकाशाचा किरण […]

खरा एकांत

निसर्गाचा अप्रतिम ठेवा,   नदीकाठच्या पर्वत शिखरीं  । बाह्य जगाचे वातावरण,   धुंदी आणिते मनास भारी  ।।१।।   त्याच वनी एकटे असतां,   परि न लाभे एकांत तुम्हांला  । चित्तामध्यें वादळ उठतां,   महत्त्व नव्हते बाह्यांगाला  ।।२।।   खडखडाट सारा होता,    दैनंदिनीच्या नित्य जीवनी  । समाधानी जर तुम्हीं असतां,   शांतता दिसते त्याच मनीं  ।।३।।   एकांततेची खरी कल्पना,   मनावरती अवलंबूनी  […]

बहिणीची एक इच्छा

विसरू नकोस मजला    माझ्या भाऊराया नाते अतूट असते      घे, हे समजुनिया आठव सारे बालपण     कसे गेले खेळांत भांडत होतो, रुसत होतो    सारे केले प्रेमांत ओवाळणीची तुझी सुपारी     ठेवली मी जपुनी आठवण होता तुझी मजला    काढून बघते पेटीतुनी जाणीव  आहे मजला      संसार  जीवनाची कर्तव्ये पडली शिरावरी    तुझाच संसाराची खूप प्रेम दे वाहिनीला    संसार कर सुखाने काढून ठेव अल्पसे प्रेम   देण्या मज त्या साठ्यातुनी वर्षातून  एके दिवशी    बांध राखी प्रेमाची […]

1 93 94 95 96 97 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..