एक शोषन
शोषून शोषून जमविता, झुरुन झुरुन मरुन जाता पैशांनी भरलेल्या पिशव्या फाटून जातील हाती राहिल ते पिशव्यांचे वस्त्र तुमची आसवे पुसण्यासाठी डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० Bknagapurkar@gmail.com
शोषून शोषून जमविता, झुरुन झुरुन मरुन जाता पैशांनी भरलेल्या पिशव्या फाटून जातील हाती राहिल ते पिशव्यांचे वस्त्र तुमची आसवे पुसण्यासाठी डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० Bknagapurkar@gmail.com
जेव्हा दुजाचे नुकसान होते, उत्सुक दिसे कुणी स्वभावाची ही विकृती जाणता, खंत वाटली मनी बागेमध्ये फिरत असता, फूल तोडतो अकारण सुगंध त्याचा क्षणीक घेवूनी, देतो ते फेकून हाती देता सुंदर खेळणी, तोड मोड करिते लहान बालक खेळण्यापेक्षा, तोडण्यात दंग होते लय पावणे प्रतिक शिवाचे, ईश्वरी असतो गुण ‘नष्ट करणे’ निसर्ग स्वभाव, हे घ्या तुम्ही जाणून. […]
कवि होणें सुलभ असावे रसिक होण्यापरि जिवंत ठेविती कवितेला हीच मंडळी खरी ।।१।। भावनेचे उठतां वादळ व्यक्त होई शब्दानीं भाव शब्दांचा हार दिसतो काव्य ते बनूनी ।।२।। भाव येणे सहज गुण तो मानवी मनाचा परि बंदिस्त त्याला करणे खेळ हा कवीचा ।।३।। शब्द पिंजरा नि भाव पक्षी ओळखी को रसिक कवि मनाशीं ‘स्व’ भावांचे करी […]
जेव्हां मी म्हणतो माझे, सोय माझी असते त्यांत, देह जगविण्या कामीं, प्रयत्न हे सारे होतात….१, देह वाटते साधन, प्रभूकडे त्या जाण्याचे, त्यासी ठेवतां चांगले, होते चिंतन तयाचे…..२ भजन करा प्रभूचे, सूख देवूनी देहाला परि केवळ सुखासाठीं, विसरूं नका हो त्याला……३, देह चांगला म्हणजे, ऐश आरामीं नसावे, ती एक सोय असूनी, त्यांने प्रभू मिळवावे…..४ […]
मरूनी पडला एक प्राणी, जंगलामधल्या नदी किनारी । कोल्ही कुत्री आणि गिधाडे, ताव मारती त्या देहावरी ।।१।। एके काळी हेच जनावर , जगले इतर जीवांवरी । आज गमवूनी प्राण आपला, तोच दुजाची बने भाकरी ।।२।। निसर्गाचे चक्र कसे हे , चालत असते सदैव वेगे ।। एक मारूनी जगवी दुजाला, हीच त्याची विशेष अंगे ।।३।। डॉ. […]
कुठे शोधू तुला, ध्यास लागला मनी वाटे मजला, तू बसलास लपुनी इंद्र धनुष्याचे रंग, आकर्षक वाटती बघण्यात दंग, लक्ष वेधुनी घेती ओढ्याची झुळझुळ, पडे कानावरी ऐकून नाद मंजुळ, मना वेडे करी फुलातील गंध, तल्लीन करी मना होऊनी मी धुंद, विसरे सर्वाना फळातील रस, देई मधुर स्वाद उल्हासी मनाला, देऊनी आनंद वाऱ्याची झुळूक, रोमांचकारी […]
रस्त्याच्या वळणावर भाजी विक्रेत्याची गाडी बघीतली. बरीच गर्दी होती. एक वयस्कर ग्रहस्थ भाजी गिऱ्हाकाना देत होते. त्या ग्रहस्थाना बघताच आश्चर्याचा धक्का बसला. कल्पना करु शकत नव्हतो, विश्वास वाटेना. अतिशय परिचीत व्यक्ती होती. लगेच बाजूस झालो. त्या व्यक्तीला न्याहाळू लागलो. ते डॉ. विकास जोशी होते. २०-२२ वर्षापूर्वी निवृत्त झाले होते. शासकिय रुग्णालयाचे प्रमुख होते. कुशल सर्जन, व्यवस्थापक, […]
संतुलन करूनी चालवी, निसर्गाचा खेळ सतत । जन्ममृत्यूची चाके फिरवी, एकाच वेगाने अविरत ।।१।। जन्म घटना ही शांत होता, मृत्यू परि घेई लक्ष्य खेचूनी । नष्ट होतो जेव्हां मानव, विचार लाटा उठती मनी ।।२।। मरणामध्यें निसर्ग असतां, हताश होऊनी दु:ख करी । मानवनिर्मित नाश बघूनी, घृणायुक्त येई शिसारी ।।३।। पूर वादळे धरणी कंप, पचवितो आम्ही ही […]
कांपू नकोस धरणीमाते ही नांदी प्रभूच्या आगमनाची वाटते ।। धृ ।। जागो जागी अत्याचार सर्वत्र दिसे भ्रष्टाचार वाढले भयंकर अनाचार गरीब जनता त्रस्त होऊनी जाते ही नांदी प्रभूच्या आगमनाची वाटते ।।१।। रक्षण नाही स्त्रियांचे प्रमाण वाढले बलात्काराचे प्रकार घडती विनयभंगाचे हतबल होऊनी स्त्री अश्रू ढाळते ही नांदी प्रभूच्या आगमनाची वाटते ।।२।। लुट लुट संपत्तीची जाळपोळ घरदारांची खून पाडती अनेकांचे प्रेमभावना उरली नसे ह्या जगाते ही नांदी प्रभूच्या आगमनाची वाटते ।।३।। गीतेमध्ये दिले वचन अर्जुनासी प्रभूचे तोंडून प्रभूचे होईल पुनरागमन अत्याचार वाढता जगाते ही नांदी प्रभूच्या आगमनाची […]
सतत फिरत राही, चक्र जीवनाचे । विविधता पाही , रंग आयुष्याचे ।।१।। सुख दुःखाच्या भावना, उठवूनी लहरी देह आणि मना, परिणाम करी ।।२।। लोभ अहंकार निराशा, सारे मनाचे विकार आनंद समाधान आशा, करी भावना साकार ।।३।। जीवन विषयाचे, बनत असे वलय रस शोधितां त्याचे, जीवन वहात जाय ।।४।। — डॉ. भगवान नागापूरकर ९००४०७९८५० e-mail- bknagapurkar@gmail.com […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions