नवीन लेखन...
Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

गतकर्माची विस्मृती

एके दिनीं मी निघून जाईन    निरोप घेवून ह्या जगताचा प्रवास माझा अनंतात तो    कसा असेल त्या वेळेचा   आकाशाच्या छाये खालती    विदेही स्थितींत  फिरत राहीन ‘तू’ आणि ‘मी’ च्या विरहीत मी   गत कर्माचे करिन मापन   बाल्यातील चुका उमगल्या     तरूणपणाच्या उंबरठ्यावरी सळसळणारे यौवन रक्त    वृधावस्तेतील खंत ठरी   पूनर्जन्म तो घेण्याकरितां    गर्भाची मी निवड करीन गत जन्मींच्या चुका टाळूनी   […]

उगवत्या सूर्याला नमस्कार

उगवता सूर्य, नमन करती त्याला, विसरती सारे सुर्यास्ताला    ||धृ|| ऐश्वर्याची झलक, श्रीमंतीचे सुख बिनकष्टाची संपत्ती, लक्ष मिळवण्याती माना डोलावती, डामडोलाला   ||१|| उगवता सूर्य. नमन करती त्याला प्रथम हवे दाम, तरच होई काम पैशाच्या भोवती, सारेच फिरती पैशाचे गुलाम, मानती पैशाला    ||२|| उगवता सूर्य, नमन करती त्याला सत्तेची नशा, दाखवी जना आशा स्वतःसी समजे थोर,  असुनीया शिरजोर […]

पक्षाना मेजवानी

मला एक भावनिक वैचारीक सवय होती. रोज सकाळी अंगणांत वाटीभर धान्य प्लास्टीकच्या चटईवर टाकींत असे. जमा होणाऱ्या पक्षांची ते टीपताना गम्मत बघणे व आनंद घेणे हा हेतू. […]

जीवन घटते सतत

क्षणा क्षणाला घटते जीवन,  जाण त्याची येईल कोठून मोठे प्रसंग आम्ही टिपतो,  तेच सारे लक्षांत ठेवतो, जीवनाच्या पायऱ्या मोजता,  मना विचारा काय राहता ढोबळतेचा विचार होतो,  सूक्ष्मपणाला विसरूनी जातो, मृत्यू येई तो हर घडीला,  जाण नसते त्याची कुणाला गेला क्षण तो परत न येई,  आयुष्य तेवढेच व्यर्थ होई, समाधान जे मिळे तुम्हाला,  देता किंमत प्रत्येक क्षणाला […]

प्रभूची खंत

मी आलो रे तुझ्या दारीं, मला म्हणतात श्रीहरी झोपलो होतो सागरी, तंद्री मोडी कुणीतरी, ।। शांतीने पडू देईना, तुझी ती तपसाधना, लक्ष माझे खेची कुणी, प्रश्न पडला तो मनी  ।। तूच दिसला नयनी, आई-बापा मांडी देऊनी, माझे लक्ष तुझकडे, परि तू बघेना थोडे, ।। आई – बापाच्या सेवेत,  गुंगलास तूं सतत, तुझी शक्ति मला छळे, तें […]

“ध्यान धारणा” एक साघना

ध्यान ? कुणाचे ? कुणाचेही नाही. कारण कुणीही आणि कुणालाही हे माहित नाही. काहीही न करणे यालाच  ‘ध्यान’ म्हणतात. (objectless awareness) अर्थ फार सोपा व सुलभ वाटतो. परंतू काहीही न करण्याची अवस्था शरीरात निर्माण करणे, अत्यंत कठीण गोष्ट आहे. देहाच्या हालचालीना पायबंद घालणे एखादेवेळी काही क्षणासाठी शक्य होईल. परंतु जो मेंदू, बुध्दी वा मन हे सतत […]

जुळे

दोघे मिळून आलां               हातात घेऊन हात हाताळूनी परिस्थितीला      करण्या त्यावर मात   दोघांची मिळूनी शक्ति         दुप्पट होत असे सहभागी होतां, युक्ति           यशाची खात्री दिसे   एकाच तेजाची तुम्ही बाळे        बरोबरीने आलां जगती रवि-किरण होऊन जुळे                 प्रकाशमान बनती   ओळखुनी जीवन धोके            यशाच्या मार्गांत गाडीची बनूनी चाके              सतत रहा वेगांत   एकाचे पाठी जाता दुसरा      यश अल्पची […]

ध्यान स्थिती

जेव्हां मजला कळत होते,  निद्रेत आहे मी जागृत स्थिती असूनी मनाची,  शरीर होते निकामीं  ।।१।। निद्रेमधल्या स्थितीत जाता,  जाग न राही तेथे जागेपण आणि निद्रा दोन्हीं,  एकत्र न येते  ।।२।। निद्रावस्था नि जागेपणा,  याहून दुजे कोणते ? ध्यान स्थिति ही आगळी असूनी,  मध्य बिंदू साधते  ।।३।। देह मनाला विश्रांती देई,  ध्यान अवस्था ही ध्यानामधली ऊर्जा सारी, […]

भावनेच्या आहारीं ।

नको बनूस अविचारी जाऊनी भावनेच्या आहारी   ।।धृ।।   प्राणीमात्राच्या जगती   श्रेष्ठत्व तुला लाभले विवेक करण्या मनी   यश तुला साधले नको घेऊं ऊंच भरारी   ।।१।। जाऊनी भावनेच्या आहारी   प्राण्यास असे भावना   साथ नसे विचारांची विचार आणि भावना    साथ मिळाली दोन्हीची नको बनूस अहंकारी   ।।२।। जाऊनी भावनेच्या आहारी   बरे वाईट यांची जाण   घ्यावीस तूं ओळखूनी राहूं […]

प्राण्याचे मोल समजा

खरेदी केला सुंदर पक्षी,   दाम देवूनी योग्य असे ते नक्षीदार तो पिंजरा घेवूनी,   शोभिवान मी केले घरातें…१, प्रात:काळी उठोनी बघतां, चकित होवूनी गेलो मनीं पक्षानें त्या मान टाकली,  पडला होता तळात मरूनी…२, क्षणभर मनी ती खंत वाटली,   राग आला तो स्वकृत्याचा अकारण ती हौस म्हणूनी,   खरेदी केला पक्षी याचा…३, किती बरे ते निच मन हे?    निराशा […]

1 97 98 99 100 101 214
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..