नवीन लेखन...
Avatar
About ब्रह्माकुमारी नीता
मी ब्रह्माकुमारी संस्थेमध्ये 20 वर्षे समर्पित जीवन जगत आहे. मी एक राजयोग शिक्षिका आहे. meditation व त्याच बरोबर अनेक संस्था, शाळा, कॉलेज, ऑफिस मध्ये जाऊन managment चे courses ही घेते. मराठी वर्तमान पत्रात ही लेखन करण्याचे कार्य करते. विचारांना सकारात्मक कसे बनवावे, तणावमुक्त जीवन, स्पंदन, क्रोधावर नियंत्रण, निसर्गाचे सान्निध्य, शब्द, पालकत्व……..

पूर्णविराम

भूतकाळात झालेल्या गोष्टींना पूर्णविराम देण्याशिवाय आपल्याकडे दूसरा कोणताही पर्याय नाही. जर आयुष्याला नवे वळण द्यायचे असेल तर वाईट गोष्टींना, घटनांना विराम द्यावा. कारण आयुष्य हे ऊन पावसा सारखे आहे. सुख-दुःख ह्यांचा खेळ चालूच राहणार. पण नवीन दृश्य आपल्याला बघायची असतील तर नकारात्मक विचारांना विराम देऊन, विचारांना नवीन बनवण्याची गरज आहे. […]

जसे कराल तसे भराल

‘जसे कराल तसे भराल ’ हा कर्माचा अटळ सिद्धांत आहे परंतु प्रत्यक्ष व्यवहारात आपला अनुभव असा की जो माणूस न्याय-नीती-धर्माने वागत असतो, त्याला जीवनात खूप दुःखे भोगावी लागतात. उलट अधर्म अनीतीने वागणारे, काळाबाजार आणि तस्करी करणारे, जीवनात मौज-मजा करत असतात. गाडी, बंगला इत्यादी सर्व तऱ्हेच्या सुखसोयी यांची त्यांच्या जीवनात रेलचेल असते. […]

चिकाटी

आजचे आपले जगणे इतके गतिशील झाले आहे की प्रत्येक गोष्ट लवकर हवी. झटपट मॅगी, फास्ट नेटवर्क, रातोरात श्रीमंती.. .. अश्या अनेक गोष्टी आपण बघतो त्यामुळे काही मिळवण्यासाठी परिश्रम, चिकाटी, जिद्द हवी हे आता विसरत चालले आहेत. शालेय जीवनामध्ये value education दिले जाते पण practical जीवनात मात्र काही दिसून येत नाही. इमानदारी, चिकाटी, जिद्द, प्रामाणिक हे सर्व फक्त कथा कादंबऱ्या मध्येच वाचायला मिळतं. […]

खरा दीपोत्सव

दिवाळी हा सण ५ उत्सवांचे स्नेह सम्मेलन आहे. धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, दिवाळी, नवीन वर्ष, भाऊबीज हे पाच उत्सव विभिन्न सांस्कृतिक विचारधारांना घेऊन साजरे केले जातात. जर हा सण आध्यात्मिक रहस्यांना समजून साजरा केला तर जीवनामध्ये एक वेगळे परिवर्तन आणू शकतो. […]

मिसिंग टाइल थेरपी

मनाचा आढावा घेणारे आपले मानसशास्त्रज्ञ नेहमीच आपल्याला स्वतः चा शोध घ्यायला शिकवतात. कदाचित आपण कधी तितके स्वतः चे परीक्षण आजवर केले ही नसू पण त्यांनी अनेक प्रयोगा द्वारे त्याची जाणीव करून दिली आहे. मानसशास्त्रामध्ये एक प्रसिद्ध सिद्धांत आहे, मिसिंग टाईल्स फिलॉसॉफी! […]

चला, सागर सम बनू या

सागर किती ही विशाल असला तरी त्याची एक लाट ही सुखद अनुभव करून जाते तसेच आपल्या दिवसभराच्या कारोबारात ही एखादा सुखद क्षण ही पुरेसा असतो. विशाल हृदयाने, मुक्त मनाने विचारांना प्रकट करण्याची सवय लावावी कारण विचारांचे दमन हे अतिशय नुकसानकारक आहे. शुद्ध विचारांचा स्पर्श जीवनाला सुखद बनवण्यासाठी मदत करतो. […]

selfie

आजचे युग ‘मोबाईल युग आहे. बाल-वृद्ध, गरीब-साहूकार सर्वजण ह्या मोबाईलच्या आकर्षणामध्ये फसले आहेत. रामायणामध्ये जसे सीतेला सोनेरी हरण मोहीत करून गेले तसेच आज सगळ्यावर ह्या मोबाईलची जादू झाली आहे. काही वर्षांपूर्वी एखादा व्यक्ती एकटाच बोलताना दिसला की लोक त्याला वेडा म्हणायची पण आज ९०% लोक ह्या मोबाईल मुळे वेडी झालेली दिसून येतात. […]

अन्नशुद्धि

आजच्या आधुनिक युगात मनुष्य health concious झाला आहे. प्रत्येक पदार्थ खाताना, ते खाल्ल्यानंतर किती calaries, calcium, vitamin मिळतील त्याचा हिशोब लावला जातो. तो पदार्थ मशीनने बनला असेल तर निश्चिन्त होऊन विकत घेतला जातो. आपण खाल्लेल्या प्रत्येक पदार्थाचा आपल्या शरीरावर परिणाम होतो म्हणून जागृत राहणे आवश्यक आहे. […]

नवरात्रि

आपला भारत देश श्रेष्ठ संस्कृतीचा धनी आहे. तसेच भारत देशाला ‘माता ‘ ह्या नावाने संबोधले जाते. ज्या मातेने अनेक जाती, धर्म, पंथ ह्यांना सामावून घेतले आहे. तसेच ‘वसुवैध कुटुम्बकम’ ची भावना जागृत राहावी, सर्वांनी एकत्र येऊन आनंदोस्तव साजरा करावा ह्या उद्देशाने अनेक सण , उत्सव ह्याची निर्मिती केली गेली. प्रत्येक सणां पाठीमागे काही आध्यात्मिक रहस्य दडली आहेत. अनेक सणापैकी एक सण आहे ‘नवरात्री उत्सव’. जो संपूर्ण भारतामध्ये आनंदाने साजरा केला जातो. […]

निसर्गाच्या सान्निध्यात

निसर्गाचे कोणते ही रूप असो मग तो एखादा पक्षी, प्राणी वा छोटासा जीव असो, झाडे-फुले, फळे ———– असो सर्वांमध्ये काही ना काही विशेषता भरली आहे . ह्या सर्व दृश्यांना पाहण्यासाठी मनुष्याकडे आज वेळ कुठे आहे ? […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..