MENU
नवीन लेखन...
चंद्रकांत धोंडी चव्हाण
About चंद्रकांत धोंडी चव्हाण
शिक्षण एम.ए.बी.एड.; नोकरी - श्री वा.स.विद्यालय, माणगाव, ता.कुडाळ, जि.सिधुदुर्ग, पद-पर्यवेक्षक, सेवा - २०वर्षे, विविध सामाजिक संस्था, संघटना मध्ये कार्यरत.

कोरोना काळ व शिक्षण

करोना विषाणूची साथ हे दुसऱ्या महायुद्धानंतरचे जगासमोरचे मोठे संकट आहे. मानवी जीवनाच्या सर्वच बाजूंवर या संकटाने प्रभाव टाकला आहे. या काळात जगात शिक्षण क्षेत्रासमोर बरीच आव्हानं निर्माण झाली आहेत. ऑनलाईन शिक्षणासोबतच इतर नवनवीन पर्याय शोधण्याचा जेणेकरून अधिकाधिक विद्यार्थी शिकू शकतील, प्रयत्न शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींना अजून करावा लागणार आहे. […]

गोपाळ गणेश आगरकर जयंतीनिमित्त

‘यतो वाचो निवर्तन्ते…’ सारख्या औपनिषदिक वचन उद्धृत केल्याने आगरकरांना अज्ञेयवादी मानले जाते. परमतत्त्व निर्गुण निराकार अनिवर्चनीय म्हणजे अज्ञेय हे मान्य केले की, आगरकर स्पेन्सरप्रमाणे अज्ञेयवादी किंवा पारलौकिकाविषयी शंका उपस्थित केल्याने ह्यूमप्रमाणे संशयवादी मानले जातात. इहवादी, इहनिष्ठ, विवेकी असे हे समतेचे तत्त्वज्ञान अस्पृश्यता निवारणासाठी मोलाचे कार्य केले. […]

अखेर शाळा सुरू पण नेमकं काय…..

महाराष्ट्रात आजही कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर आहे. शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणं महत्त्वाचे आहे. केंद्र सरकार म्हणत असले तरी महाराष्ट्रात परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे आरोग्याला प्राधान्य देऊनच निर्णय घेतला पाहिजे.प्रशासकीय पातळीवरही शाळा सुरू करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आता केंद्र सरकारने नव्याने सूचना केल्याने त्यानुसारही काही बदल शाळांना करावे लागणार आहेत.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाची? […]

‘भारतीय शिक्षण’ – भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ

भारतीय शिक्षण व्यवस्थेत भूतकाळाचा विचार केला असता भारतीय विद्यापीठामध्ये वेगवेगळ्या विषयांचे शिक्षण देण्यात येत असे.आयुर्वेद आणि अन्य वेदांगे यांचे शिक्षण उपलब्ध होते अभियांत्रिकी शिक्षण तर उत्तम प्रकारचे होते. याची साक्ष द्यायची झाल्यास ताजमहल, गोल घुमट,तसेच संपूर्ण भारतभर बांधण्यात आलेली अनेक प्रकारची देवतांची देवालये पुरेशी आहेत.तसेच वेगवेगळ्या नद्यांवर बांधण्यातआलेले घाट आणि अनेक ठिकाणी केलेली पाणीपुरवठ्याची व्यवस्था बारवा,तळी इत्यादी गोष्टी पाहिल्या म्हणजे तेव्हा जलव्यवस्थापन किती उच्च दर्जाचे होते , याची कल्पना येते . उत्तम प्रकारचे वाड.मय त्या काळात निर्माण होत असे. […]

कौटुंबिक मूल्यशिक्षण काळाची गरज

…. परंतु तरीही मानव असुरक्षित आहे कारण कमावलेल्या सामर्थ्याबरोबर त्याच्याशी सुसंगत अशी मानवता, संस्कार जपणारी योग्य मूल्ये जोपासली गेलेली नाहीत. त्याची आज गरज आहे. नुसती प्रगती महत्त्वाची नाही, तर तिला मूल्यांची जोड असणेदेखील अत्यावश्यक आहे कारण ढासळलेली मूल्ये त्या प्रगतीला गालबोट लावतात. म्हणूनच आज घराघरांतून मूल्य शिक्षण देण्याची गरज आहे. […]

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..