नवीन लेखन...
चंदाराणी कोंडाळकर
About चंदाराणी कोंडाळकर
चंदाराणी दिवाडकर - कोंडाळकर या रायगड जिल्ह्यातील कोलाडजवळच्या वरसगांव येथील एक कवीयत्री आणि सामाजिक कार्यकर्त्या. वरसगाव येथे त्यांनी मायभवानी मंदीराची स्थापना केली आणि तेथेच माहेर नसलेल्या स्त्रियांसाठी हक्काचे माहेर उभे केले.

पाऊस

अवेळी पाऊस पडला लक्षण काही चांगला नाही | पाऊस म्हणाला माझं की तुमचं ते मला कळत नाही || १ || प्रदूषणाच्या मार्‍याने मी वैतागलोय पुरता निसर्गाला आव्हान देवून माणूस ठाकला उभा | निसर्ग म्हणतो थांब बेट्या ठेवणार नाही एकही जागा || २ || विज्ञनाच्या उंटावरचा तू अति शहाणा | मडके फोडायच्याऐवजी म्हणशील मानच कापा || ३ […]

पर्णहिन

जीवनभर घासुन घेतल्यावर आता म्हणता चंदन आहे | दूर व्हा दष़्टांनो, तुम्हाला माझं वंदन आहे || १ || आता नाही मला कधी चंदन व्हायचं | सहाणच होईन बरी मला नाही झिजायचं || २ || एक एक पान काढलंत फांदी सहित ओरबाडून | व़क्ष झाला पर्णहिन तेव्हा चित्र काढता रेखाटून || ३ || आता कुठला राग नाही […]

शून्याचे गणित

समजण आणि असणं याच्यात तिनशे साठ अंशाचा कोन होतो त्यांच्या समीकरणातून माणूस शून्यात जाऊन पोहचतो || कर्तबगारीच्या जमेतून प्रौ़ढीची वजाबाकी करतो त्यावेळी माणूस परत शून्याकडेच वळतो || सत्कर्माच्या गुणाकराला अनितीने भागतो त्यावेळी माणूस परत शून्याकडे वळतो || हरिस्मरणाचे बीजगणीत श्रध्देने सोडवत जातो त्यावेळीही माणूस शून्याकडे जाऊन पोहचतो || — चंदाराणी कोंडाळकर

चौकट

तूं भाबड्या मनाची तुज काय हें कळावे | जग हे असेंच असतें तू दूर का पळावे ? तूज दावितील भाकरी पाठीत मारतील सुरी सतत तूझिया मनी नित्य सळत रहावे जग हे असेच असतें तू दूर का पळावे || १ || सर्व तुला लुटतील आणि दूर सारतील संकटांशी हसत झुंज देण्यास ती शिकावे जग हे असेंच असतें […]

असंच एखादं

असाच एखादा क्षण येतो | सर्वस्व सारं घेऊन जातो | थोडसं काही ठेऊन जातो | त्याचंच नाव स्मत़ी असतं || १ || अशीच एखादी झुळुक येते | स्वत:मध्ये सामावून घेते | मध्येच दूर सरसावते | त्याच नाव मिलन असतं || २ || अशीच एखादी सर येते | तालावर ती नाच करते | श़ंगाराने भिजवून जाते | […]

महती मातीची

पायासाठी चप्पल की चपलेसाठी पाय हेच मी विसरले | माती लागू नये पायाला म्हणून मी ते वेष्टिले || १ || चमचमणार्‍या लखलखणार्‍या आभाळाला भाळले | अन्न, वस्त्र, निवारा देणार्‍या मातीला मी विसरले || २ || या मातीचा स्पर्श नको म्हणून मी स्वत:ला जपले | त्या मंगळाने त्या चंद्राने मलाच दूर फेकले || ३ || त्यावेळी कळाली […]

कविता नाही माझी बेबी ट्युबमधली…

कविता नाही माझी बेबी ट्युबमधली । कविता नाही माझी दत्तककन्येसारखी । सिझरिंग मधून ती नाही बाहेर आलेली । नऊ महिने पूर्ण झाल्यावर त्या वेदनेतून जन्मलेली ।।१।। जे जे भोगले त्याची खूण आहे ती । माझ्या प्रत्येक माराचा व्रण आहे ती । माझ्या स्वत:च्या रक्ताचा थेंब आहे ती । माझ्या मनाची पडछाया आहे ती ।।२।। ती कुठेही […]

दिवाळी

असे वाटते की ही दिवाळी कधी येऊच नये । तेल नाही म्हणून पाण्याऐवजी मेणबत्ती लावू नये । पारिजातकाच्या सड्यासारखे रक्ताचे थेंब पडताना । बाँबस्फोटचे आवाज, तलवारी नाचताना । भ्यायलेल्या हरिणीसारखे घरात लपताना । रोषणाईच्या माळा मला भावतच नाही । असे वाटते की ही दिवाळी कधी येऊच नये ।।१।। पु़ढार्‍यांच्या भूलथापांना भाळून जाण्यासाठी । करंट्याचा जन्म आमुचा […]

देवा तुझा मी सोनार

देवा तुझा मी सोनार माझे काय बरे होणार पैजण होऊ पाहे पायी परंतु घुंगरु वाजलं नाही मग कैसे रुनझुणणार माझे काय बरें होणार? मौतीक माळा होऊ पाही परी मौतीक गुंफत नाही कैसी मी रुळणार माझे काय बरें होणार? कमरपट्टा होऊ पाही चाप बंधनी अडकत नाही कैसी मी कसणार देवा काय बरे होणार? मुकूट मस्तकी होऊ पाही […]

हृदय नावाची चीज

भूकंपाच्या एक एक धक्क्याने सारं जमीनदोस्त केलं | पहाता पहाता त्या भेगांनी होत्याच नव्हतं केलं ||१|| ज्वालामुखीच्या मुखातून लाव्हा भळभळतअसताना | प्रत्येक वस्तू खाक होत होती त्याला अंगावर घेताना ||२|| हे सारं लोभस दिसत होतं दुरुन पहाताना | मीच माझा राहू शकलो नाही हे अनुभवताना ||३|| म्हणून वाटतं या जगात प्रत्येक माणसाला | हृदय नावाची चिज […]

1 2
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..