नवीन लेखन...
चिंतामणी कारखानीस
About चिंतामणी कारखानीस
चिंतामणी कारखानीस हे ग्राहक संरक्षण सेवा समिती या संस्थेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष होते. त्यांना या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल २०१० चा Consumer Awareness Award हा पुरस्कार प्राप्त झाला आहे. ठाणे महानगरपालिका शिक्षण मंडळाचे ते माजी अध्यक्ष आहेत. विविध वृत्तपत्रांत व मासिकांत त्यांचे लेख प्रकाशित झाले असून आकाशवाणीवर भाषणेही प्रसारित झाली आहेत. ते शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रवक्ते आहेत.

मत आणि मन

साहित्य, राजकारण, समाजकारण अशा परस्पर भिन्न क्षेत्रामधली समान गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे मतभेद. जीवनाच्या ज्या ज्या क्षेत्रात चार वेगवेगळी माणसे एकत्र येऊन काम करतात तिथे मतभिन्नता, मतभेद आलेच. अगदी स्वातंत्र्य चळवळीपासून ते साहित्य संमेलनाच्या अध्यक्षाच्या निवडीपर्यंत ही गोष्ट अनुभवायला मिळते. आणि त्यात काही गैरही नाही. मतभेद असने हे समाजाच्या जीवंतपणाचे लक्षण मानले जाते. पण […]

प्रत्येक शब्द ‘क’ पासून सुरु करुन येवढा मोठा परिच्छेद

मराठी भाषेची ताकद खालील लेखात पहा. प्रत्येक शब्द ‘क’ पासून सुरु करुन येवढा मोठा परिच्छेद लिहिला आहे. जगातल्या कोणत्या इतर भाषेत अशी ताकद असेल ? केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच […]

कायस्थांचे इमान गावे कोण्या कवनांनी ?

अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान पराक्रमाच्या गाथेत अनेक घराणी कामी आल्याचा उल्लेख आहे. छत्रपतींची इमानेइतबारे एकनिष्ठेने सेवा करण्यात ज्या दोन जाती इतिहास प्रसिद्ध आहेत त्यामध्ये महार समाज, ज्यांचा शिवाजी महाराज आदराने “नाईक” म्हणून उल्लेख करीत आणि दुसरा समाज कायस्थ प्रभूंचा होता. राजापूरचे बाळाजी आवजी चिटणीस, हिरडस मावळातील बाजी प्रभू देशपांडे आणि रोहीड खोरेकर देशपांडे नरस प्रभू गुप्ते या घराण्यातील पुरुषांनी स्वराज्याची सेवा हाच कुळधर्म मानला. मुत्सद्देगिरी, शौर्य आणि त्यागाची कमाल केली.
[…]

“पहिला” दिवस शिक्षकाचा !

शैक्षणिक क्षेत्राचा आधारस्तंभ म्हणजे शिक्षक व विद्यार्थी यांच्यातील नातेसंबंध. हे नातेसंबंध कसे निर्माण होतात, किती बहरतात, वाढतात, का खुरटेच राहतात, यावर त्या दोघांचे आणि शाळेचेही भवितव्य अवलंबून असते. हे नातेसंबंध रुजतात शिक्षक व विद्यार्थी यांच्या पहिल्या भेटीतच. म्हणूनच शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला शाळेच्या पहिल्याच दिवशी वर्गावर जाताना प्रत्येक शिक्षकाने ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की आज ते जे बोलतील, जसे वागतील त्याचेच पडसाद वर्गात वर्षभर उमटणार आहेत. यामुळे पहिल्याच भेटीत त्यांनी विद्यार्थ्यांची मने जाणून घेण्याचा, जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यास हा प्रयत्न नक्की यशस्वी होऊ शकतो. […]

संपूर्ण महाराष्ट्राचेच आरक्षण हवे !

आज देशाची अशी परिस्थिती आहे की कुणाला कीतीही वाटलं तरी मराठी माणूस देशाच्या पंतप्रधान होणार नाही, नव्हे त्याला होऊच दिले जाणार नाही. अपघातानी झाला तर फारकाळ टिकून राहू शकणार नाही. महाराष्ट्राला केवळ शिवजयंती, सत्यनारायणाची महापूजा, गणेशोत्सव आणि परंपरागत यात्रा उत्सव भरवणे इतकेच स्वातंत्र्य अपेक्षित नाही. मराठी माणूस आर्थिक, सामाजिक आणि राजकीय दृष्टीने स्वंतत्र होण्याची गरज आहे. महाराष्ट्राला आणि मराठी माणसाच्या विकासाची कास धरायची तर “संपूर्ण मराठी राज्याचे आरक्षण” हवे. […]

1 6 7 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..