नवीन लेखन...

हरवलेल्या बॅगचा शोध

आमच्या खामगाववरून आषाढी एकादशीला दरवर्षी विशेष यात्रा स्पेशल रेल्वे गाडी सोडण्यात येते. २००३ पासून रेल्वे प्रशासनाने खामगाव ते पंढरपूर ही गाडी सुरू केली आहे. सुरुवातीला एक फेरी सोडण्यात आली. परंतु नंतर दरवर्षी खामगाव, शेगावसह बुलडाणा आणि अकोला जिल्ह्यातून वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांचा प्रतिसाद पाहता आणि रेल्वेला मिळणारे उत्पन्न पाहता रेल्वे प्रशासनाने या फेऱ्या वाढवल्या आहेत. अाता चार फेऱ्या धावतात. बरे असो. […]

गुरू पौर्णिमेच्या शुभेच्छा

आषाढ शुद्ध पौर्णिमेला म्हणजे या तिथीला आपण गुरुपौर्णिमा म्हणून गौरवितो….. आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा किंवा व्यासपौर्णिमा म्हणतात….. ज्यांनी महाभारत, पुराणे लिहिली त्या व्यासमुनींना वंदन करण्याचा, त्यांची पूजा करण्याचा हा मंगलदिन आहे….. त्यांच्याएवढे श्रेष्ठ गुरुजी, आचार्य अद्याप झालेले नाहीत, अशी आपली श्रद्धा आहे….. अशा या आचार्यांना साक्षात देवाप्रमाणे मानावे असे शास्त्रात कथन केले आहे….. एवढेच नव्हे तर […]

पार्ले-जी – सगळ्यांच्या आवडीचे एकमेव बिस्किट.

लहान-मोठ्यांच्या सगळ्यांच्या आवडीचे एकमेव बिस्किट. पार्ले-जी या बिस्किटाने रेकॉर्ड घडवलाय. गेली कित्येक वर्षे त्याची चव लाखोंच्या जीभेवर रेंगाळते आहे.

बाल संन्यासी

ज्युनिअर केजीची फी पाहून बाबांनी मला संन्यास घायला सांगितले आहे….

आंबा – भारताचे राष्ट्रीय फळ

भारत आणि पाकिस्तान हे परंपरागत शत्रू असले तरी एक अशी वस्तू आहे जी दोघांमध्ये समान आहे. आंबा हे भारत व पाकिस्तान यांचे राष्ट्रीय फळ आहे. आंब्याचं झाड हे बांगलादेशाचे राष्ट्रीय झाड आहे आणि फिलिपाईन्सचे राष्ट्रचिन्हही आहे. आंब्यांचा उगम – आंबा हे विषुवृत्तीय प्रदेशात आढळणारे एक फळ आहे. आंब्यांचा उगम नक्की कुठे झाला हे अज्ञात आहे, परंतु […]

शेतकरी राजा

असा उद्योगधंदा जगाच्या पाठीवर शोधुन तरी सापडेल का ? ९५२ किलो म्हणजे जवळपास टनभर कांद्याची विक्री. कांद्याला दर मिळाला प्रतिकिलो १ रुपया ६० पैशे. ९५२ किलोचे झाले १५२३ रुपये २० पैशे. त्या १५२३ रुपये २० पैशातुन आडत ९१ रुपये ३५ पैशे, हमाली ५९ रुपये, भराई १८ रुपये ५५ पैशे, तोलाई ३३ रुपये ३० पैशे आणि मोटार […]

पोस्टमन

एका पोस्टमनने एका घराचे दार ठोठावले आणि हाक दिली,  “पत्र घ्या.” आतून एका लहान मुलीचा आवाज आला,  ‘येते येते.’ पण तीन -चार मिनीटे झाली तरी आतून कुणीही आले नाही. त्यामुळे पुन्हा एकदा पोस्टमनने आवाज दिला, ‘अरे दादा,घरात कुणी असेल तर येऊन चिठ्ठी घ्या.’ पुन्हा एकदा त्याच लहान मुलीचा आवाज आला. ‘पोस्टमन काका, दरवाज्या खालून चिठ्ठी आत […]

अक्षय्य तृतीया महात्म्य

वैशाख शु. तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. मुळात अक्षय या शब्दाचा अर्थच मुळी कधीच क्षय न पावणारे म्हणजे नाश न पावणारे असा होतो. या तिथीला साडेतीन मुहूर्ता पैकी एक शुभ मुहूर्त मानले जाते. या तिथीला नरनारायण, परशुराम आणि हयग्रीव यांचा जन्म झाला आहे, म्हणून या दिवशी त्यांचा जन्मोत्सव करतात.तसेच या दिवसापासूनच त्रेतायुगाचा प्रारंभ झाला आहे; (काहींच्या मते […]

खेकडे खाल्ल्याने होणारे आठ फायदे

व्हॉटसऍपवर व्हायरल झालेला डॉ. भूषण सोहनी यांचा हा लेख वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत.  अत्यंत उपयुक्त माहिती दिल्याबद्दल डॉक्टरांचे आभार  ’८′ हेल्दी कारणांसाठी ‘खेकड्यां’चा घ्या जरूर आस्वाद !  मांसाहार्‍यांच्या आहारात मासे, अंडी, चिकन या सोबतच आवर्जून आढळणारा एक पदार्थ म्हणजे ‘खेकडे’. सूप, सलाड आणि स्टार्ट्स अशा वेगवेगळ्या प्रकारातून त्याचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. खेकड्यांमधून मिनरल्स, ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड्स, व्हिटामिन्स या सोबतच उच्च प्रतीच्या प्रोटीन्सचा शरीराला पुरवठा होतो. मग आहारात या चवदार पदार्थांचा […]

कृष्णावळ

कृष्णावळ – अर्थाच्या दृष्टीने अतिशय लक्षणीय असा हा शब्द आजकाल कोणीही वापरत नाही. कृष्णावळ चा अर्थ कांदा ! कांद्याला असे म्हणण्याचे कारण गंमतशीर आहे. कांदा उभा चिरला, तर तो शंखाकृती दिसतो आणि आडवा चिरला, तर तो चक्राकृती दिसतो. शंख आणि चक्र ही दोन्ही श्रीकृष्णाची आयुधे आहेत. ही दोन्ही आयुधे एका कांद्यात पहायला मिळतात, म्हणून गमतीने कांद्याला […]

1 5 6 7 8 9
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..