कृष्णाकाठच्या कथा…. खेळ सूर पारंब्याचा
मी शाळा शिकत असताना अभ्यासाबरोबर साहित्याचे लेखन सुद्धा करीत असे. बालभारती पुस्तकातील धडे किती सुंदर असतात यामुळे मला एक लिहिण्याची उर्मी येत असे. आपणही थोडेफार लेखन करावे असे माझ्या मनाला मनोमन वाटत होते. शाळा शिकत असतानाच नाटकात काम करण्याचा छंद मला लागला होता व भजनात सुद्धा माझे मन गुंतत होते. वडील जिवंत होते तोपर्यंत मी अधून मधून लेखन करीतच असे. […]