आठवणी गावाकडच्या..।
ग्रामीण भागामध्ये दिवाळी हा सण अतिशय महत्त्वाचा असा आहे. वर्षातील बारा महिन्यांपैकी हा महत्वपूर्ण दिवाळी सण या सणाला गोड गोड खाण्याची मज्जा व खारट चिवडा. प्रत्येकाच्या जिभेला चव देणारा हा चिवडा कायम आठवणीत राहणारा असा आहे. शहरातील दिवाळीपेक्षा ग्रामीण भागातील दिवाळी अतिशय मजेशीर अशी असते. ग्रामीण भागातील नवीन लग्न झालेल्या मुली नागपंचमी गवर गणपती व दिवाळी या सणावर खास करून माहेरी येत असतात. नवीन लग्न झालेल्या मुली यांचा विषय अतिशय रंगेल असा असतो. कार्तिक महिन्यातील दिवाळी दिवाळ काढून गेली तरी आठवण मात्र कायम प्रत्येकाच्या स्मरणात राहते हे वेगळे सांगण्याची गरज नाही. […]