शोध – यशाचा
यश या शब्दाबद्दल या सगळ्यांनी काय लिहून ठेवलंय बघा !! […]
यश या शब्दाबद्दल या सगळ्यांनी काय लिहून ठेवलंय बघा !! […]
एक मंदिर होत, प्रसिध्द मंदिर होत, त्या मंदिरात अनेक देश विदेशातील लोक यायचे, भक्तगन यायचे. त्यामुळे ते मंदिर खुपच चर्चेचे प्रसिध्दीचे होते. आणि मग काही दिवसांनी त्या मंदिराचे ट्रस्टी बदलले. आणि मग ट्रस्टी बदलल्यावर त्यांनी विचार केला आपल्या मंदिरात देश-विदेशातील लोक, भाविक भक्त येतात. त्यामध्ये इंग्रजी बोलणारे भाविक भक्त वैगेरे असतात. तेव्हा आपल्या मंदिरातल्या सगळया लोकांना, […]
“यश हा एक प्रवास आहे. ते केवळ अंतिम ठिकाण किंवा साध्य नव्हे.” – बेन स्वीटलँड, लेखक “यश म्हणजे काय? मला वाटतं यश हे अनेक विचारांचं अजब मिश्रण असतं. तुम्ही जे करताय, तेवढंच पुरेसं नाही, तुम्हाला आणखी कष्ट करायला हवेत आणि या सगळ्यात काहीतरी प्रयोजनही नक्की हवं. यश या साऱ्या विचारातून घडत जातं.” – मार्गारेट थॅचर, ब्रिटनच्या […]
• महाराष्ट्राचा अर्थसंकल्प १८ मार्च रोजी मांडला जाणार आहे. • दरडोई उत्पन्न आणि मानव विकास निर्देशांक यांच्या बाबतीतही महाराष्ट्राचा देशात अनुक्रमे तिसरा आणि सातवा क्रमांक लागतो. • गेल्या पाच वर्षांपासून महाराष्ट्राची अर्थव्यवस्था सरासरी १० टक्क्यांनी वाढते आहे. सन २०१६-१७ मध्ये महाराष्ट्राचे सकल राज्य उत्पन्न मागील वर्षांपेक्षा १२ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे, तर सन २०१५-१६ मध्ये हीच […]
निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई हे एकदा असेच रानावनातून चालत जात असताना, पुढे चालात असलेल्या ज्ञानेश्वरांच्या पायाशी त्यांना एक सोन्याची अंगठी दिसते. संन्यस्त असल्याने, सोन्याचा मोह आपल्या अजून “लहान” असलेल्या बहीणीला होवू नये म्हणून ज्ञानदेवांनी त्या अंगठीवर अगदी सहजपणे पायाने माती घातली आणि पुढे चालत गेले. मागून येत असलेया लहानशा मुक्ताला संशय आला आणि तीने ते काय […]
“तिसरी कसम’ या चित्रपटाचे चित्रीकरण बिहारमधील पूर्णिया जवळच्या जंगलात सुरू होते. दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांना अगदी पहाटेचे एक दृश्य चित्रित करायचे होते म्हणून त्यांनी नायक राजकपूर यांच्या स्वीय सहाय्यकाला दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाचला हजर राहण्यास सांगितले. त्याने राजकपूरना हा निरोप देण्यास साफ इन्कार केला. “त्यांचा दिवस सकाळी अकरा वाजता सुरू होतो हे मला ठाऊक असताना माझी […]
प्रयोग क्रमांक १ या प्रयोगासाठी तुम्हांला दोन व्यक्तींची गरज आहे,एक तुम्ही स्वत: व एक दुसरी कोणीही घरातील व्यक्ती अथवा मित्र. सर्वप्रथम तर तुम्ही स्वत: काही वेळासाठी घराबाहेर जा. बाहेर जाण्याअगोदर आपल्या दुसऱ्या व्यक्तीला एक छोटे घड्याळ घरात लपवून सांगायला सांगा. थोड्या वेळाने घरात अंधार करा व एका ठिकाणी बसून मन एकाग्र करत त्या घड्याळ्याची टिकटिक कोठून […]
ताणावर उपाय काय? *अभ्यासाचे वेळापत्रक बनवा, वेळेचा अपव्यय टाळा *ताण आल्यासारखे वाटेल तेव्हा खोल श्वास घ्या *नकारात्मक विचार प्रयत्नपूर्वक बाजूला सारून सकारात्मक विचार करण्याचा प्रयत्न करा *रोज थोडा वेळ व्यायाम करा *ताण घालवण्यासाठी थोडा वेळ विनोद किंवा गाणी ऐका *बागेत फेरफटका मारून या *मित्र-मैत्रिणींबरोबर थोडा वेळ गप्पा मागल्यानेही मनावरचा ताण कमी होईल. या गप्पांत एकमेकांशी तुलना […]
झेन गुरु बोकोजू आपल्या शिष्यांना ध्यानधारणा शिकविण्यासाठी जी पद्धत वापरीत असत ती लोकांना थोडी विचित्र वाटे. एकदा एक राजपुत्र त्यांच्याकडे ध्यानधारणा शिकण्यासाठी आला. बोकोजूंनी त्याला एका उंच झाडावर चढायला सांगितलं. राजपुत्राचं सारं आयुष्य महालात गेलेलं. झाडावर वगैरे तो कधी चढला नव्हता. शिवाय गुरूने ज्या झाडावर चढायला सांगितले त्याची उंची पाहून तो घाबरला. बोकोजूंना तो म्हणाला, ‘मला […]
एकदा डोळे म्हणाले, ‘या समोरच्या दरीपलीकडे एक डोंगर आहे. किती सुंदर दिसतोय तो. पाहा तर, आत्ता त्याला चारही बाजूंनी दाट धुक्यानं वेढलंय. पण एकूण दृश्य फारच सुरेख दिसतंय.’ डोळ्यांचं बोलणं ऐकून कान म्हणाले, ‘डोंगर? कुठे आहे डोंगर? मला कोणताही डोंगर ऐकू येत नाहीए!’ कानांचं म्हणणं ऐकून हात म्हणाले, ‘हो रे कानूटल्यांनो. डोळोबांचं बोलणं ऐकलं आणि मी […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions