श्रीगणेशभुजङ्गम् – मराठी अर्थासह
श्रीमद् आदिशंकराचार्यांनी या स्तोत्राची रचना भुजंगप्रयात या वृत्तात केलेली असल्याने त्याला गणेश भुजंगम् असे म्हणतात. […]
श्रीमद् आदिशंकराचार्यांनी या स्तोत्राची रचना भुजंगप्रयात या वृत्तात केलेली असल्याने त्याला गणेश भुजंगम् असे म्हणतात. […]
भगवान शंकराच्या स्तुतीसाठी अनेक अष्टकांची रचना झाली आहे. शिवाष्टक, लिंगाष्टक, रुद्राष्टक, बिल्वाष्टक अशा नावांनी ती प्रसिद्ध आहेत, ज्यामध्ये शिवाष्टकाला विशेष महत्त्व आहे. शिवाष्टकांची संख्याही कमी नाही. श्रीमद् शंकराचार्यांनी शंकराच्या स्तुतीपर हे भावपूर्ण रसाळ स्तोत्र भुजंगप्रयात (गण- यययय) वृत्तात रचले आहे. शिवाच्या प्रिय शिवाष्टकम् स्तोत्राचे पठण आणि श्रवण केल्याने माणसाची प्रत्येक वाईट परिस्थितीतून लवकर सुटका होते. शिवाची ही स्तुती श्रावण महिन्यात केल्याने दुर्भागी व्यक्तीलाही भाग्यवान बनवते, अशी भाविकांची श्रद्धा आहे. […]
दशश्लोकी निर्वाणदशकात श्रीमद् आदि शंकराचार्यांनी वेदांताचे सार सांगितले आहे. या रचनेच्या नावाशी साधर्म्य असलेले शंकराचार्यांचेच निर्वाण षटकही प्रसिद्ध आहे. नर्मदा तीरी एका गुहेत श्री गोविंदपादाचार्यांची भेट झाल्यावर त्यांनी विचारलेल्या ‘ तू कोण आहेस? ’ या प्रश्नाचे उत्तर म्हणजे ही दोन स्तोत्रे ! परंतु दोघांची जन्मकथा एकच असली तरी त्यांच्या विषय मांडणीमध्ये फरक आहे […]
असे म्हटले जाते की, भारतातील तीन महत्त्वाच्या नद्यांपैकी, गंगा नदी मोक्षदायिनी, यमुना प्रेमाची अनुभूती देणारी, तर नर्मदा ही वैराग्यदायिनी आहे. नर्म म्हणजे सुख. नर्मदा म्हणजे सुखदायिनी. या खळाळत जाणार्या नर्मदेचे मोठे हृद्य वर्णन आद्य शंकराचायार्यांनी आपल्या नर्मदाष्टकात केले आहे. […]
श्रीमद् आद्य शंकराचार्यांनी रचलेल्या या आठ श्लोकांच्या स्तोत्रात यमुनेच्या अथांग पात्राचे, यमुनेच्या आठ दैवी शक्तींचे वर्णन, तसेच कृष्ण-कृष्णप्रिया-कालिंदी यांच्या लीला हळुवारपणे उलगडल्या आहेत. […]
श्रीमद् शंकराचार्यांचे गंगा नदीच्या स्तुतीपर रचलेले हे स्तोत्र अत्यंत रसाळ व भक्तिपूर्ण आहे. गंगा नदी मोक्षदायिनी मानली जाते. पहिल्या आठ श्लोकात गंगेच्या धरतीकडे प्रवासाचे मनोहारी वर्णन, तसेच गंगाजलाची महती वर्णिली आहे. नवव्या श्लोकात आचार्यांनी भक्तीचे परमोच्च शिखर गाठून शैव-वैष्णव वादावरही पडदा टाकला आहे. […]
शारदा ही शृंगेरी नगरीची देवता असून ती सरस्वतीचा अवतार मानली जाते. भुजंगप्रयात वृत्तात रचलेले हे स्तोत्र विलक्षण गेय असले तरी अभ्यासकांच्या मते ते समजण्यास अवघड असून त्याचे विविध अर्थ लावले जाऊ शकतात. अनुप्रास अलंकाराचे उत्कृष्ट योजन या स्तोत्राच्या सर्व कडव्यांमधून दिसते. […]
तुलसी आणि तिला प्राप्त झालेले अनन्यसाधारण महत्त्व याबद्दल अनेक कथा पुराणांतरी सापडतात. तुळस विष्णूपत्नीस्वरूपच असल्याने तिला विष्णूपूजेत महत्त्वाचे स्थान आहे. तुळशीला उद्देशून हे प्रार्थनास्तोत्र संत पुण्डरीक यांनी रचले आहे. तामीळनाडूमधील तिरुकडलमलै या गावी त्यांचे वास्तव्य होते. श्रीविष्णूंच्या नित्यपूजेत ते कमल फुलांचे उपयोजन करीत असत. एके दिवशी त्यांना भगवंताने गरीब भुकेल्या ब्राह्मणाच्या रूपात दर्शन दिले. त्याचेसाठी पुण्डरीक अन्न घेऊन येईपर्यंत त्या ब्राह्मणाचे विष्णुमूर्तीत व कमळांचे तुलसीपत्रांत रूपांतर झाले होते. या प्रसंगानंतर त्यांनी या स्तोत्राची रचना केली. […]
अनुष्टुभ् छंदात रचलेले व पद्म पुराणात आलेले श्री महालक्ष्मी अष्टकम् ही देवी लक्ष्मीला समर्पित प्रार्थना आहे. ही समजण्यास अत्यंत सोपी भक्तिमय रचना भगवान इंद्रांनी दुर्वास ऋषींच्या शापातून मुक्त होण्यासाठी देवी महालक्ष्मीच्या स्तुतीसाठी केली होती. […]
असे सांगितले जाते की तपश्चर्येच्या अवस्थेत, श्री भगवतानंद गुरूंना स्वप्नात शक्तिपाताद्वारे कुंडलिनी शक्तीचा साक्षात्कार झाला आणि नंतर भगवान शिवांनी त्यांना श्रीरामाच्या कथेवर आधारित श्रीराघवेंद्रचरितम् हा ग्रंथ लिहिण्यास प्रेरित केले. प्रस्तुत राम ताण्डव स्तोत्र हे या ग्रंथाचा एक भाग आहे. तांडवाचा एक अर्थ भयंकर संहारक क्रिया असाही आहे. या स्तोत्राची शैली आणि भाव वीररस आणि युद्धाच्या भीतीने […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions