सार्थ त्रिपुरसुन्दरी अष्टकम्
त्रिपुरसुंदरी म्हणजे सर्वोत्कृष्ट सौंदर्य. तिन्ही लोकात सुंदर. तथापि त्रिपुर याचा अर्थ विविध अभ्यासकांनी अनेक प्रकारे अर्थ लावलेला दिसतो. त्रिपुर म्हणजे त्रिगुणात्मक शिव आणि त्याची अर्धांगिनी ती त्रिपुरसुंदरी. […]
त्रिपुरसुंदरी म्हणजे सर्वोत्कृष्ट सौंदर्य. तिन्ही लोकात सुंदर. तथापि त्रिपुर याचा अर्थ विविध अभ्यासकांनी अनेक प्रकारे अर्थ लावलेला दिसतो. त्रिपुर म्हणजे त्रिगुणात्मक शिव आणि त्याची अर्धांगिनी ती त्रिपुरसुंदरी. […]
मार्कण्डेय पुराणाचे रचयिता मार्कण्डेय ऋषींनी हे अष्टक रचून शंकराचा धावा केला अशी लोककथा आहे. मृगशृंग ऋषींचा पुत्र मृकण्डू याला संतान नसल्याने त्याने भगवान शंकराची आराधना केली. शंकरांनी प्रसन्न होऊन त्याला पुत्रप्राप्तीचा वर दिला, परंतु दीर्घायुषी पुत्र मंद बुद्धीचा तर अल्पयुषी पुत्र (१६ वर्षे) अत्यंत बुद्धिमान असेल असा विकल्प दिला. मृकण्ड ऋषींनी दुसरा विकल्प निवडला. तोच हा […]
हल्ली बहुतेक सार्वजनिक आणि अनेक खासगी पूजांनंतर ‘घालीन लोटांगण’ या प्रार्थना श्लोकांमध्ये समाविष्ट ‘अच्युतं केशवं’ या श्लोकाने सुरुवात होणारे हे अत्यंत रसाळ आणि सोपे अष्टक श्रीमद शंकराचार्यांनी ‘स्रग्विणी’ वृत्तात (रररर) रचले आहे. श्रीविष्णूची विविध नावे व मुख्यतः राम व कृष्ण अवतारांभोवती गुंफलेले हे स्तोत्र अत्यंत गेय आणि लोकप्रिय आहे. […]
सूर्यमंडल स्तोत्र भविष्य पुराणांतर्गत एक भाग आहे. यालाच सूर्यमंडल अष्टकम् असेही नाव आहे (परंतु श्लोकसंख्या ८ पेक्षा अधिक आहे). सूर्याच्या स्तुतीला वाहिलेल्या या स्तोत्राची रचना इन्द्रवज्रा वृत्त तसेच अनुष्टुभ छंदात केली आहे. […]
वनशंकरी (बनशंकरी) किंवा शाकंभरी (शाकंबरी) ही देवी महाराष्ट्रात व कर्नाटकात अनेकांची कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध आहे. बनशंकरी हे दुर्गेचेच एक नाव असून ती वनवासिनी आहे. देवी भागवतातील कथेनुसार दुष्काळातही जनांना अन्न व भाजीपाला पुरवून पोषण केल्याने तिला शाकंबरी असे नाव पडले. दुर्गम नामक दैत्याचा तिने नाश केल्याने तिला दुर्गा असेही म्हटले जाते. […]
पुरुषसूक्त हे ऋग्वेदाच्या दहाव्या मंडलातील नव्वदावे सूक्त आहे. आपल्याला दिसणारे जग हे विराट परमेश्वराचा केवळ अंशभाग आहे हा या सूक्ताचा मुख्य विषय. विश्वपुरुष व त्याच्यापासून निर्माण झालेली सृष्टी यांचे वर्णन करणार्या या सूक्तात सोळा ऋचा असून रचयिता नारायण ऋषी व देवता पुरुष (परमेश्वर) आहे. मुख्यत्वे अनुष्टुप् छंदात रचलेल्या या सूक्ताची शेवटची ऋचा मात्र त्रिष्टुप् छंदात गुंफलेली […]
श्रीमद् आदिशंकराचार्यांनी भुजंगप्रयात वृत्तात रचलेले कालिकाष्टक आदिमायेचे रौद्र स्वरूप साकार करणारे स्तोत्र आहे. असुरांचा समूळ संहार करणारी, अत्यंत भीषण दिसणारी जगन्माता रुंडमाला, शवाकार कुंडले, हातांच्या आकाराची मेखला धारण करते, त्याचबरोबर ती सज्जनांसाठी मधुर हास्य धारण करून अभयदानही देते. हे स्तोत्र अंबिकेचे ध्यान व स्तुती असे विभागलेले आहे. […]
पार्वती व शंकर यांच्या स्तुतीपर असलेले हे स्तोत्र बहुतांश उपेंद्रवज्रा/इंद्रवज्रा वृत्तात रचलेले असून अत्यंत रसाळ व तितकेच समजण्यास सोपे आहे. त्याच्या पहिल्याच श्लोकातील ‘नगेंद्रकन्या’ या उल्लेखाने कालिदासाच्या कुमारसंभवातील पहिल्या सर्गातील ‘उमा’ या शब्दाच्या उपपत्तीची आठवण झाल्याखेरीज रहात नाही. […]
ऋग्वेदाच्या पहिल्या मंडलातील एकोणनव्वदावे हे सूक्त शांतिपाठ म्हणून ओळखले जाते. यातील ‘ भद्रं कर्णेभिः ’ व ‘ स्वस्ति न इन्द्रो ’ या दोन ऋचा विशेषत्वाने सर्वसामान्यांना परिचित आहेत. या सूक्ताचे रचयिता गौतम राहूगण ऋषी असून देवता विश्वेदेव आहे. परंतु पूषन व मरुत गण यांनाही आवाहन केलेले असून दहाव्या ऋचेत अदिती देवता सर्वव्यापी असल्याचे म्हटले आहे. हे सूक्त जगती, विराटस्थाना व त्रिष्टुभ अशा तीन छंदात रचलेले आहे. ऋचांमधील अक्षरांची संख्याही वेगवेगळी दिसते. ऋग्वेदाखेरीज इतरही धर्मग्रंथांमध्ये हे सूक्त समाविष्ट आहे. […]
वारकरी संप्रदायाची व भजनाची महान परंपरा असलेल्या महाराष्ट्रात ‘महायोगपीठे तटे भीमरथ्या’ ही भजनाच्या पंचपदीची ओळ कानावर पडली नाही असा मनुष्य सापडणे विरळाच. हे श्रीमद् शंकराचार्यांनी रचलेले अत्यंत भक्तिपूर्ण पांडुरंगाष्टकम् भुजंगप्रयात वृत्तात गुंफलेले असून गावयासही सोपे आहे. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions