कनकधारास्तोत्रम्- मराठी अर्थासह
एका दंतकथेनुसार, आचार्यांच्या कालडि गावातील एका निर्धन ब्राह्मणाला दारिद्र्यापासून मुक्त करण्यासाठी रचलेले हे ‘कनकधारा स्तोत्र’ लक्ष्मी स्तुतिपर एक अत्यंत श्रेष्ठ स्तोत्र आहे. या अत्यंत रसाळ व भक्तिपूर्ण स्तोत्रात मुख्यत्वे वसंततिलका, रथोद्धता व वैतालीय/सुंदरी या वृत्तांचा उपयोग केला आहे. खिल(श्री)सूक्तातील ‘सरसिजनिलये’ हा श्लोक औपच्छन्दसिक/पुष्पिताग्रा वृत्तात आहे. […]