प्रगल्भ प्रतिभेचे नौशाद
एका नामांकित लेखक-समीक्षकाने, “बलवत्तर भाग्याचे नौशाद” अशा शीर्षकाचा लेख आपल्या एका पुस्तकात लिहीला आहे. नौशादजी ‘Top’ ला जाण्यात त्यांच्या ‘गुणवत्तेपेक्षा’ त्यांच्या ‘भाग्याचा’ वाटा मोठा आहे असे सूचन करणारे हे शीर्षक व हा लेख आहे. आता, नौशादांची गाणी त्या त्या काळात लोकप्रिय झालीच पण साठ सत्तर वर्षांनंतरदेखील ती जनप्रिय आहेत याला निव्वळ ‘भाग्य’ म्हणणे म्हणजे विनोदच आहे. […]