घराच्या अंगणात
ने हमीसारखीच मी यवतमाळला गेले. मधून मधून चक्कर होते, कारण यवतमाळ माझं माहेर. पस्तीस वर्षांपूर्वी बाबांनी हे नवीन घर बांधलंय. पण आता ठरवलं, की या वेळी आपण जुन्या घरी जाऊ या, ज्या घरात माझा जन्म झाला. उमलत्या वयाची 17 वर्ष घालवली. त्या घराकडे या 35-40 वर्षांत आपण फिरकलोच नाही. पस्तीस-चाळीस वर्ष. आयुष्याचा केवढा मोठा लांबलचक पल्ला. […]