नवीन लेखन...
Avatar
About किशोर कुलकर्णी
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

वहिनीचा तयार मसाला

  त्या वेळी एसएससीला होतो मी. 1966-67 चा तो कालावधी. अलीकडच्या काळात 10वी 12वी नंतर काय, याची माहिती देणाऱया अनेक संस्था, व्यक्ती आहेत. त्या वेळी ते प्रमाण फारसं नव्हतं. माझ्या घरात तर एसएससी होणारा मीच पहिला ठरणार होतो. पुढे काय, हा प्रश्न इतरांना सतावत असला तरी मला त्याचा त्रास नव्हता. कारण नववी इयत्तेत असल्यापासून काही तरी […]

आमची इडली

  सुमती मावशी अन् माझा संपर्क सहवास अवघ्या दहा वर्षांचा; पण त्या दहा वर्षांत मला त्यांनी खूप काही दिलं. खरं म्हणजे माझ्या मनात येईल ते अन् येईल तसं मांडण्याची जागा म्हणजे सुमती मावशी. त्यांना मी मावशी म्हणत असलो, तरी त्या माझ्या मावशी नव्हत्या. व्यवहारिक अर्थानं सांगायचं, तर त्यांचं नि माझं नातं असं काहीच नव्हतं. माझ्या पत्नीच्या […]

कृतज्ञता

  शब्दांना जेव्हा अर्थाचं सक्रिय पाठबळ लाभतं, त्यावेळी ते शब्दही ख अर्थानं जिवंत होतात. एखादाच नव्हे, तर व्यापक जनसमुदायाच्या जीवनात क्रांती निर्माण करण्याची ताकदही त्यांच्यात निर्माण होते. `कृतज्ञता’ हा असाच एक शब्द. प्राणिमात्रांच्या भावनेशी संबंधित. जेव्हा ही भावना प्रत्यक्षात येते, त्यावेळी या शब्दाला अर्थ प्राप्त होतो. अन्यथा, कृतज्ञतेला कृतिशीलतेची जोड नसेल, तर शब्दाचा अर्थच नव्हे, तर […]

रोजा

  गुलबट छटा असलेली सुरेख फर, वेधक बोलके डोळे, स्वतच्या सौंदर्याची जाणीव असलेल्या तरुणीसारखी चाल, कोणीही मला पाहिले, तर पुन्हा मान वळवून पाहावेच लागेल, असा कमालीचा विश्वास बाळगणारे हे व्यक्तिमत्त्व. रोजा. पामोरियन स्पीट्स जातीची कुत्री. अवघ्या तीन महिन्यांची असताना माझ्याकडे आली अन् घरातील एक महत्त्वपूर्ण घटक बनली. मी, पत्नी रेखा, मुलगा पराग या त्रिकोणी कुटुंबात रोजा […]

नामांतर

ही घटना खूप जुनी. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या काळातली. अजूनही मनात ताजी असलेली. त्या वेळी पुण्यातल्या एका दैनिकाचा प्रतिनिधी म्हणून मी महाराष्ट्राच्या विधानसभेत वृत्तांकनासाठी हजर होतो. 27 जुलैचा तो दिवस. महाराष्ट्र विधिमंडळात त्या दिवशी मराठवाडा विद्यापीठाला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव द्यायचा ठराव संमत झाला. शरद पवार मुख्यमंत्री होते. मला आठवतं, त्या दिवशी विधानसभेत या ऐतिहासिक घटनेचं कौतुक […]

आंबा

  त्या वेळी जागतिकीकरणाचे वारे एवढ्या वेगाने वाहत नव्हते. भारतीय अर्थव्यवस्थाही खुली व्हायची होती. मी जपानला गेलेलो होतो. तिथलं जीवन, सुबत्ता, सांस्कृतिक आणि सामाजिक बदल पाहत होतो. अनेकांना भेटत होतो. जपानी माणसांची घरं लहान; पण ते अशी सजवितात की ती मोठी वाटावीत. अर्थात, तिथं पाहुण्यांना घरी बोलावून मेजवानी करावी, अशी पद्धत नाही. स्वतचं खासगीपण अत्यंत निष्ठेनं […]

तथास्तू

  माणसाच्या उक्रांतीचा इतिहास पाहू जाता त्यात झालेले बदल नजरेत भरतात. याचवेळी हेही लक्षात येते, की देवाचा किंवा परमेश्वराचा इतिहास इतका पुरातन नाहीये. मग ज्यावेळी परमेश्वराचे अस्तित्वच नव्हते त्यावेळी सामान्य माणूस कोणाच्या, कशाच्या आधारावर जगत असावा? त्याची श्रद्धास्थाने, भक्तिस्थाने काय असावीत? त्यावेळचा माणूस स्वतच तर देव नव्हता? होय, त्यावेळी त्याचे जगणे म्हणजेच देवाची पूजा होती, आराधना […]

ते हात … गोष्ट सुनामी प्रलयानंतरची

  मी कार्यालयामध्ये बसलो होतो. कामाचे नियोजन, झालेल्या कामाचा आढावा यावर चर्चा सुरू होती. इतक्यात, दूरध्वनी वाजला. वृत्तपत्राच्या कार्यालयात ही एक नित्याची बाब होती. दूरध्वनी उचलला. “आपण संपादक आहात का?” – प्रश्न आला. “हो.” मी उत्तर दिलं. “साहेब, एक विनंती करण्यासाठी दूरध्वनी केला होता. आजच्या अंकात तुम्ही तमिळनाडूतील विध्वंसाची जी छायाचित्रे प्रकाशित केली आहेत, ती धक्कादायक […]

कचकड्यांचे मोती

  सन्मान सांगावा जगाला, अपमान सांगावा मनाला, असं काहीसं सांगितलं जातं. त्यामुळंच कदाचित माणसं आपली झालेली फसगत सांगायला फारशी राजी होत नसावीत. मारुतीच्या बेंबीत बोट घातल्यानंतर किती गार वाटलं, याच्याच कथा अधिक. तर आज मी सांगणार आहे, ती घटना आहे माझ्या फसगतीची. अंध विश्वासाची आणि यशाकडे जाण्यासाठी शॉर्ट कट निवडण्याची. तो काळ होता 1998 चा. माझा […]

1 2 3 4 5 6 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..