पाणी
माझं वय लहान होतं; पण सभोवताली काय चाललंय हे कळत असे. त्यामुळेही असेल कदाचित माझ्या गावाकडच्या आठवणी तेवढ्या उत्सावर्धक नसायच्या. वडील पाटबंधारे खात्यात नोकरीला, त्यांना शेती करायची मोठी हौस. शेती करावी अन् लोकांना दाखवून द्यावं की शेती कशी करतात, असं त्यांना वाटत असावं. ते त्यांच्या बोलण्यातूनही येई. नोकरीत असतानाही त्या काळी त्यांनी बटाट्याची शेती नगर जिल्ह्यात […]