नवीन लेखन...
Avatar
About किशोर कुलकर्णी
श्री. किशोर कुलकर्णी हे ज्येष्ठ पत्रकार आहेत. ते लोकमतच्या ऑनलाईन आवृत्तीचे बराच काळ संपादक होते. सध्या ते पुणे येथे वास्तव्याला आहेत. अध्यात्म या विषयावर विपुल लेखन.

गंमत

  परदेशात जाणं ही बाब आता काही खूप मोठी राहिलेली नाही. रोज हजारो-लाखो लोक भारतातून अन्य देशांत जातात आणि येतात; पण कधीकाळी त्याची अपूर्वाई होती. परदेश प्रवासाहून जाऊन आलेला माणूस त्या वेळी जी भाषा बोलायचा, तीही सर्वसाधारण सारखीच होती. प्रगत देशातले रस्ते, वाहने, तेथील शिस्त, स्वच्छता या गोष्टी गप्पांचं सूत्र असायच्या. आता काळ बदललाय. आता भारतात […]

खोटी नाणी

  कामाच्या निमित्तानं महाराष्ट्रात आणि देशाच्या विविध भागांना माझ्या भेटी होत. मराठवाडा हा भाग तर माझ्या विशेष जिव्हाळ्याचा. औंरगाबादेजवळ आमचं मूळ गाव, हे त्यामागचं कारण असावं. असाच एकदा औरंगाबादमार्गे पैठणला गेलो. माझ्या मातुल घराण्याच्या, आजोळच्या खुणा अंगाखांद्यावर बाळगणारं हे गाव. पुरातन आणि प्रख्यातही. नाथसागरानं अलीकडे पैठणला पर्यटनाचं महत्त्व आलं खरं; पण प्रतिष्ठान या नावानं या गावातून […]

प्रामाणिकपणा

  ही गोष्ट खूप जुनी. माझ्या लहानपणाची. खरे तर या चाळीस वर्षांत इतक्या काही घटना-घडामोडी झाल्यात की ती सहज विसरून जावी; पण नाही, ती घटना मी विसरू शकलेलो नाही. ती घटना मी विसरू शकणार नाही. आपण म्हणतो ना, की या घटनेनं माझ्या आयुष्याला कलाटणी मिळाली, तशीच ही घटना. अर्थात, जेव्हा हे सारं घडलं तेव्हा या घटनेचा […]

आणीबाणी

पुण्यातल्या तरुण भारत या दैनिकामध्ये त्यावेळी मी काम करीत होतो. नेमकेपणानं सांगायचं तर २६ जून १९७५ रोजी रात्रपाळीचा उपसंपादक म्हणून माझं काम सुरू होतं. त्याआदल्या दिवशी पहाटे चारपर्यंत ऑफिसमध्येच होतो. इंदिरा गांधींनी काही विरोधी नेत्यांची धरपकड केल्याचं छोटं वृत्त त्यादिवशीच्या अंकात प्रसिद्धही केलं होतं; पण खरी सुरुवात झाली ती २६ जून रोजी. देशात अंतर्गत आणीबाणी जाहीर […]

फौजदार

  एकोणिसशे ऐंशीचा तो काळ. नुकताच कोल्हापूरमध्ये दाखल झालेलो होतो. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घटना-घडामोडी इतक्या होत्या, की बातम्या लिहिताना दमछाक व्हावी. त्यात निवडणुकीचे दौरे, प्रत्यक्ष मतदारांचा अंदाज घेण्यासाठी भेटीगाठी असं बरंच काही सुरू होतं. अचानक एके दिवशी मुख्य कार्यालयातून फोन आला. सांगली भागाचा दौरा करून या वसंतदादांच्या दौर्‍याचा वृत्तांत द्या. त्यावेळी माझी सारी मदार स्कूटरवर असायची. कोल्हापूर-सांगली […]

भेट

शरद जोशी, हे नाव महाराष्ट्राला तरी अपरिचित नाही. ही गोष्ट त्यांच्याच संदर्भातली आहे. घटना आहे १९८० ची.
[…]

गरीब आणि गरिबी

  एकदा एका थंड हवेच्या ठिकाणी असलेल्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी निबंध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विषय होता गरिबी. खरं तर ‘गरिबी’ या शब्दाशी ज्यांचा त्यांच्या अल्पशा हयातभर संबंध आला असल्याची शक्यता नव्हती. तरीही शिक्षकांना वाटत होते, की आपले विद्यार्थी ‘गरिबी’ या विषयावर उत्तम लेखन करू शकतील. स्पर्धा झाली. निबंध झाले. त्यांचे परीक्षण झाले आणि एका मुलाला […]

1 4 5 6 7 8
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..