Articles by दिनेश रामप्रसाद दीक्षित
चला बदल घडवू या…
सार्वत्रिक जीवनात जगताना आपल्या अवती-भोवती अशा अनेक घटना घडत असतात, ज्यातून आपल्याला हे जाणवत जातं की हा कुऱ्हाडीचा दांडा त्याच्याच गोतासाठी काळ ठरत आहे. पण आपली देखील गंमत अशी आहे, की आपण फारसे बंड करून उठत नाही. फारसे विरोधात बोलत नाही. सर्वसामान्यांची जी ताकद आहे, ती एकजुटीने वापरली गेली तर निश्चितपणे बदल घडेल यात शंका नाही. […]
काळाचा पडदा
काळाचा हा पडदा इतका गडद, गहिरा आहे, पण तो न दिसणाराही आहे… आपण उद्या कधीच पाहू शकत नाही.. ओशो रजनीश म्हणतात, ‘आज वही कल है, जिस कल की फिक्र तुम्हे कल थी…!’ […]
झडी आठवणींची
आठवणींच्या झडीत चिंब झालेलं मन.. हरखुन गेलेलं असतं.. स्वत:ला, भोवतालाला विसरलेलं असतं. त्याला आठवत राहतं.. लहानपणापासुन आईनं केलेलं संस्कार.. बाबांनी दिलेली लढण्याची जिद्द… शाळेत गेल्यावर पाटीवर काढलेलं पहिलं वेडवाकडं अक्षर.. चुकल्यानंतर गुरूजींनी पाठीत हाणलेला धपाटा.. पाठीवर वळ उमटला तरी त्यातही गंमत असल्याची जाणीव नंतर होऊ लागते. […]
गाठोड्यातलं सत्य
गाठोड्याच्या उत्तरानं बिचारा अधिकच गांगरला… काही कळेना काय होतयं… मी कोणाचा शोध घ्यायला आलो होतो मंदिरात … काय हवं होतं मला… न्याय की सत्य… मला न्याय हवा होता… समाजाला सत्य हवं होतं… सत्य ही न्यायाची देवता… म्हणजे या मंदिरात न्यायदेवता नाही… सत्य नाही… असा त्याचा अर्थ लावायचा का? […]
आत वेगळा बाहेर वेगळा
आपण जसे बाहेरच्या जगासमोर असतो ना, तसे आपल्या आतल्या जगात नसतो. बाहेरच्या जगात मला एखाद्या गोष्टीचा राग येत असेल तर मी व्यक्त होत नाही, मात्र आतल्या आत व्यक्त होत राहतो… अगदी स्पष्टपणे… […]
नातं..
एका माणसाचं दुसऱ्या माणसाशी नातं जुळणं ही या संसारातील सगळ्यात मोठी आणि भाग्यशाली गोष्ट. रस्त्याने जातांना कुणी ओळखीचं दिसलं की आपण लगेच हसतो, गालातल्या गालात. जवळचे आप्त-नातेवाईक हे तर असतातच… पण त्यांच्याही पलिकडे काही नाती अगदीच घट्ट होत जातात… टिकतात आणि आयुष्यभर साथ देणारी होतात…. माणुसपणाचं नात दृढ झालं पाहिजे… वाढले पाहिजे…..हेच मागणे..! […]
गुरूतत्त्वास करुया वंदन
भारतीय संस्कृती जगातील इतर संस्कृतींच्या तुलनेत अधिक प्रगल्भ आणि आधुनिक जगाला मार्गदर्शन करण्याची क्षमता ठेवणारी आहे. भारतीय संस्कृतीतील अनेक परंपरांचे आजही अनुकरण केले जात आहे. गुरू परंपरा ही देखील त्यातीलच एक. […]
झाड म्हणालं…
जातकुळीच्या झाडांनी आणि वनस्पतींनी समृध्द आहे. जागोजागी त्या त्या वातावरणात, नैसर्गिक पध्दतीने रुजलेले, जोमाने वाढलेले वृक्ष म्हणजे स्थानिक किंवा देशी वृक्ष अशी सोप्पी व्याख्या आपण करू शकतो. हे असे देशी वृक्ष आपल्या जंगलात किंवा स्थानिक हिरव्या पट्टयात पर्यावरणाचा समतोल साधत असतात. […]