नवीन लेखन...
Avatar
About दिनेश रामप्रसाद दीक्षित
मी जळगाव येथे वास्तव्यास असतो. जळगाव येथे गेल्या २५ वर्षापासून मी पत्रकारितेत कार्य करत आहे. दहा वर्ष मु. जे. महाविद्यालयाच्या जर्नालिझम डिपार्टमेंटमध्ये गेस्ट लेक्चर घेतले आहेत. मला सामाजिक कार्यात भाग घेण्याची आवड आहे. तसेच तरुण मुलांशी संवाद साधुन त्यांना चांगल्या गोेष्टी सांगण्याचा प्रयत्न करणे आवडते.

काटेपुराण…

जुन्या काळातील चित्रपटात एक सीन हमखास रहायचा, तो म्हणजे नायिका बागेत चालत असते… चालता चालता तिच्या पायात अचानक काटा रुततो… शेजारी असलेला नायक अलगद तिच्या पायातला काटा काढतो… चित्रपट पुढे सरकत जातो. थोडक्यात काय तर चित्रपटात नायक-नायिकेचे प्रेम फुलवायला आणि चित्रपट पुढे सरकवायला काटा कारणीभूत ठरतो… […]

कोरा कागज

कागदावर काय नाही अवतरतं याचा विचारही आपण करू शकत नाही. कागदावर भाषण अवतरतं, आश्वासन अवतरत. निवडणूकीची घोषणा अवतरते. इतक्या साऱ्या रंगात न्हाऊनही कागदाचा स्वत:चा रंग मात्र कोराच राहतो. तो रंगतो आपल्या शब्दांत, आश्वासनात त्याचे अंतरंग मात्र कोरेच राहते…. कोरा कागज सारखे… कदाचीत तोही म्हणत असेल का मनातल्या मनात… ‘मेरा जीवन कोरा कागज… कोरा ही रह गया…..!’ […]

घाईत घाई…

शांत, संथ लयीत चालणारं आपलं जीवन आपणच घाई गर्दीत हरवून टाकतोय असं नाही का वाटत. काय फरक पडतो थोडसं सिग्नलवर थांबलं तर.. काय फरक पडतो एसटीत चढतांना थोडा संयम बाळगला तर. काय फरक पडतो.. रांगेत उभे असताना थोडी शिस्त बाळगली तर… पटतं सगळं.. पण वळत नाही.. काय करणार…! […]

अधिकार

अधिकार.. मानवाला मिळालेले अधिकार. काही अधिकार हे आपल्याला जन्मापासुन मिळालेल असतात, काही घटनेने दिलेले आहेत.  व्यक्त होण्याचे अधिकार, नाकारण्याचे अधिकार, स्वीकारण्याचे अधिकार, बोलण्याचे अधिकार, व्यवहाराचे अधिकार, देण्याचे अधिकार, घेण्याचे अधिकार, कामगारांचे अधिकार, शेतकऱ्यांचे अधिकार, महिलांचे अधिकार, मुलांचे अधिकार… अधिकाराची ही जंत्री वाढतच जाणार आहे. […]

चर्चेचं गुऱ्हाळ

जेवण वैगरे आटोपून आपण थकुन अंथरुणावर पडतो. मात्र तिथे देखील मन आपल्याला शांत बसु देत नाही. अनेक विचार मनात जन्म घेत असतात. मग आपण चर्चा करत राहतो आपल्याच मनाशी बराच वेळ… झोप येईपर्यंत. चर्चा काही आपला पिच्छा सोडत नाही हे मात्र खरे…! […]

विश्वची विश्व पहा जगती अन धावती

बी रुजते, वाढते, त्याचे रोपटे होते, रोपट्याचा वटवृक्ष होतो. बी ला माहिती नसते तिच्या आत दडलेल्या वटवृक्षाच्या अस्तित्वाची. तिची सृष्टी वेगळी असते. पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक सजीवाची सृष्टी वेगळी, त्याची रचना वेगळी. मानवी विश्वात प्रत्येक माणुस स्वत:ची वेगळी सृष्टी बाळगुन असतो. आपल्याच विश्वात रममाण झालेला. त्याची दु:खे, त्याचे सुख याचे कारण आणि निराकारण तोच करू शकतो. जसा […]

मुलं आणि फुलं

नाजूक, निर्लेप आणि निखळता ज्यांच्यात आहे अशी फुलं आणि हेवा, दावा, व्देष यापैंकी कोणताही रंग ज्यांच्यावर चढलेला नाही अशी मुलं. दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू…! कशा..! फुलं उमलतं, बहरतं आणि सुगंधतं. त्याच्या उमलणं स्वाभाविक असतं. आतून आलेलं असतं. कुणी त्यासाठी विशेष प्रयत्न करत नाही, म्हणूनच ते प्रभावी असतं, परिणामकारक, आपलं करणारं असतं. मुलंही अशीच असतात. स्वच्छ […]

माझे प्रजासत्ताक

वर्ग भरला होता, गुरूजी मुलांना काहीतरी समजावत होते. वातावरण हलकं-फुलकं होतं. दोन दिवसावर प्रजासत्ताक दिन आला होता. त्यामुळे देशासाठी बलीदान देणाऱ्यांच्या गोष्टी गुरूजी मुलांना सांगत होते. मध्येच एका मुलाने ‘प्रजासत्ताक म्हणजे काय?’ असा प्रश्न गुरूजींना विचारला… गुरूजी हसले म्हणाले, ‘सोपं आहे, ज्या ठिकाणी प्रजेचं म्हणजे लोकांचं राज्य आहे, सत्ता आहे ते म्हणजे प्रजासत्ताक’ गुरूजींनी सोप्या शब्दात […]

बदल आणि बदलणे

अनादीकालापासून आपण ऐकत आलोय, ते म्हणजे बदल हा सृष्टीचा नियम आहे. कुणी सांगितलय हे. खरच सृष्टी बदललीय का हो? सूर्य आधी जसा उगवत होता, तसाच आजही उगवतो, मावळतो. चंद्राचे ही तसेच आहे. पृथ्वीचे फिरणे तसेच आहे, पाऊस येतो, उन्हाळा, हिवाळाही येतो. मग सृष्टी कशी बदलली. तिच्यात काही बदल झालेत हे जरी मान्य केले तरी त्यात मानवी […]

फायलींचा प्रवास…

शासकीय कार्यालयं. फायलींचा ढिग.. फायली अनेकांच्या आशा अपेक्षा कैद झालेल्या, कुणीची टेंडर गिळून बसलेल्या फायली, कुणाचे प्रमोशन थांबवून बसलेल्या फायली. कुणाची तक्रार घेऊन आलेल्या फायली. कुणाच्या अपेक्षांच्या निवेदनाने तयार झालेल्या फायली… एक ना अनेक विषय या फायलींत कैद झालेले असतात, आहेत. ऑन-लाईन आणि ई-टेंडरिंगच्या जमान्यातही फायली आहेतच की. कारण फायली असल्याशिवाय काम होत नाही, असा एक […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..