शंख व त्याचे हिंदू धर्मातील महत्व
शंखाचे अनेक प्रकार आहेत. पण शास्त्रानुसार वामावर्ती आणि दक्षिणावर्ती शंख हे सर्वात महत्त्वाचे मानले जातात. शंख निर्मिती ही शंखचूर्णांच्या हाडांपासून होते असं मानलं जातं. तर त्यांची उत्पत्ती समुद्र मंथनादरम्यान झाली होती असंही मानलं जातं. हेच कारण आहे की, देवी लक्ष्मी आणि दक्षिणावर्ती शंख हे दोघे भाऊ-बहिण मानले जातात. शंख हा लक्ष्मीचा छोटा भाऊ समजला जातो. शंख हे समुद्र मंथनातून प्राप्त झालेले पाचवे रत्न आहे. […]