महाराष्ट्रातील औषधी वनस्पती : भाग ७ – सीताफळ
सीताफळ हे मूळचे वेस्ट इंडिज बेटे व दक्षिण अमेरिकेचे. त्यानंतर ते भारतात आले. सीताफळाचे झाड सहजच कुठेही, माळरानावर उगवते किंवा त्याची लागवडही करतात. याचे शास्त्रीय नाव Annona squamosa आहे. हे उष्णकटिबंधीय अमेरिकेच्या आणि वेस्ट इंडीजच्या काही भागांमधे आढळणारे. खरे तर याचे नांव शीतफळ. नंतर त्याचा अपभ्रंश शिताफळ व मग सीताफळ असा झाला. […]