भारताचे एडिसन -डॉ. शंकर आबाजी भिसे
विसाव्या शतकाच्या प्रारंभी अनेकानेक लोकोपयोगी वैज्ञानिक शोध लावणारे, तसेच मुद्रण तंत्रज्ञानातील आपल्या युगप्रवर्तक शोधाने ‘भारतीय एडिसन’ हे बिरुद प्राप्त करणारे भारतीय शास्त्रज्ञ डॉ. शंकर आबाजी भिसे यांचा जन्म मुंबईतील एका चांद्रसेनीय कायस्थ प्रभू (सी.के.पी.) कुटुंबात २९ एप्रिल १८६७ रोजी झाला. […]