डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य
कादंबरी :
1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी )
दीर्घकथा संग्रह:
1 रानोमाळ, 2 रानवा
संगीत नाटक :
1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा
गद्य नाटक:
1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल
काव्यसंग्रह:
1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला
ललित लेख: (आगामी)
1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे
कथासंग्रह:(आगामी )
1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा
बाल वाङ्मय:
1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी )
संपादन :
1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा
पारितोषिके:
1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर,
2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक
3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक
उल्लेखनीय :
* पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन
* सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण
* क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण
*आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित
* समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित
* अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन
पुरस्कार
1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार
2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार
3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार
4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार
5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार
6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम
7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार
8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम
9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार
10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार
11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार
12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम
13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार
14 आदर्श शिक्षक पुरस्कार
15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार
16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार....
हा माझा अल्प असा परिचय ...!!!
त्यानं दिलेल्या उपम्याची चव अजून जिभेवर रेंगाळत होती . तिला वाटलं , अजून थोडा उपमा हवा होता पोट भरण्यासाठी नाही , केवळ चवीसाठी . तिनं इकडे तिकडे पाहिलं . ट्रेनमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती . बहुतेक सगळ्यांच्या हातात त्यानं दिलेल्या उपम्याच्या डिश दिसत होत्या . आणि सगळे चवीनं खात होते . ” उपमा विकणारा गेला का पुढच्या […]
सन २०१० छत्तीसगढ मधील बस्तर गावात ७६ जवानांची जाळून केलेली क्रूर हत्या ! ही एक सत्य घटना!! आपल्या वाचनात आलीच असेल . छत्तीसगढ मधील एका साध्या इमारतीत सी आर पी एफ चे जवान विश्रांती घेत आहेत . […]
वरात एकाएकी थांबली . गाणं वाजवण्यात दंग झालेला बँड बंद झाला . भल्या मोठ्या स्पीकर्सच्या प्रचंड भिंती अचानक अबोल झाल्या . रस्त्यावर बेभान होऊन नाचणारे , लोळण घेवून नागीण डान्स करायला अधीर झालेले , मान खाली घालून एक हात उंचावत , वाद्यांच्या ठेक्यावर डोलणारे इकडे तिकडे बघू लागले . […]
दीपावली म्हणजे आपल्या आयुष्याला आकार देणारे एक प्रकाशपर्व ! आनंदाचा मंगलमय अमृतकलश घेऊन येणारे जीवनातील अनमोल क्षण !नवी स्वप्ने , नव्या आकांक्षा यांना मिळणारी सुवर्ण झळाळी म्हणजे हा दीपोत्सव ! आपल्या जगण्याला नवीन भान देणारी , आपल्या तनमनात वज्रशक्ती पेरणारी , नवसृजनाला आवाहन करणारी तेजाची आरती म्हणजे हा दिव्यांचा सण ! […]
अजन्मा पहाडावर बसला होता . सोबतीला बालमित्र सुदामा होता .पण तो काहीसा अंतर ठेवून बसला होता . केवढा तरी पहाड वर चढून येणं त्याला भयंकर वाटत होतं . पण अजन्म्याच्या अंगात प्रचंड उत्साह संचारला होता . […]
झेलमच्या पाण्याचं दर्शन घ्यायचं , गेल्या पंचाहत्तर वर्षातले साठवून ठेवलेले अश्रू तिला अर्पण करायचे , आई , दोघी बहिणी , आत्या आणि गल्लीतल्या कित्येक जणींना श्रद्धांजली अर्पण करायची , अशी कैक वर्षांची इच्छा होती तिची .
दरवर्षीच्या चौदा ऑगस्टला आशाराणी गप्पगप्प असायची . मौन असायचं तिचं. सकाळपासून पाण्याचा थेंबही घेत नसे ती . छावणीत ती एकटीच बसून राहायची . आणि डोळ्यातून अश्रूंचा अविरत पूर वाहत असायचा . […]
वैधानिक इशारा : ही कथा अश्लील नाही . भविष्यातील गंभीर संकटाची ही सुरुवात आहे . आपल्या मुलांची काळजी असेल तर पालकांनी ही कथा वाचायलाच हवी . ब्रेक तुटलेले आहेत . गाडी तीव्र उतारावर आहे . उद्ध्वस्त करणाऱ्या विचारसरणीची खोल गहिरी दरी आ वासून उभी आहे … म्हणून कथा वाचायला हवी […]
एका घरट्यात दोन पिलं कासावीस झाली आहेत . त्यांचं निःशब्द आक्रंदन आपल्याला तर जाणवेलच पण पाषाण हृदयी माणसाच्या मनाला सुद्धा जाणवेल . आणि पिलांकडे न पाहता पिलांचे आईबाप ठरवून पाहिल्यासारखे दुसरीकडे नजर फिरवून फांदीवर अगदी अलिप्तपणाने बसले आहेत , हे सुद्धा जाणवेल . […]
उन्मादाच्या नशेत झिंगून आपल्या विकृतीचे भयंकर प्रदर्शन करताना , मांडलेले थैमान सर्वांना भयकंपित करणारे होते . विच्छिन्न झालेले ते शिल्प पाहताना यातनांनी तडफडणाऱ्या आपल्या आत्म्याला किती भयंकर क्लेश झाले असतील याची कल्पना सुध्दा करता येत नाही . […]
(ओल्या मातीला आकार देणाऱ्या सर्व गुरुजनांना सादर समर्पित !) संधिप्रकाशात उभी असणारी झाडे अचंबित होऊन खाली पहात होती . खाली पसरलेल्या सावल्यात , विविध वयोगटातील असंख्य मुलं , शांतपणानं बसली होती . कुणीच बोलत नव्हतं . एक प्रकारचा आत्मविश्वास आणि निर्धार त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता . त्यांच्या हातात घोषणा लिहिलेले बोर्ड दिसत होते . फारच वेगळ्या […]