मंदिराचे दार (अलक)
बंद दाराबाहेर अनेक भाविक योग्य ते अंतर राखून रांगेत उभे होते […]
बंद दाराबाहेर अनेक भाविक योग्य ते अंतर राखून रांगेत उभे होते […]
दादासाहेब सर्वांच्या आदराचं स्थान होते. रंगभूमीवरील अनभिषिक्त राजे होते. गेली पन्नास वर्षे अथकपणे त्यांनी रंगभूमीची सेवा केली होती. असंख्य कलाकारांना घडविण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. संपूर्ण कारकीर्द यशस्वी, हाऊसफुल गर्दीनं भरलेली आणि निष्कलंक अशी होती. त्यामुळं त्यांना जीवनगौरव जाहीर झाला आणि समाजाच्या सर्वच क्षेत्रातून आदरयुक्त कौतुकाचा वर्षांव झाला होता. त्याचं प्रतिबिंब आजच्या समारंभात उमटलं होतं. […]
अन्यथा जात, पात, धर्म, पंथ, राजकारण आणि स्वार्थ यात गुंतून गेल्यानं नव्या पिढीच्या डोक्यावरचं आभाळ हरवून जायला वेळ लागणार नाही आणि मग काळ कुणालाही क्षमा करणार नाही! […]
एखाद्या संहितेचं भागधेय असतं. प्रत्येक वेळी यश लाभतं असं नाही. पण मी नाराज नाही. कारण माझी संहिता दमदार आहे. कथानक वेगळं आणि हसताहसता विचार करायला लावणारं आहे. दिग्दर्शक आणि कलाकार यांना रंगमंचावर मनसोक्त धुमाकूळ घालायला संधी मिळणार आहे आणि … आणि बरंच काही आहे त्या संहितेत. […]
त्यानंतर राजाभाऊंनी माझ्या अनेक कथा , कादंबऱ्या प्रसिद्ध केल्या आणि मला स्वतःची अशी ओळख दिली. त्यावेळी महाराष्ट्रभर जाणाऱ्या माहेर , मेनका या लोकप्रिय मासिकांमधून आणि रविवारची जत्रा या लोकप्रिय साप्ताहिकामधून त्यांनी मला प्रचंड प्रसिद्धी दिली ,जी रत्नागिरीसारख्या ठिकाणी असणाऱ्या मला दुर्मिळ होती. यथावकाश अन्य पुस्तकं प्रसिद्ध झाली. मानसन्मान , पुरस्कार लाभले. पण त्या पहिल्या पुस्तकाच्या आठवणी काही औरच! […]
तात्या म्हणजे त्यावेळचे काँग्रेसचे खासदार मोरोपंत जोशी. नवकोकण या नावाच्या साप्ताहिकाचे ते मालक , मुद्रक , संपादक होते. तेव्हा आम्ही टिळक आळीत रहात होतो. नवकोकण चा छापखाना आणि कार्यालय टिळक आळीत होते. तात्यासुद्धा टिळक आळीत राहायचे. ते वृद्ध होते , राज्यसभेचे खासदार होते. त्यांच्याबद्दल सर्वाना आदर होता. मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा ते काहीतरी लिहीत होते . मी त्यांना हाक मारली . तेव्हा चष्मा थोडा पुढे ओढून त्यांनी माझ्याकडे पाहिले . […]
आकाशवाणीनं आयोजित केलेल्या अखिल भारतीय नभोनाट्य लेखन स्पर्धेत मला प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं होतं. माझ्या डेथ ऑफ कॉमनसेन्स या नभोनट्याला अखिल भारतीय स्तरावरचा प्रथम क्रमांक मिळाला होता , त्याचे चौदा भारतीय भाषांत भाषांतर झाले होते. ते पारितोषिक दिल्लीत स्वीकारताना असाच टाळ्यांचा गजर झाला होता. यशाची सुरुवात गोगटे महाविद्यालयात झाली होती आणि केंद्र शासनाच्या पुरस्काराने त्या यशाला झळाळी लाभली होती . […]
लेखक म्हणून मी जेव्हा लिहायला लागलो तेव्हा कथानकं , मांडणी , शैली , पात्रं , प्रसंग , संवाद यांचं महत्व काय आणि कसं असतं , त्यात शब्दांचा वापर किती जपून करावा लागतो हे अर्थातच आपोआप मनावर ठसलं गेलं होतं. वादविवाद स्पर्धा , वक्तृत्व स्पर्धा आणि परीक्षेच्या काळातही गुरुवर्य बाबीराव गोडबोले सरांच्या घरातील ज्ञानभांडाराचा मला खूप उपयोग झाला. – उगवतीच्या काळातील ह्या कळा विसरता येत नाहीत . […]
परिस्थितीचा रेटा असायला हवा. त्यात गरिबी हवी. आत खोलवर जाऊन पोहोचलेली स्वाभिमानाची जाणीव हवी. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ईर्ष्या हवी. अडथळ्यांना न जुमानता वाट शोधण्याची दृष्टी हवी. त्यासाठी सभोवतालचा अंदाज घेत कल्पकतेनं उडी मारण्याची आणि उभारी घेण्याची मनाची तयारी हवीच हवी. मग काय होतं? […]
सध्या तुफान व्हायरल होत असलेला एक व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल… लाकडी खाटेवर बसलेला एक पाच वर्षांचा लहानगा विडी ओढत आहे , असा ती व्हिडीओ आहे. बघायला गमतीशीर आहे तो. अगदी मोठ्या माणसासारखा बसलाय पायावर पाय टाकून. दोन बोटांत विडी. मधूनच तो झुरके मारतोय. धूर सोडतोय. दोन झुरक्यांच्या मधल्या काळात , विश्वाची चिंता लागावी आणि ती डोळ्यातून व्यक्त व्हावी , तसे हावभाव. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions