नक्षत्रांची वेल
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त लिहिलेली, कोरोना काळातील माझी एक कथा. […]
आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त लिहिलेली, कोरोना काळातील माझी एक कथा. […]
— मी कुठं आहे तेच कळत नाही . शरीराची तडफड होते आहे . शरीराला झालेल्या जखमांची आग सहन होत नाहीय . डोळ्यावर झापड आहे , पण तरीही अंधुक असं काही दिसतंय. गाड्यांचे , हॉर्न चे आवाज असह्य होतायत . पब्लिकची गर्दी जाणवतेय . आणि अँब्युलन्सचा सायरन ऐकू येतोय . काहीतरी घडलंय . पब मधून येताना लाँग […]
चढत्या रात्री द्रव सोनेरी । चषकांमधली नशा बिलंदर । मंद सानुली ज्योत सांगते । हे नच अपुले नवसंवत्सर ।। थाट चालतो माठ जिवांचा । किनाऱ्यावरी गर्दी कलंदर । पश्चिमेकडे झुकता झुकता । दिशादिशांतील वाढे अंतर ।। उगा कशाला सदा वाहता । दास्यवृत्तीची मढी खांद्यावर । रूढी तोडुनी गढी गाडता । अभिमानाने फुलेल अंबर ।। ब्रह्मध्वज हा […]
वायस पुराण ही एक फॅन्टसी आहे. सर्व ज्येष्ठ नागरिकांना आणि वृद्धाश्रमात खितपत पडलेल्या सर्वांना ही फॅन्टसी समर्पित करीत आहे. […]
मोरूचा बाप मोरूला म्हणाला, ‘ ऊठ लेका, जागा हो, तोंड खंगाळ आणि काऊने दिलेला चहा प्राशन करून दाराबाहेर ही कागदांची चळत घेऊन उभा राहा. आणि येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाच्या हाती यातील एकेक कागद दे, त्यांना म्हणावे, हे आमचे सर्वसामान्यांचे अपेक्षापत्र आहे. ते वाचण्याची कृपा करावी. तत्पूर्वी तूही ते नजरेखालून घालावेस, हे बरे. म्हणजे वादविवाद नामक प्रेमळ संवादासाठी तुला तयारी करता येईल.’ […]
खरा इतिहास आणि क्रांतिकारकांचं हौतात्म्य , इतिहासकारांनी जसंच्या तसं मांडायला हवं होतं .पण खऱ्या इतिहासाचा अभ्यास करताना लक्षात आलं की पुढच्या पिढीला स्वातंत्र्यलढ्याचा दैदिप्यमान इतिहास कळू नये अशीच व्यवस्था केली गेली आहे . खऱ्या खोट्याची भेसळ करून उत्तुंग व्यक्तिरेखांना हिणकस ठरवलं जात आहे . परकीय आक्रमकांना नायक ठरवण्याची घाई झाली आहे . […]
विनायकानं स्वतःच्या मनाला बजावलं आणि पाठून ढकललं गेल्यानं जाणारा तोल सावरला आणि प्राणांतिक यातना हसत सहन करत कसाबसा बोटीतून होडक्यात आणि होडक्यातून हिंदुस्थानच्या दक्षिण भूमीवर उतरला .
कसंबसं स्वतःला सावरत ,खाली वाकून हिंदुस्थानच्या भूमीवरची माती भाळावर लावली . […]
गर्दीचा महासागर उसळला होता. लाटांवर लाटा येऊन आदळत होत्या. गर्दी बेभान होती. गर्दी दिशाहीन होत होती. गर्दी पुढं सरकण्याचा प्रयत्न करीत होती. पण कुणाचंही पाऊल पुढं पडत नव्हतं. […]
तत्कालीन राज्यकर्ते, त्यांचे राजकारण, त्यांची स्वार्थी आणि संकुचित दृष्टी, त्यांच्या विकल्या गेलेल्या निष्ठा, जमिनीवर आणि स्त्रियांवर केलेले अत्याचार, नृशंस हत्याकांडे, देशभक्तांच्या हत्या, सांस्कृतिक वैभवावरचे भीषण आघात, प्राचीन मंदिरांचा विध्वंस, हिंदूंवर विशेषत: पंडितांवर केलेले क्रूर अत्याचार, बलात्कार अशा कित्येक कहाण्या वाचायला मिळाल्या होत्या. […]
अवंतीपूर ! एके काळची काश्मिरची राजधानी . श्रीनगर ही काश्मिरची राजधानी होण्याअगोदरची नितांतसुंदर राजधानी ! समृध्दी , सौंदर्य , सौहार्द , सात्विकता यांचे मूर्तिमंत प्रतीक ! कलात्मकता , काव्यात्मकता , कौशल्य , कणखरपणा यांचा अद्वितीय संगम ! राजाधिराज अवंतीवर्मन यांनी आठव्या शतकात वसवलेली अद्वितीय , अप्रतिम राजधानी ! चिनार , देवदार सारख्या दीर्घायुषी वृक्षांची जाणीवपूर्वक केलेली […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions