निमित्त : १
‘उरी ‘ पुन्हा पाहिला आणि त्यानंतर लगेचच ‘ ऍक्सिडेंटल प्राइमिनिस्टर ‘ पाहिला , आणि खरं सांगतो राहवलंच नाही. लेखणी पुन्हा हाती घेतली. […]
‘उरी ‘ पुन्हा पाहिला आणि त्यानंतर लगेचच ‘ ऍक्सिडेंटल प्राइमिनिस्टर ‘ पाहिला , आणि खरं सांगतो राहवलंच नाही. लेखणी पुन्हा हाती घेतली. […]
चढत्या रात्री द्रव सोनेरी । चषकांमधली नशा बिलंदर । मंद सानुली ज्योत सांगते । हे नच अपुले नवसंवत्सर ।। थाट चालतो माठ जिवांचा । किनाऱ्यावरी गर्दी कलंदर । पश्चिमेकडे झुकता झुकता । दिशादिशांतील वाढे अंतर ।। उगा कशाला सदा वाहता । दास्यवृत्तीची मढी खांद्यावर । रूढी तोडुनी गढी गाडता । अभिमानाने फुलेल अंबर ।। ब्रह्मध्वज हा […]
– भीषण , भयंकर , निर्दय , निष्ठूर , क्रूर , अघोरी हे शब्दसुद्धा सौम्य वाटावेत असं ते दृश्य ! कालची रात्र प्रचंड अस्वस्थतेत गेलेली . मन सुन्न आणि मेंदू बधीर अवस्थेत गेलेला . डिलीट केल्यानंतरसुद्धा अजूनही व्हिडिओतले ते दृश्य डोळ्यांसमोर सारखं उभं राहतंय . भयभीत करणारं . हृदयाचे ठोके थांबवणारं . नजरेत अंगार निर्माण करणारं. […]
“– आयुष्यात पडझड केव्हा सुरू होते माहितेय ? ” माशाने अचानक विचारले . याची अनेक उत्तरे आहेत , पण तुला काय अभिप्रेत आहे , हे मला कसे कळणार ? असं त्याला विचारावं , असं वाटलं . पण काही बोललो नाही . एक म्हणजे उपयोग झाला नसता आणि दुसरे म्हणजे माझ्या मनातला विचार त्याला अगोदरच कळत होता […]
— मी सोफ्यावर बसून होतो आणि तो जिन्याने वरखाली ये जा करीत होता . वर जाताना टणाटण उड्या मारीत होता आणि खाली येताना चक्क घसरत येत होता . त्यात त्याला मजा वाटत होती . त्याच्या वर खाली करण्याकडे माझं लक्ष असल्यानं व्यायाम केल्यासारखी माझी मान हलत होती . मुलांनी आणि पत्नीने विचारले सुद्धा .. ” आज […]
— त्यांच्या हातात झेंडे होते . चेहरे थकलेले आणि देह रापलेले वाटत होते . हातातल्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या ते हलवीत होते . त्यांची पाण्याची गरज त्यातून जाणवत होती . पण महामार्गावर थांबता येत नव्हते . वाहने सुसाट पळत होती . तरीही गाडीचा वेग कमी करीत मी थांबण्याचा निर्णय घेतला . गाडी उभी केल्यावर त्यातल्या एकाला बोलावले […]
असे शब्द कानावर पडले की सुरू होते एखादी सुरेल मैफल , एखादं संगीत नाटक , एखादं गद्य नाटक , एखादी संगीत स्पर्धा किंवा एखादं प्रशिक्षण शिबीर …आणि सगळ्याच वयोगटातील रसिक आतुरतेनं समोरच्या रंगमंचाकडे पाहू लागतात. हे आजचं नाही . गेली २५ वर्षे अव्याहतपणे , अविरत सुरू आहे संगीताचा अवीट प्रवाह. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी मैफल रंगत असते . […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions