डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य
कादंबरी :
1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी )
दीर्घकथा संग्रह:
1 रानोमाळ, 2 रानवा
संगीत नाटक :
1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा
गद्य नाटक:
1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल
काव्यसंग्रह:
1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला
ललित लेख: (आगामी)
1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे
कथासंग्रह:(आगामी )
1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा
बाल वाङ्मय:
1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी )
संपादन :
1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा
पारितोषिके:
1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर,
2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक
3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक
उल्लेखनीय :
* पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन
* सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण
* क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण
*आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित
* समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित
* अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन
पुरस्कार
1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार
2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार
3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार
4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार
5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार
6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम
7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार
8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम
9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार
10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार
11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार
12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम
13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार
14 आदर्श शिक्षक पुरस्कार
15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार
16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार....
हा माझा अल्प असा परिचय ...!!!
— मी सोफ्यावर बसून होतो आणि तो जिन्याने वरखाली ये जा करीत होता . वर जाताना टणाटण उड्या मारीत होता आणि खाली येताना चक्क घसरत येत होता . त्यात त्याला मजा वाटत होती . त्याच्या वर खाली करण्याकडे माझं लक्ष असल्यानं व्यायाम केल्यासारखी माझी मान हलत होती . मुलांनी आणि पत्नीने विचारले सुद्धा .. ” आज […]
— त्यांच्या हातात झेंडे होते . चेहरे थकलेले आणि देह रापलेले वाटत होते . हातातल्या रिकाम्या पाण्याच्या बाटल्या ते हलवीत होते . त्यांची पाण्याची गरज त्यातून जाणवत होती . पण महामार्गावर थांबता येत नव्हते . वाहने सुसाट पळत होती . तरीही गाडीचा वेग कमी करीत मी थांबण्याचा निर्णय घेतला . गाडी उभी केल्यावर त्यातल्या एकाला बोलावले […]
असे शब्द कानावर पडले की सुरू होते एखादी सुरेल मैफल , एखादं संगीत नाटक , एखादं गद्य नाटक , एखादी संगीत स्पर्धा किंवा एखादं प्रशिक्षण शिबीर …आणि सगळ्याच वयोगटातील रसिक आतुरतेनं समोरच्या रंगमंचाकडे पाहू लागतात. हे आजचं नाही . गेली २५ वर्षे अव्याहतपणे , अविरत सुरू आहे संगीताचा अवीट प्रवाह. दर महिन्याच्या दुसऱ्या शनिवारी मैफल रंगत असते . […]
आई जगदंबे…. तुझ्या सहस्रावधी रुपांच्या दर्शनाची आस आहे . तुझ्या अस्तित्वाचा ध्यास आहे माऊली , तुझ्या प्रसन्न आशीर्वादाचा वरदहस्त नित्य लाभावा आणि मायेचा ओलावा आमच्या हृदयात पाझरत रहावा , यासाठी जगदंबे , दोन्ही कर जोडून ही विनवणी करतो आहे . […]
दिवाळीच्या दिवसात, सं.शांतिब्रह्म, सं. घन अमृताचा, सं. ऐश्वर्यवती, यासारख्या माझ्या संगीत नाटकांचे, आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून झालेले प्रक्षेपण, केवळ रत्नागिरी केंद्रमुळेच शक्य झाले. आणि माझ्या आयुष्यातील यशाचा परमोच्च बिंदूसुद्धा आकाशवाणीच्या रत्नागिरी केंद्रमुळेच प्राप्त झाला. […]
आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांची नोंद न घेणारं आपलं कमकुवत मन! पण प्रत्येक घटना आपल्या आयुष्यावर , कुटुंबावर पर्यायाने आपल्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब करीत असते. […]
नेहमीच्या सवयीनं डोअरबेल वाजवण्यासाठी , नंदिनीनं हात वर केला , पण बेल न वाजवता ती तशीच उभी राहिली . बेल वाजवावी की पुन्हा लिफ्टनं खाली जावं ? तिनं गोंधळलेल्या मनालाच प्रश्न विचारला . आणि तसंही आता खाली जाऊन काय उपयोग ? तो रिक्षावाला एव्हाना गेटमधून दूर गेलासुद्धा असेल. आपण उगीच बोललो त्याला. तो काय म्हणत होता […]
– एसटी थांबली . मी उतरलो . घरी निघालो . रात्र झाली होती . घाटी चढताना मी सहज घराकडे नजर टाकली . आई बॅटरी घेऊन पायरीवर बसली होती . सायसाखरेची वाटी माझी वाट बघत होती … […]