नवीन लेखन...
डॉ. श्रीकृष्ण जोशी
About डॉ. श्रीकृष्ण जोशी
डॉ.श्रीकृष्ण जोशी यांचे प्रकाशित साहित्य कादंबरी : 1 शेम्बी, 2 घसरण, 3 महाराज, 4 घर दोघांचे, 5 अगतिक, 6 नंतर , 7 शल्य, 8 शापित, 9 तुझ्याशिवाय, 10 काटशह, 11 कातळ, 12 अथांग, 13 मार्शीलन, 14 समांतर, 15 वादळ वेणा, 16 भोवरा, 17 ब्रेकिंग न्यूज, 18 कापूस आणि फॅनची गोष्ट(आगामी), 19 सापशिडी,फासे आणि काही सोंगट्या (आगामी ) दीर्घकथा संग्रह: 1 रानोमाळ, 2 रानवा संगीत नाटक : 1 सं. शांतिब्रह्म, 2 घन अमृताचा, 3 राधामानस, 4 ऎश्वर्यावती, 5 ऋणानुबंध, 6 स्वरयात्री, 7 चोखा मेळा गद्य नाटक: 1 चिनुचं घर, 2 स्वप्नपक्षी, 3 अरे, चल उचल काव्यसंग्रह: 1 खडूचे अभंग, 2 क्रांतिज्वाला ललित लेख: (आगामी) 1 रौद्रलेणी, 2 पडघम, 3 शब्दांच्या पलीकडे कथासंग्रह:(आगामी ) 1 ड्रॉवर, 2 चंद्रखुणा बाल वाङ्मय: 1 अपूर्वा, 2 गोष्टीरूप चाणक्य, 3 सरदार वल्लभभाई पटेल(आगामी ) संपादन : 1 मुद्रा (प्रातिनिधिक कथासंग्रह) 2 व्हिजिट बॅग, 3 पॅनोरमा पारितोषिके: 1 डेथ ऑफ कॉमन सेन्स या नभोनाट्याला अखिल भारतीय आकाशवाणीच्या नभोनाट्य लेखन स्पर्धेत संपूर्ण भारतातून प्रथम क्रमांक, नभोनाट्याचे 14 भारतीय भाषांमध्ये भाषांतर, 2 दिल्ली येथील स्पर्धेत 'सं. घन अमृताचा ' या नाटकाला लेखनाचे प्रथम पारितोषिक 3 सं. ऎश्वर्यावती आणि सं.ऋणानुबंध या नाटकांना अनुक्रमे द्वितीय आणि विशेष पारितोषिक उल्लेखनीय : * पावस येथील स्वामी स्वरूपानंद तीर्थराज विधी आणि स्वामी स्वरूपानंद जन्मसोहळा या सीडींसाठी पटकथा लेखन * सं. घन अमृताचा, सं. शांतिब्रह्म, सं. ऎश्वर्यवती या तीन संगीत नाटकांचे आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील सर्व केंद्रावरून प्रसारण * क्रांतिसूर्य सावरकर आणि कातळ या मालिकांचे आकाशवाणीवरून प्रत्येकी 13 भागांचे लेखन आणि प्रसारण *आकाशवाणी वरून 20 श्रुतिका प्रसारित * समांतर कादंबरी, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अंध बांधवांसाठी कॅसेट च्या माध्यमातून प्रकाशित * अंध बांधवांसाठी , स्वामी स्वरूपानंद यांचे ब्रेल लिपीतील चरित्र लेखन पुरस्कार 1 'शापित ' कादंबरीला कोकण मराठी साहित्य परिषदेचा पुरस्कार 2 'शल्य ' कादंबरीला कुसुमताई अभ्यंकर पुरस्कार 3 'शल्य ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 4 'कातळ ' कादंबरीला कै. र.वा.दिघे पुरस्कार 5 अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई यांचा 1998 साठी , स्वरराज छोटा गंधर्व पुरस्कार 6 सं. घन अमृताचा हे नाटक , राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 7 सन 2000 मध्ये सर्वोत्कृष्ट संगीत नाटककार आणि सर्वोत्कृष्ट गीतकार म्हणून नाट्यपरिषदेचा गुणगौरव पुरस्कार 8 सन 2002 मध्ये सं. शांतिब्रह्म हे नाटक राज्य नाट्यस्पर्धेत सर्वप्रथम 9 मुंबई येथील साहित्य संघ मंदिराचा , कै. अ. ना.भालेराव पुरस्कार 10 संगीत नाट्यलेखानासाठी , कै. पु.भ.भावे पुरस्कार 11 समांतर कादंबरीला रोटरी पुणे यांचा सर्वोत्कृष्ट कादंबरी म्हणून पुरस्कार 12 सन 2006 मध्ये राधा मानस , राज्य नाट्य स्पर्धेत राज्यात द्वितीय तर दिल्लीत प्रथम 13 त्रिदल या संगीत नाटकाच्या पुस्तकासाठी 2007-08 चा महाराष्ट्र शासनाचा कुसुमाग्रज पुरस्कार 14 आदर्श शिक्षक पुरस्कार 15 पुणे येथील बाल गंधर्व संगीत मंडळाचा कै. अण्णासाहेब किर्लोस्कर पुरस्कार 16 वुमेन्स फाउंडेशन कोल्हापूर या संस्थेचा साहित्य भूषण पुरस्कार.... हा माझा अल्प असा परिचय ...!!!

डायरीतील विस्कटलेली पाने – भाग एक

डायरी तशी साधीच होती. पण जाडजूड होती. खादीच्या कापडाचं कव्हर होतं. वरवर सुस्थितीत असावी असं वाटत होतं. पण उघडल्यावर मात्र डायरीची पानं विस्कटल्यासारखी दिसत होती. डायरी चाळताना आणखी एक गोष्ट लक्षात आली. सुरुवातीच्या पानांवरचं अक्षर चांगलं होतं. काहीसं मोडी लिपीच्या वळणावर गेलेलं आणि शेवटी शेवट मात्र अक्षरात बदल होत गेलेला दिसत होता. […]

इम्युनिटी अनलिमिटेड

” हरकत नाही , पण आता एक काम करा , सगळ्यांनी निघा इथून . शौनक , तू आजोबांकडे जायचं आहेस त्यांच्यासाठी वर्तमानपत्र घेऊन , आणि त्यातल्या निगेटिव्ह बातम्या वाचून दाखवू नकोस .आभा तुला सिस्टरच्या घरी जायचंय , केक घेऊन . त्या नर्स आहेत , आज कदाचित त्यांची ड्युटी वाढण्याची शक्यता आहे . मालन , आजींसाठी काहीतरी घेऊन जा खायला , आजतरी त्या काही खातात का बघ . तुझं संभाषण कौशल्य पणाला लाव . […]

वेबसिरीज : एक रेसिपी 

वैधानिक इशारा : या रेसिपीमुळं कुणाचं मनःस्वास्थ्य बिघडलं , घरात भांडणं होऊ लागली , लहान पिढी आणि तारुण्यातली पिढी वाया जाऊ लागली , संस्कृती नष्ट होऊ लागली , शिक्षणावर कुणी पाणी सोडलं , समाजात अनाचार , अत्याचार होऊ लागला , सगळ्या प्रकारचं प्रदूषण होऊ लागलं तर त्याला लेखक जबाबदार नाही ! […]

नारायण भंडारीचं काय झालं ? – भाग ४

मी त्याच्याकडे बघत राहिलो. आणि डोळ्यासमोर न्यूज चॅनल्सचे पडदे आले.. कोरोना , परदेशातील बातम्या , व्हायरल व्हिडिओचा तपास , राजकारण , क्षुल्लक गोष्टींवरच्या चर्चा या व्यतिरिक्त भारतीयांना दुसरं जीवन नसावं असं सगळं चित्रण माथी मारलं जात होतं आणि देशापुढचा धोका जनतेसमोर येऊ दिला जात नव्हता . […]

श्री शिल्लक

तिला कळत नव्हतं ,त्यांच्या मनात नेमकं काय चाललंय . कालपासून त्यांचं वागणं काहीसं अनाकलनीय वाटत होतं . पंचेचाळीस वर्षांच्या सहजीवनाचा इतिहास ती कालपासून धुंडाळत होती . थोडंसं काही हाती लागत
होतं , काही हातातून निसटून जात होतं . पण कालपासूनच्या वागण्याचा बोध तिला होत नव्हता . […]

कुदरत की गत न्यारी !

कुमारजींच्या गाण्यातला दर्द आत्ता त्याच्या ध्यानात आला. त्याच्या लक्षात आलं, सगळ्याला उशीर झालाय. सगळं संपत आलंय. कोरोना हे निमित्त झालंय, पण प्रत्यक्षात फक्त निर्गुणी भजन तेव्हढं चिरंजीव होऊन राहिलंय… […]

मटालोखा मॉल

मॉल प्रशस्त होता, हायफाय होता, आकर्षक होता. चकचकीत होता आणि अत्याधुनिक होता. इंटिरिअर भुरळ पडणारे होते. कुठल्याही बाजूने पाहिले तरी सहज दिसणारे, उंचावर असणारे, रंगीत, झगमगीत असे मॉलचे नाव खुणावत होते. मटालोखा मॉल […]

इथेच मारू बोंबा आणिक इथेच बांधू बांबू

( ही कविता प्राणवायुला समर्पित !) इथेच मारू बोंबा आणिक इथेच बांधू बांबू । जरा उसासून थांबू ,शोधू कलेवरांचे तंबू ।। लाडेकोडे वाढवलेली इथेच तोडू झाडे । प्राणवायुचे नरडे दाबून इथेच घालू राडे ।। इथे ओरपू पाणी आणिक तिथेच टाकू विष्ठा । जगण्यासाठी हवी कशाला विकून टाकू निष्ठा ।। एक विषाणू श्वास संपवी मनीमानसी कैक । […]

1 4 5 6 7 8 12
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..