नारायण भंडारीचं काय झालं ? भाग १
नारायण भंडारी या नावासह पूर्णतः काल्पनिक . यातील घटना प्रसंगाचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही , तसा कुणाला आढळला तर तो योगायोग समजावा. […]
नारायण भंडारी या नावासह पूर्णतः काल्पनिक . यातील घटना प्रसंगाचा वास्तवाशी कोणताही संबंध नाही , तसा कुणाला आढळला तर तो योगायोग समजावा. […]
‘ वाचू आनंदे ‘चा आगळा वेगळा कार्यक्रम. संपूर्ण सभागृह भरलेले. व्यासपीठावर माईक समोर ती उभी . नाव मुक्ता . इयत्ता चौथी. आवाज खणखणीत . उभं राहण्याची , प्रेक्षकांकडे पाहण्याची आणि त्यांची दाद मिळताच किंचित स्वाभाविक झुकून नम्रपणे दाद स्वीकारण्याची एक विलक्षण शैली. देहबोली आत्मविश्वासाने भरलेली. […]
आर. माधवन आणि विजय सेथुपथी या दोन अभिनेत्यांचा अभिनय, अंडरवर्ल्डचे विदारक आणि वास्तवपूर्ण चित्रण, पोलिसदलातील अंतर्गत राजकारण, अंडरवर्ल्ड मधील जीवघेणं राजकारण यासाठी ही मुव्ही पाहायलाच हवी. […]
झिपऱ्या आज भलताच खुशीत होता, कारण कधी नव्हे ते त्याला अनेक नेते भेटले होते, आणि त्या सगळ्यांनी त्याला हरभऱ्याच्या झाडावर चढवून चॅनेलवाल्यांच्या माईक समोर बाईट देण्यासाठी उभे केले होते . टीव्हीच्या पडद्यावर दिसणार म्हणून तो भलताच खुशीत होता. […]
कर्नाटकातील बदामी येथील अतिशय उंच आणि अतिविशाल खडकात कोरलेली लेणी पहायला मी आणि सौभाग्यवती जातो काय आणि सर्वात उंच असलेल्या खडकात कोरलेल्या लेण्यांसमोरच्या प्रांगणात निवांत बसलेले डॉ . प्रकाश आमटे आणि सौ. मंदाताई आमटे, दिसतात काय , सगळं अगदी अनपेक्षित आणि तरीही आनंददायक . […]
त्यानं साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आणि तो एकदम मोठा होऊन गेला . मोठा म्हणजे अगदी खूपच मोठा . आभाळा एवढ्या उंचीचा आणि समुद्रएवढ्या खोलीचा . अर्थात उंची होतीच पहिल्यापासून पण कुणाला दिसली नव्हती . अर्थात चिरपरिचित असल्यानं ती कुणाला जाणवली नव्हती . […]
सखाराम कृष्ण जोशी हे नाव व्यवहारापुरतं , प्रत्यक्षात बापुकाका जोशी हीच सर्वत्र ओळख . भिक्षुकी करताना आजच्या हिशोबात सांगायचं तर दहा पंधरा मैल चालायचं , घाटया, डोंगर चढायचे आणि मिळेल त्या रुपया दोन रुपये दक्षिणेवर समाधान मानून घरी परतायचं . यात आयुष्य सरलं. पण चेहऱ्यावरचा आनंद , स्वभावातला सरळपणा आणि वृत्तीतला प्रामाणिकपणा हरवला नाही शेवटपर्यंत . […]
हुतात्म्यांनो ! तुमच्यासाठी माझ्याजवळ फक्त शब्द. काळाच्या ओघात उघड होणारे पुरावे , त्यातल्या देशद्रोह्यांच्या नावांना आपणच दिलेलं मोठेपण आणि इतिहासातील चुका जाणवूनसुद्धा न आलेलं शहाणपण. असे आम्ही सगळे हिंदुस्थानवासीय ! […]
पहाटेपासून विधिवत पंचामृती पूजा चालली होती. मांगलिक स्नानानंतर भाळावर चंदनलेपाची विशिष्ट मुद्रा आरेखित झाली होती. वस्त्रप्रावरणांनी देहाला आलंकृत करणं सुरु होतं. तुळशीचे प्रचंड हार गळ्यात घातल्यानंतर गुरुजींनी प्रथेनुसार दर्पण समोर धरला. आणि विठुराया पाहात राहिला. […]
“कैक चॅनलवाले रोज इथं येत आहेत. आमच्यातल्या कुणाला तरी धरून, रडायला भाग पाडून शूटिंग करताहेत. बाईट घेताहेत आणि न्यूज चॅनलवर दाखवून टीआरपी वाढवत आहेत. आमचा बाजार मांडलाय तुम्ही.”
गावकरी संतापले. तो बावरला. […]
Copyright © Marathisrushti.com 1995-2025 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Smart Solutions