स्नेह… तुझा माझा
तुझ्या माझ्या भावनांतुन सदैव प्रेमानं आरवावं नव्या सुंदर कल्पनांनी घर आपल सारवावं तुझ्या सुंदर डोळ्यांनी तू मला भुलवावं प्रेमाच्या झोक्यावर मी तुला झुलवावं कोलमडलो कधी तर एकमेकांना सावरावं आपल्या क्रोधाला आपण संयमाने आवरावं गैरसमजाच्या खड्यांनी समंजसपणे बुजावं छोट्या छोट्या कुरबूरींना तू दूरवर फेकावं तुझ्या माझ्या स्नेहाला दोघांनी साचवावं नात्याच्या बंधांना तुटण्यापासून वाचवावं तू कधी खोटं खोटं […]