नवीन लेखन...
Avatar
About गणेश कदम
पुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.

मुंबईतील गुन्हेगारी विश्वातील डॉन मन्या सुर्वेची कहाणी…

भारतीय गुन्हेगारी जगतातील तो पहिला ‘लाईव्ह एनकाऊंटर’ होता. मनोहर अर्जुन सुर्वे ऊर्फ मन्या सुर्वे हा मुंबईतील गुन्हेगारी विश्वातील पहिला हिंदू-भंडारी डॉन होता. मन्याची हत्या हा सर्वात पहिला एनकाऊंटर असल्याची नोंद करण्यात आली आहे. […]

नोटबंदी….GST आणि GDP समिकरण….!!

“महागाई, मंदी आणि बेरोजगारीचा भस्मासुर उसळणार का…? ‘नोटाबंदी’ आणि ‘जीएसटीचा’ निर्णय घाईघाईत घेतल्यामुळे अर्थव्यवस्थेचा विकासदर आणखी खालावू शकतो, अशी भीती माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी व्यक्त केली होती.जीएसटी घाईघाईत लागू करण्यात आल्याने आता त्याचे विपरित परिणाम दिसायला लागले आहेत. […]

“नोटबंदि…एक हजाराची नोट’ – एक अनुभवकथन

लासलगावला दवाखाना चालवणाऱ्या डाॅक्टर मित्राला आलेला अनुभव,”नोटबंदि…एक हजाराची नोट.!खरंच विचार करणारी हि गोष्ट आहे. आपल्या देशात अजूनही गावागावात अशिक्षित, अडाणी तसेच आंगठे बहादूर लोक आहेत. कितीतरी स्वार्थी लोक या भोळ्या भाबड्या लोकांना आर्थिक व्यवहारात फसवतात. […]

प्रतिभावंत कवी, तत्त्वचिंतक विं.दा.करंदीकर

विंदा करंदीकर हे धालवली खारेपाटण ता. देवगड गावचे सुपुत्र, महाराष्ट्रातील प्रतिभावंत कवी, जेष्ठ लेखक, अभ्यासू आणि जाणकार समीक्षक, बाल नाटककार, संस्कृत आणि मराठी वाङ्‌मय गाढे अभ्यासक .एक चोखंदळ वाचक, विध्यार्त्यांचे मार्गदर्शक. असे अनेक पैलू असलेले व्यक्तिमत्व. विंदाच्या कवितेत एकाच वेळी सामर्थ्य आणि सुकोमलता, विमुक्तपणा आणि संयम, अवखळपणा आणि मार्दव, गांभीर्य आणि मिस्किलपणा आणि प्रगाढ वैचारिकतेबरोबरच नाजुक भावसौंदर्य यांचा एकदम प्रत्यय येतो..! […]

‘शतकातला श्रेष्ठ कलावंत, महानायक, अंग्री यंग मॅन – “अमिताभ बच्चन” !

आज महानायक मा.अमिताभ बच्चन यांचा आज ७५वां वाढदिवस. त्यांचा जन्म. ११ ऑक्टोबर १९४२. तरूण कलाकारांना हेवा वाटेल अशी एनर्जी त्यांच्यात आजही बघायला मिळते. या वयातही ते सतत काम करतात. ‘शतकातला श्रेष्ठ कलावंत’ हे वर्णन अभिमानानं मिरवण्याचा सर्वाधिकार अमिताभ बच्चन यांच्याकडे सुरक्षित आहे. १९७०च्या दशकात ते हिंदी सिनेमात आले आणि रुपेरी पडद्यानं कात टाकली. अभिनय, कथावस्तू, संगीत […]

थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे

केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे (१७ सप्टेंबर १८८५ – २० नोव्हेंबर, १९७३) हे मराठी पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते. शिवसेनेचे संस्थापक, बाळ ठाकरे हे केशव सीताराम ठाकरे यांचे पुत्र होते. आज प्रबोधनकार (केशव सीताराम ठाकरे) यांची जयंती .. […]

सैनिकांचे “सरंबळ”- एक शुरांचं गाव !

“शहिदांचे गाव” म्हणून प्रसिद्ध असलेला कुडाळ तालुक्यातील सरंबळ हे माझं गाव. १९१४ साली झालेल्या युद्धामध्ये गावातील ५२ सैनिकांपैकी सात सैनिक शहीद झाले. “लढवय्यांचे गाव” म्हणूनही या गावाची ओळख आहे. त्यांच्या स्मरणार्थ या गावामध्ये रणस्तंभ उभारण्यात आला आहे. […]

मृत्युंजयकार शिवाजी सावंत

“शिवाजी सावंत” हे मराठी कादंबरीकार होते. त्यांनी लिहिलेली मृत्युंजय ही पौराणिक कादंबरी मराठी कादंबर्‍यांत मानदंड मानली जाते. शिवाजी सावंत त्यासाठीच “मृत्युंजयकार” सावंत म्हणून ओळखले जातात. ’मृत्युंजय’नंतर सावंतांनी ’छावा’ ही ऐतिहासिक व ’युगांतर’ ही पौराणिक विषयावरची कादंबरी लिहिली. कर्‍हाड येथे भरणार्‍या ७६व्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलना’च्या अध्यक्षपदाचे ते उमेदवार होते. […]

दसरा या सणाचे अनन्यसाधारण महत्त्व

हिंदूंचा एक प्रमुख सण असलेला दसरा (विजयादशमी) या सणाचे असलेले अनन्यसाधारण महत्त्व आहे. दसरा शब्दाची एक व्युत्पत्ती दशहरा अशीही आहे. दश म्हणजे दहा आणि हरा म्हणजे हरल्या आहेत. दसर्‍याच्या आधीच्या नऊ दिवसांच्या नवरात्रात दाही दिशा देवीच्या शक्तीने भारलेल्या असतात. नियंत्रणात आलेल्या असतात, म्हणजेच दाही दिशांतील दिक्भव,गण इत्यादीं वर नियंत्रण आलेले असते, दाही दिशांवर विजय मिळालेला असतो. दुर्गानवरात्र संपल्यानंतर लगेच हा दिवस येतो; म्हणून याला ‘नवरात्रीच्या समाप्तीचा दिवस’ असेही मानतात.’ […]

‘धनुष्यबाण’, ‘नारायणास्त्र’ ते ‘वज्रस्त्र’ !

गेले काही महिने राणे काय करणार, याची चर्चा प्रसार माध्यमांनी अशा वळणावर नेली होती, की जणू राज्यात मोठा राजकीय भूकंपच होऊ घातला आहे. प्रत्यक्षात राणे यांनी मोठा गाजावाजा करून अखेर कॉंग्रेसला सोडचिठ्ठी दिली आणि सोबत आपल्या आमदारकीचा राजीनामाही देऊन टाकला. एक “स्वाभिमान” दुखावलेला कोकणातील नेता आधी शिवसेनेला जय महाराष्ट्र करतो आणि नंतर कॉंग्रेस ला सोडचिठ्ठी देतो. मग भाजपच्या वाटेवर जातो पण रस्ता चुकल्याने अखेर ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ घेऊन स्वतःची वेगळी चूल मांडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नारायण राणे कोणत्या पक्षात जाणार याकडे लक्ष लागल होत. त्यांनी काल आपली नवीन दिशा जाहीर केली. राणे यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’ असे नाव जाहीर केले. […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..