नवीन लेखन...
Avatar
About गणेश कदम
पुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.

बुलेट ट्रेन : महाराष्ट्राला फायदा काय ?

दि.१४ सप्टेंबर २०१७ रोजी गुजरातमध्ये साबरमतीजवळ मुंबई- अहमदाबाद बुलेट ट्रेनचे भूमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन मध्ये महाराष्ट्राचा नक्की काय फायदा होणार आहे…? महाराष्ट्रातील उद्योजक आणि शासनाने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स मधून हा ट्रॅक सुरु होईल. महाराष्ट्रात ४ तर गुजरात मध्ये ८ स्टेशन्स घेत बुलेट ट्रेन […]

‘स्वरसम्राज्ञी’ भारतरत्न लता मंगेशकर

लतादीदींनी हिंदी,मराठी भाषेत तर गाणी गायलीच आहेत पण ३६ हुन अधिक प्रादेशिक व विदेशी भाषेत सुद्दा गाण्याचे रेकॉर्डिंग केले. १९८६ साली त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा हिंदी सिनेमातील सर्वोच्च सन्मान होता. दिदीच्या आयुष्यातील एक महत्वाचा प्रसंग २७ जानेवारी १९६३ रोजी त्यांनी ‘ये मेरे वतन के लोगो’ हे गीत गाऊन भारताचे तत्कालीन पंतप्रधान पंडित-जवाहरलाल नेहरू यांच्या डोळ्यात अश्रू आणले. […]

कोकणातील ‘गावपळण’ ! भाग २

कोकणातील अनेक गावांमध्‍ये शेकडो वर्षांपासून चालत आलेली ‘गावपळणा’ची किंवा ‘देवपळणा’ची परंपरा आजही श्रद्धेने व आनंदी वातावरणात पाळली जाते. त्यामागे गावाचे सौख्य टिकवणे आणि गावक-यांनी गुण्यागोविंदाने एकत्र राहावे हा हेतू असावा. […]

सिंधुदुर्गातले सुपुत्र – “बाबी कलिंगण”

दळणवळणाची अपुरी साधने आणि शेतीवर पोट असलेल्या या कलावंतांने अखेरपर्यंत कलेची कास सोडली नाही. काही वर्षांपूर्वीच पडद्याआड गेलेले बाबी नालंग आणि बाबी कलिंगण हे दोन दशावतारी कलेचे शिलेदार होते. “श्री. बाबी कलिंगण यांना राज्यस्तरीय लोककला पुरस्काराने गौरविण्यात आले होते “.सिंधुदूर्गात दशावतारी म्हणजे ” रात्री राजा आणि सकाळी कपाळावर बोजा ” अशी स्थिती एके काळी होती. त्या वेळपासून लोककलेची सेवा हाच परमधर्म असे समजून हा कलाकार राबला त्याची शासनाने दखल घेतली हे बरं झालं. […]

अफझलखानाचा वध – भाग १

शिवराजांचा विजयरथ चौखूर उधळतच होता. त्यामुळे आता शिवाजीला रोखलाच पाहिजे असे आवाहन केले की, कोण रोखेल या शिवाजीला..? पण कोणीच तयार होईना.. तेवढ्यात एक सरदार उठला आणि बोलला “मै….! मै लाऊंगा.. शिवाजीको.. ! जिंदा या मुर्दा …!” सारा दरबार सुन्न झाला.., त्याचे नाव “अफझलखान” खरेतर ‘अफझल’ ही पदवी आहे त्याचे खरे नाव होते ‘अब्दुल्लाखान भटारी’ […]

कोकणातील ‘गावपळण !’ भाग १

धार्मिक आणि ऐतिहासिक परंपरांचा अमूल्य ठेवा गावांनी जपलाय. बर्‍याचदा रूढी आणि परंपरांमुळे गावांचे महत्त्व कमी झाल्याची टीका होते, पण या रूढी आणि परंपरांच्या पाठीमागे असलेल्या चांगल्या कल्पना, वागणूक, संस्कृती या महत्त्वाच्या बाबी विसरता येत नाहीत. गावाला शांतता लाभावी, सुख-समाधान लाभावे ही गावकर्‍यांची इच्छा त्यांच्या कृतीतून जेव्हा स्पष्ट होते तेव्हाच त्यांच्या परंपरांना एक वेगळा साज चढतो. अशीच एक धार्मिक परंपरा म्हणजे ‘गावपळण..!’ […]

देशभक्तीचा दीक्षामंत्र ‘वन्दे मातरम्’चे असाधारणत्व

‘वन्दे मातरम्’ ज्या ‘आनंदमठ’ कांदबरीचा भाग आहे, ती एका ऐतिहासिक सत्य घटनेवर आधारित कादंबरी आहे. ती ऐतिहासिक घटना ‘संन्याशांचा उठाव’ म्हणून भारतीय इतिहासात प्रसिद्ध आहे. हा उठाव वर्ष १७६२ ते १७७४ या काळात बंगालमध्ये झाला होता. […]

इनामदार “श्री देवी भगवती संस्थान कोटकामते”

इतिहास काळात कोटकामते गावात सिद्धीचे राज्य होते. त्यावेळी कान्होजी आंग्रे यांनी मोठ्या शौर्याने वचक ठेवला होता. म्हणूनच सिद्धीचे राज्य असतानाही कोटकामते गावावर आंग्रेंची सत्ता होती. एका आख्यायिके नुसार कामते गावातील भगवती देवीस कान्होजी आंग्रे यांनी नवस केला होता, ‘‘जर मी लढाईत विजयी झालो तर, तुझे भव्य देऊळ बांधीन व देवस्थानाला गाव इनाम म्हणून देईन’’ त्याप्रमाणे युध्द जिंकल्यावर कांन्होजींनी भगवती देवीचे भव्य मंदिर बांधले. या घटनेची साक्ष देणारा शिलालेख आजही मंदिरात पाहता येतो. […]

‘समर्थवाणी’

॥ जय श्रीराम ॥ जय जय रघुवीर समर्थ ॥ जनी सर्व सुखी असा कोण आहे । विचारे मना तूचि शोधूनी पाहे । मना तांची रे पूर्वसंचीत केले । तयासारिखे भोगणे प्राप्त झाले ॥ मना मानसी दु:ख आणू नको रे । मना सर्वथा शोक चिंता नको रे । विवेके देहेबुद्धी सोडूनी द्यावी । विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी […]

अविस्मरणीय ‘बाळासाहेब ठाकरे’

बाळासाहेबांनी शिवसेना स्थापन केली नसती तर मराठी माणसांचे आज अतोनात नुकसान झाले असते. शिवसेनेमुळेच महाराष्ट्रात मराठी भाषा, मराठी अस्मिता, मराठी संस्कृती टिकून आहे ही वस्तुस्थिती आहे. ती कोणीही नाकारू शकत नाही, हे सूर्यप्रकाशाएवढे सत्य आहे.’ […]

1 2 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..