नवीन लेखन...
Avatar
About गणेश कदम
पुणे येथे वास्तव्य असलेले गणेश कदम हे विविध विषयांवर समाजमाध्यमांतून लिहित असतात. ते टेक महिंद्र या कंपनीत वरिष्ठ सल्लागार आहेत.

“माणूस” म्हणून….!

मी “बाबासाहेबांवर” काही लिहिले.. लाेकांनी मला फोन करून विचारले “तुम्ही बौध्द किंवा दलित आहात का…?” मी आपल्या ” शिवछत्रपतींवर”काही लिहिले.. लाेकांनी मला फोन करून विचारले “तुम्ही मराठा आहात का…?” […]

डॉ. दीपक अमरापूरकर – सामान्यांचा “असामान्य डॉक्टर”

डॉ. दीपक अमरापूरकर हे जागतिक कीर्तीचे यकृताचे तज्ज्ञ डॉक्टर..! बॉम्बे हॉस्पिटलची शान, अचूक निदान करणारा, अतिशय बुद्धिमान डॉक्टर..! मूळ सोलापूरचा असलेला हा माणूस अतिशय कष्टातून आणि परिश्रमातून डॉक्टर झाला आणि आपल्या मनमिळाऊ हसतमुख स्वभावानं दुसर्‍याच्या मदतीला कायम तयार असायचा. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे डॉ. दीपक अमरापूरकर मूळचे सोलापूरचे होते. देशातले नामांकित गॅस्ट्रोअँड्रॉलॉजिस्ट (पोटविकारतज्ञ) म्हणून त्यांची ओळख होती. हरिभाई देवकरण शाळेत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. LJ वैद्यकीय शिक्षणही त्यांनी सोलापुरातूनच पूर्ण केलं. […]

अफाट कर्तृत्वाच्या वडिलांची तेवढीच अफाट कन्या.. !

“अफाट कर्तृत्वाच्या वडिलांची ही तेवढीच अफाट कन्या.. ! संयुक्त महाराष्ट्राचा लढा, आचार्य अत्रे, ‘नवयुग’ आणि ‘मराठा’ व ज्येष्ठ कवयित्री शिरीष पै..! ‘हायकू’ हा जपानी काव्यप्रकार मराठीत रुढ करणा-या ज्येष्ठ कवयित्री म्हणजे शिरीष पै. असंख्य कविता, कथा शिरीषताईनी लिहिल्या. मराठी दैनिकाच्या पहिल्या महिला संपादक म्हणून त्यांना बहुमान मिळाला. शिरीष पै यांच्या लेखनाची सुरुवात त्यांच्या पप्पांमुळे म्हणजे आचार्य अत्रे यांच्यामुळे झाली. त्यांच्याच लेखणीचा वारसा त्यांनी घेतला. त्यांच्या सहवासातच त्यांना लिखाणाची गोडी लागली. कथा, कविता, नाटक आणि प्रासंगिक लेखन असे चौफेर लिखाण त्यांनी केले. […]

कोणते देव ? कोणते संत ? ‘बाबा’गिरी कायद्याने बंद करा!

‘बाबा’ राम रहिमला वीस वर्षांची सजा ठोठावली हे ठीक झाले, पण आतापर्यंत ज्या राजकीय पक्षांनी अशा बाबांचा पाठिंबा घेऊन मते मिळविली त्यांच्या नैतिकतेचे काय? पैसा व संपत्ती हेच धर्म आणि अध्यात्माचे अधिष्ठान होत आहे. संत कोण व देव कोण याच्या व्याख्या ठरवा नाहीतर सर्वच धर्मांतील बाबागिरीवर कायद्याने बंदी घाला…! […]

अतिवृष्टी आणि “मुंबईकर”….!

पावसाने एका झटक्यात सगळ्यांना ‘मुंबईकर’ बनवले. आता कोणी मराठी नाही, आता कोणी भैया नाही, कोणी हिंदू नाही, कोणी मुस्लिम नाही.! भिजणारी माणसेच.., मदत मागणारी माणसेच..आणि प्रत्येक जिवाची काळजी घेणारी फक्त माणसेच.! उद्या ऊन पडेल, पाऊस थांबेल, सगळं नीट होईल. फक्त एक करा. ह्या पावसाने दिलेला ओलावा असाच जपून ठेवा.! शेजाऱ्यांची सुद्धा निटशी ओळख नसणार्या मुंबईकरांच्या घराचे दरवाजे आज अनोळखी लोकांसाठी उघडे आहेत. संकटात मदतीला धावून जाण्याच्या या वृत्तीला माझा सलामच…! […]

“मराठा” समाजाचा विकास खुंटला तो, त्यांच्या राजकारणाच्या व्यसनामुळे !

मराठा समाजाचा विकास खुंटला तो, त्यांच्या राजकारणाच्या व्यसनामुळे. ज्यांनी आपल्या स्वार्थासाठी आपले खिसे भरून घेतले. त्यांनी सतराशे साठ घोटाळे, भ्रष्टाचार करून आपली घर पैशाच्या पोत्यांनी भरली आणि दुर्दैवाने मराठा समाज अशाच लोकांना त्यांचा आदर्श मानू लागला..फास्ट पैसा… गाडी, बंगला, पाटीलकी, नाव, इज्जत, मान या गोष्टींसाठी मराठा समाज राजकारणात उतरून कुठल्याही थराला जाण्याची तयारी ठेवू लागला..आणि या […]

लोकमान्य टिळक, भाऊ रंगारी आणि गणेशोत्सव

हल्लीचा जो hot topic आहे तो म्हणजे गणेशोत्सव कुणी साजरा करायला सुरुवात केली…?? एक- दोन पुस्तकात श्री. भाऊ रंगारी यांचा उल्लेख मिळतो की श्री. भाऊ रंगारी यांनी सुरुवात केली तर काही इंग्रजी लेखकांच्या पुस्तकात श्री. लोकमान्य टिळक यांनी या उत्सवाची सुरुवात केली असे लिहिलेले आढळून येते. इथे जर पाहायला गेलो तर श्री. भाऊ रंगारी यांचा असा उद्देश कुठेही दिसत नाही की या उत्सवाला लोकचळवळीचे स्वरूप द्यायचे म्हणून त्यामुळे फार फार तर घरातल्या गणपतीला दारात आणून बसवला असे या कृतीचे वर्णन करता येईल. […]

ऋषिपंचमी

ऋषिपंचमी हे व्रत भाद्रपद शुद्ध पंचमी या तिथीला साजरे करतात. कश्यप, अत्रि, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि वसिष्ठ हे सप्तर्षी आहेत. ज्या ऋषींनी आपल्या तपोबलाने जगतातील मानवावर अनंत उपकार करून ठेवले आहेत, मानवाच्या जीवनाला योग्य दिशा दाखविली आहे,त्या ऋषींचे स्मरण या दिवशी केले जाते. मासिक पाळी,अशौच आणि स्पर्शास्पर्श यांचा स्त्रियांवर होणारा परिणाम या व्रताने,तसेच गोकुळाष्टमीच्या उपवासानेही कमी होतो. […]

1 3 4 5
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..